वेलवर्गीय भाज्यांमध्ये साधर्म्य असलेल्या भाज्या म्हणजे कारली आणि दोडका. या दोन्ही भाज्यांच्या वाढीच्या सवयीमध्ये साधर्म्य आढळते. यामुळेच, त्यांच्या मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. या दोन्ही भाज्यांची लागवड फायद्याची ठरू शकते कारण कारल्याला परदेशात तसंच मोठया शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
हवामान :
पावसाळा असो किंवा उन्हाळा दोन्ही हंगामात कारली आणि दोडक्याची लागवड करता येऊ शकते.
कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते.
दोडक्याला थंडी मानवते मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
जमीन :
वेलवर्गीय भाज्यांना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते.
कारले आणि दोडक्याची लागवड करताना भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमीन निवडावी.
चिकणमाती किंवा पाण्याच्या नीचऱ्यास बाधक जमिनीची निवड करू नये.

पूर्वमशागत व लागवड :
कोणत्याही बियाण्याची लागवड करण्याआधी जमिनीची पूर्वमशागत करणे गरजेचे असते.
कारल्याची लागवड करायची असल्यास दोन ओळीत १.५ ते २ मिटर व दोन वेलीत ६० सेमी अंतर ठेवावे.
दोडक्यासाठी दोन ओळी २.५ ते ३.५ मिटर वर दोन वेलीत ८० ते १२० सेमी अंतर ठेवतात.
प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत.
बिया वरंब्याच्या बगलेत टोकाव्यात.
उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे.
हंगाम :
कारल्याची लागवड उन्हाळी हंगामात करायची झाल्यास जानेवारी फेब्रूवारी महिन्यात केली जाते.
उशिरात उशिरा मार्चमध्ये सुध्दा उन्हाळी हंगामातील कारल्याची लागवड करतात.
खरीपाची हंगामात साधारणपणे जून जूलै महिन्यात कारल्याची लागवड केली जाते.
दोडक्याचे उत्पादन कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा १५ ते २० दिवसांनी उशिरा केली तरी चालते.
बियाण्यांचे प्रमाण :
कारल्यासाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे लागते.
बियाणे २५ ते ५० पी.पी.एम.जी.ए. किंवा ४० पी.पी.एम.एन.ए.ए. च्या द्रावणात बुडवून नंतर प्रतिकिलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम कार्बोन्डॅझिम लावून नंतर लागवड करावी.
दोडक्यासाठी हेक्टरी ३ ते ४ किलो ग्रॅम बियाणे लागते.

खते व पाणी व्यवस्थापन :
बियाणे टाकल्यानंतर उत्तम आणि दर्जेदार उत्पादना यावे यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.
याला जर योग्य नियोजनाची जोड मिळाली तर त्याचा फायदाच होतो.
खताचे आणि पाण्याचे व्यवस्थापन त्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावते.
कारल्याच्या पिकासाठी प्रति हेक्टरी २० किलो नत्र ३० किलो स्फूरद व ३० किलो पालाश लागणीच्या वेळी द्यावे.
नत्राचा दुसरा हप्ता २० किलो या प्रमाणाम फूले दिसू लागली कि द्यावा.
दोडका पिकासाठी प्रति हेक्टरी २० ते ३० किलो नत्र २५ किलो स्फूरद व २५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
१ महिन्याने नत्राचा २५ ते ३० किलोचा दुसरा हप्ता द्यावा.
आंतरमशागत :
वेल जोम धरू लागल्यानंतर भोवतालचे तण काढून स्वच्छता ठेवावी,जमिन नेहमी भुसभुशीत ठेवावी.
वेलवर्गीय पीक असल्यामुळे या दोन्ही पिकास आधाराची गरज असते यासाठी बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा.
आधार देण्यासाठी तारांच्या मदतीनेहि वेली पसरवून त्यापासून चांगला नफा मिळविता येतो.
काढणी व उत्पादन :
लागवडीनंतर साधारण ६० ते ६५ दिवसांनी फुलावर येतो.
पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत.
नखाने हळूच दाबल्यावर व्रण पडतो.
ती फळे कोवळी समजावीत.
दोडक्याचे हेक्टरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन मिळते.
कारल्याची फळे कोवळी असतानाच काढावीत.
कारल्याचे हेक्टरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन येते.
सौजन्य:- *????वावर | Farming Innovation????????????

















Nice