अमेझॉन जंगल हे आपल्या पृथ्वीचे हृदय आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या 20% ऑक्सिजनचे उत्पादन अमेझॉन रेन फॉरेस्टच्या जंगलापासून होते. अमेझॉन जंगलाबद्दल काही मनोरंजक तथ्ये आपण जाणून घेणार आहोत. मागील भागात आपण उकळत्या पाण्याच्या नदीची माहिती जाणून घेतली. आता एका अद्भुत विषारी बेडकाविषयी माहिती घेणार आहोत. ज्याचे फक्त १ ग्रॅम विष १५ हजार लोकांचा जीव घेऊ शकते.
विषारी जीव म्हटले की आपल्या कल्पनेची धाव सापाच्या पुढे जात नाही. मात्र, जगात अन्यही अनेक विषारी जीव आहेत. त्यामध्ये ‘गोल्डन डार्ट’ बेडकाचाही समावेश आहे. या गोल्डन डार्ट बेडकांचे फक्त १ ग्रॅम विष १५ हजार लोकांचा जीव घेऊ शकते. या जंगलात डोल्डन डार्ट फ्रॉग नावाचा पिवळ्या रंगाचा बेडूक आढळतो. त्याच्या त्वचेत चकाकणारे विष पाझरते. हे विष इतके घातक असते की ते सहजत: १०-२० माणसाला मारू शकते. हा बेडूक मुंग्या, कीटक खात असतो आणि त्या अन्नातून विष बनवतो. त्याच्या विषामुळे मोठमोठे सापही गारद होतात.
अॅमेझॉन रेन फॉरेस्टच्या जंगलात सुमारे 120 प्रकारचे विषारी बेडूक देखील आढळतात. त्यात तेजस्वी सोनेरी रंगाचे बेडूक पाहण्यास फारच आकर्षक दिसतात. पण यांच्यात असलेले विष पर्यटकांना यांच्यापासून लांब राहण्यास परावृत्त करते. इतर विषारी बेंडूकही येथे बर्याच रंगात आढळतात. हे पावसाळ्याच्या दिवसात सर्वाधिक दिसून येतात.