• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

 धान लागवड तंत्रज्ञान

Team Agroworld by Team Agroworld
July 13, 2021
in तांत्रिक
0
 धान लागवड तंत्रज्ञान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.

भाताच्या सुधारित जाती

आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. – ८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.

भाताचे वाण

अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींची वैशिष्ठये या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.

पाने जड, रुंद व उभात आणि गर्द हिरव्या रंगाची असल्याने कर्बग्रहण कार्य अधिक प्रभावीपणे होते. तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीर्घकाळापर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात. त्यामुळे पानातील लोंबीत पळीजांचे प्रमाण कमी राहते.

या जाती इंडिका प्रकारातील असल्यामुळे दाणा पांढरा असून, शिजविल्यावर चिकट होत नाही. भात भरडल्यानंतर भाताचे शेकडा प्रमाण स्थानिक जातीपेक्षा जास्त असते. तांदूळ जाडा भरडा असून त्यांत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

चुडांना जास्त प्रमाणात फुटवे येतात. त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात म्हणजे प्रथम व नंतर येणाऱ्या फुटव्यांच्या फुलोऱ्यातील अंतर कमी असते. त्यामुळे मुख्य आणि इतर फुटव्यांच्या लोंबीतील दाण्यांच्या संख्येत कमी तफावत राहते. पीक तयार झाल्यावर दाणे शेतात गालात नाहीत.

दिवसमानातील सुर्यप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास कमी प्रमाणात संवेदनशील परंतु तापामानातील फरकास विशेष संवेदनशील असतात. त्यामुळे एकाच हंगामात पीक तयार होण्यास वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक दिवस लागतात. तसेच उन्हाळी हंगामात पीक तयार होण्यास सुमारे १५ ते २० दिवस अधिक लागतात.

या जातीत शोषण केलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमपणे वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे पिकाची फाजील वाढ न होता खताच्या प्रमाणात दाण्याचे उत्पादन वाढते.

या जाती महत्वाच्या रोग व किडीस काही प्रमाणात प्रतिकारक आहेत.

जमीन व हवामान

भात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.

बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया

अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे, तसेच ते दर तीन वर्षांनी बदलाने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत 24 तास वाळवावे. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.

भातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. ज्या ठिकाणी ‘उदबत्या’ रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी बियाणे ५० से. ग्रे. अंश तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर ते चांगले सुकवून पेरणीसाठी वापरावे.

रोपवाटिका व्यवस्थापन

रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. नंतर १२० से.मी. रुंद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे) ऊंच आणि शेताचा आकार व उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली तसेच ज्या ठिकाणी हंगामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा ठिकाणी गादी वाफ्याची उंची ३ ते ५ से. मी. ठेवली  तरी चालते. गादी वाफे करणे शक्य नसेल तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूंनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील.

गादी वाफे तयार करण्यापूर्वी दर आर क्षेत्रात (१ गुंठ्यास) एक गाडी याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे, गादी वाफा तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर तीन किलो याप्रमाणे चांगल्या कंपोस्ट खताचा थर दयावा. नंतर त्यावर दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. पावसाला सुरु होताच ७ ते ८ से.मी. अंतरावर ओळीत व १ ते २ से. मी. खोल बियाणे पेरून मातीने झाकावे. पावसाचा अंदाज पाहून साधारणतः ३ ते ४ दिवस आधी धूळवाफेवरही बियाणे पेरण्यास हरकत नाही. पेरणीनंतर १५ दिवसांनी परत दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बियाणे वापरून रोपे तयार करावीत. प्रती हेक्टरी लागणारे बियाणे हे दाण्याची प्रत आणि लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडांच्या संख्येवर अवलंबून आहे. प्रती हेक्टर क्षेत्राला लागणारे बियाणे पुढीलप्रमाणे

दाण्याची प्रत प्रती हेक्टरी बियाणे (किलो)
बारीक दाणा (झिनिया, कोलन गट) २५.५
मध्यम दाणा (रत्ना गट) २५ ते ३०
जाड दाणा (जया गट) ३० ते ४०

