Home हवामान अंदाज Shocking : हा मुंबईतला पाऊस पाहिलात का? कधीही पाहिला नसेल असा 15-20...

Shocking : हा मुंबईतला पाऊस पाहिलात का? कधीही पाहिला नसेल असा 15-20 मिनिटांचा पावसाचा खेळ

मुंबईतला पाऊस
मुंबईतला पाऊस

मुंबई : हा मुंबईतला पाऊस तुम्ही पाहिलात का? हा Shocking Mumbai Rain आहे. आजवर आपण कधीही पाहिला नसेल असा 15-20 मिनिटांचा पावसाचा भन्नाट खेळ कॅमेऱ्यात कैद झालाय.

अद्भुत व्हिडिओ : मुंबईतला पाऊस 

वरिष्ठ सनदी रेल्वे अधिकारी अनंत रुपनगडी यांनी हा अद्भुत व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अवघ्या काही मिनिटात मुंबईतील आकाशात झालेले बदल स्पष्टपणे जाणवतात. राज्यभर कोसळणारा पाऊस क्षणार्धात रूप पालटून कसा खेळ मांडतो, ते या पोस्टमधील हा खालचा व्हिडिओ पाहिल्यावर चटकन लक्षात येते.

पावसाचा जोर वाढण्याचा  इशारा

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

 

सह्याद्री, ठाणे जिल्ह्यातून मुंबईकडे जाणारा पाऊस

खाली आणखी एक भन्नाट व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर सह्याद्री पर्वतरांगातून नगर, नाशिक, पुणे व ठाणे जिल्ह्यातून पाऊस कसा मुंबईकडे सरकत चाललाय त्याची कल्पना येईल.

ढगांनी, पावसाने सारे आकाश व्यापलेले आहे. गेल्या 2 दिवसांतील 100 किलोमीटरच्या प्रवासात या पावसाने काही ठिकाणी 100 मिलिमीटरहून अधिक तडाखा दिला तर काही ठिकाणी अवघ्या 10-15 मिनिटात 40 मिलिमीटरहून अधिक आभाळ मोकळे केले.

तुम्हाला या बातम्याही वाचायला नक्की आवडेल👇👇

1. पाऊस दाटलेला; जोरदार पावलांनी; IMD Alert : आणखी 3-4 दिवस राज्यभर मुसळधार

2. Cloud Burst : जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे झालाय ढगफुटीसदृश्य पाऊस ? एका मिनिटात 2 इंच मुसळधार!