राम राम शेतकरी बांधवांनो, ज्या वेळेस तुम्ही ह्या लेखातील माहिती वाचत असाल तोपर्यंत कदाचित वरूण देव आपल्यावर कृपा दाखवत असेल अशी प्रार्थना करूया. शेती व्यवसायाचे जे मुख्य आधार स्तंभ आहेत त्यापैकी एक म्हणजे बी किंवा बियाणे होय बीजापासून वनस्पतीची निर्मिती होते. उत्तम उगवण शक्ती, चांगल्या प्रतीचे, सुधारित, रोग व कीडमुक्त अश्या बियाण्यापासून येणारी निर्मिती सुध्दा गुणवत्तेपूर्ण असते. पिकांमध्ये रोगाची निर्माती सर्व साधारणपणे बीजमार्फत, जमिनी मार्फत व हवे मार्फत होत असते. या मध्ये वेगवेगळे घटक रोगप्रसार करण्या करिता भूमिका बजावतात
.जसे हवा, कीटक,शेतीचे साधने,इ .बियाण्यामार्फत अनेक हानिकारक रोगजंतूंचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या प्रसार होतो. अंकुरण न झाल्यामुळे रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो,दुय्यम रोगांचा फौलाव होण्यास मदत होते,परिणामी उत्पादनात घट होते, तसेच दुषित बियाण्याचा आकारमान व रंग बदलतो. बिजान्मार्फात पसरणारे रोग उभ्या पिकात दुय्यम रोगांचा फौलाव करतात. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.पिक सरांक्षणाचा खर्च वाढतो अशा वेळेस बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
बियाणाव्दारे उद्भभवणाऱ्या रोगांच्या नियत्राणासाठी बीजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उत्तम उपाय आहे.शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी या तुकारामांच्या उक्ती प्रमाणे जर बियाणे उत्तम प्रतीचे असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन चांगल्या गुणवत्तेचे असणार आहे. यावरून बीजप्रक्रियाचे महत्व लक्षात येते या अनुषगानाने शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, या हंगामात कोणत्याही पिकाचे बियाणे असो त्या बियाण्यास बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. बीजप्रक्रिया करण्याचे पद्धती या प्रमाणे करावी.
बीज प्रक्रिया म्हणजे काय?
बियाणे जमिनीत पेरण्या पूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रीया केली जाते त्यास बीजप्रक्रिया असे म्हणतात.
बीजप्रक्रियाचे फायदे–
जमिनीतून किंवा बियानाद्वारे पसरण्यारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.बियाण्याची उगवण क्षमता वाढते.रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.पिकाच्या उत्पादनात वाढ होते.बीजप्रक्रिया साठी कमी खर्च येतो,त्यामुळे हि कीड अथवा रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया–
१.२५० ग्रम जीवाणू संवर्धक १० किलो बियाण्यास वापरावे.
२.१ लिटर गरम पाण्यात १२५ ग्राम गुल टाकून द्रावण तयार करावे.
३.द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्राम जीवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जीवाणू संव्र्धाकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठ भाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
४.नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे व २४ तासाच्या आत पेरणी कराव्वी
कृषि विज्ञान केंद्र पाल मार्फत आदिवासी शेतकऱ्यांना जीवाणू संवर्धक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवतांना शास्त्रज्ञ
जीवाणू संवर्धन बीज प्रक्रीये बाबतची दक्षता काय घ्याल–
१.जीवाणू संवर्धन प्रक्रिया हि बुरशीनाशाके किंवा किटनाशके प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी.
२.जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यासबुरशीनाशाके, किटनाशके,जंतुनाशके इ लावलेले असतील तर जीवाणू संवर्धन नेहमी पेक्षा दीड पटजास्त प्रमाणात लावावे.
३.जैविक बुरशी नाशक सोबत रायझोबियम,अझोटोबक्टर,स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते.
रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया–
अ.बुरशी नाशकाच्या द्रावणात बी भिजवणे–प्रथम १००किलो बियाण्यामध्ये १ लिटर पाणी टाकून या प्रमाणात भांड्यात १ मिनिटभर घोळून ओलसर करावे.नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे ५ मिनिट लाकडी दांडा किंवा उलथने वापरून चांगले घोळावे.बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत हि घोल्ण्याची प्रक्रिया चालू ठेवावी.मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी.जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वळवून पेरणीसाठी वापरावे.
ब.बियाण्यास बुरशी नाशकाची भुकटी चोळणे–शिफारशीनुसार १ किलो बियाण्यास लागण्याऱ्या बुरशी नाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे.प्रक्रिया करतांना बियाण्यावर थोडा प्रमाणत हलका पाण्याचा शिपका द्यावा जेणे करून बियाणे ओलसर होईल.हि संपूर्ण प्रक्रिया करत असतांना हात मध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरावे.
रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी–
१.बियाणे प्रक्रीयेसाठी मातीचे किंवा प्लास्टिकचे भांड्यांचा वापर करावा
२. बिजप्रक्रीये नंतर भांड्याचे झाकण किंवा पिशवीचे तोंड लगेच उघडू नये.
३.बीजप्रक्रिया करतांना हातामध्ये रबरी मोजे घालावेत किंवा तोंडावर मास्क लावावा.
४.बीज प्रक्रिया करतांना तंबाखू,पानिपीने,सिगारेट ओढणे टाळावे.
श्री.महेश वि महाजन
विषय विशेषज्ञ (पिक सरंक्षण)
कृषी विज्ञान केंद्र, पाल जि-जळगाव