लावणीचे वेळी अंतर कमी केल्यास (१५ X १५ से.मी.) बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ५ ते १० किलोने वाढविणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत तणांचा नाश करण्यासाठी १ ते २ वेळा निंदनी करावी अथवा ब्युटाक्लोर किंवा बेंथीओकार्ब हे तणनाशक १ लिटर पाण्यात ६ मि. ली. मिश्रण करून १ आर क्षेत्रावर पेरणीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी २ ओळीमध्ये फवारावे. तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी म्हणजेच रोपास ६ वे पान फुटल्यानंतर रोपाची लावणी करावी. पावसाच्या अभावी अथवा इतर कारणाने लावणी लांबणीवर पडल्यास दर आर क्षेत्रातील रोपास १ किलो युरिया अथवा दोन किलो अमोनिअम सल्फेटचा  तिसरा हप्ता दयावा. लावणीसाठी रोपे काढणीपूर्वी दोन दिवस वाफ्यातील पाण्याची पातळी ५ ते १० से. मी. पर्यंत वाढवावी.

रोपाची लावणी

रोपे लावताना जातीच्या कालावधीनुसार योग्य वेळेत लावणी करावी. उदा. हळव्या जाती २० ते २३, निमगरव्या २५ व गरव्या जाती २५ ते ३० दिवसांनी लावाव्यात. एका चुडात फक्त ३-४ रोपे लावावीत. रोपे सरळ आणि उथळ म्हणजेच २ ते ४ से. मी. खोलवर लावावीत. रोपांची तिरपी व खोल लावणी केल्याने फुटवा कमी येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे हळव्या जातीसाठी १५ X १५ से. मी. अंतरावर, निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी २० X १५ से.मी. अंतर ठेवावे.

राइस स्टेम बोअरर उर्फ तांदुळाच्या खोडकिडीचे व्यवस्थापन  

राइस स्टेम बोअररमुळे कणसांची संख्या व एकंदर उत्पादन घटते. ह्या किडीच्या सहा प्रमुख प्रजाती आहेत आणि त्या भातपिकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खोडकिड्याच्या चार जाती सापडतात – स्कर्पोफेगा इंसर्ट्यूला (पिवळ्या रंगाचा), चिलो सप्रेसालिस (अंगावर पट्ट्या असलेला), चिलो ऑरिसिलस (सोनेरी) आणि सेसामिया इन्फरन्स (गुलाबी) ह्या जाती वेगवेगळ्या अवस्थांतील भातपिकाचे अखंड नुकसान करीत असतात असे अडुथुराई येथील तामिळनाडू भात संशोधन संस्थेच्या एका संशोधनात्मक पाहणीत आढळले आहे.

खोडात राहणार्‍या अळ्या (लार्व्हा) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक नलिका तोडतात आणि ह्यामुळे पीक तुर्‍यावर येण्याआधीच ‘डेड हार्ट्स’ तयार होतात किंवा तुरे आल्यानंतर ‘व्हाइट हेड्स’ किंवा ‘व्हाइट इअर’ दिसून येतात.

पोषक घटक

हवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.

व्यवस्थापनात्मक उपाय

किडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा –

(हवामानानुसार) लवकर तयार होणार्‍या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे

जमिनीचा pH  ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.

बियाण्यावर प्रक्रिया करणे – प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्या प्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.

रोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे

पिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.

रोपांची पुर्नपेरणी  केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्‍या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या  पुर्नपेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे.

माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: . धानइंडिकाट्रायकोग्रामा जॅपोनिकमतांदुळभातराइस स्टेम बोअररस्यूडोमोना फ्लुरोसंस
Previous Post

जनावरांमध्ये लसीकरणाचे महत्व

Next Post

गाजर पिकातून लाभली समृद्धीची लाली

Next Post
गाजर पिकातून लाभली समृद्धीची लाली

गाजर पिकातून लाभली समृद्धीची लाली

ताज्या बातम्या

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish