• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 17, 2022
in इतर
0
उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सूर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पीक आहे. हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण ब-याच प्रमाणात सहन करू शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित वाणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” … बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..*

जमीन व पूर्वमशागत
सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात.

पेरणीची वेळ
उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी. मात्र आपत्कालीन परिस्थितीत व संरक्षित सिंचनाची व्यवस्था असल्यास फेब्रुवारीच्या दुस-या पंधरावड्यात पेरणी करता येते.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

संकरित वाण
पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१, नारी, एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११. सुधारित वाण : शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानू

आंतरपीक व पेरणी पद्धत
आंतरपीक पद्धतीमध्ये भुईमूग + सूर्यफूल (६:२,३:१) या प्रमाणात ओळीत पेरणी करावी.पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमीनीसाठी ४५ x ३0 सें.मी.भारी जमिनीसाठी ६0 × ३0 सें.मी.संकरित वाणसाठी 60 × ३0 सें.मी. पेरणीचे अंतर ठेवावे. बियाणे ५ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये. पेरणीनंतर पाणी देण्याच्या दृष्टीने सऱ्या पाडून घ्याव्या. ठिबक असेल तर अति उत्तम.

बियाणे व बीजप्रक्रिया
सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो, तर संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम अथवा काबॅन्डॅझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम या बुरशी नाशकाची प्रती किलो बियाण्यांसाठी बीजप्रक्रिया करावी तसेच केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी, विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड ७०  डब्ल्यू ए ५ ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी त्याच प्रमाणे अॅझेंटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यांसाठी वापरावे.

रासायनिक खते, आंतरमशागत
पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळवून घ्यावे, बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३0 किलो असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २0 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खत, शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सें.मी. ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २0 दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४o दिवसांनी करावी.

पाणी व्यवस्थापन
सूर्यफुलास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्धता यावरून पाणी देण्याचे नियोजन करावे. जर आपल्याकडे एक पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. जर आपल्याकडे दोन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. जर आपल्याकडे तीन पाळी देण्याइतके पाणी असेल तर आपण फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व पीक फुलो-यावर असताना म्हणजे पेरणीनंतर ५५ ते ६५ दिवसांनी तसेच दाणे भरण्याची अवस्था म्हणजे पेरणीनंतर ६५ ते ७५ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन करु नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडून दाणे पोकळ राहतात व परिणामी उत्पादनात घट येते.

पीक संरक्षण
विषाणूजन्य रोगाचा प्रसार सशोषक फुलकिंड्यांमार्फत होतो. पुलकिंडे नियंत्रणासातीं इमिडाक्लोप्रोड़ २०० एस.एल. ३ ते ५ मेिं लीं. प्रती १० लिटर  पाणी या प्रमाणात पेरणींनंतर ११ किंवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमीर्थोएट ३० टक्के प्रवाही २० मीली. प्रती १० लीटर या प्रमाणात फवारावे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफाँस ५० ईसी २० र्मिली.  प्रती १० लिटर किंवा क्वीनाॅलफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मी.ली.  प्रती १० लिटर  किंवा धायामेथेक्झाम २५ टक्के ड्ब्लूजी ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी. केसाळ अळीच्या नाश करावा किंवा काबींख्रल १० टक्के भुकटी २५ किंली प्रती हेक्ट्री या प्रमाणात  धुरूळावी. सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या र्नियंत्रणासाठी एवप्नपीकाही (HNP५) या विषाणूजन्य कीटकनाशकाची ५०० मी.ली. प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच क्रायसोपर्ला कारर्निया, लेडीबर्ड बिटल यांच्या 20,000 अळ्या रस शोषण करणा-या किडींच्या नियंत्रणाकरिता प्रादुर्भाव दिसताच शेतात सोडाव्यात.

काढणी, उत्पादन
सूर्यफुलाची पाने व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये प्रती हेक्टर ८ ते १० क्विंटल व बागायती क्षेत्रांमध्ये प्रती हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

उत्पादनवाढीसाठी पुढील महत्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे
# पीक फुलो-यात असताना सकाळी ४ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड़ गुंडाळून फुलाच्या तबकावरुन फुलाच्या बाहेरील कडेपासून मध्यापर्यंत हळुवार हात फिरवावा. यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
# सूर्यफुलाच्या फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्रॅम बोरॅक्स प्रती लीटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
# सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दर वर्षी एकाच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडतो. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीतकमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
# परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी ४ ते ५ मधमाश्याच्या पेट्या ठेवाव्यात. पीक फुलो-यात असताना किटकनाशकांची फवारणी करु नये. अन्यथा यामुळे मधमाश्यांची क्रियाशीलता कमी होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Crop ProtectionPre-CultivationSeed ProcessSunflowerआंतरपीककंपोस्ट खतकृत्रिम परागीभवनतेलवर्गीय पीकपाणी व्यवस्थापनसूर्यफुल
Previous Post

अबब.. चीनची संपत्ती 20 वर्षांत $ 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली.. अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगातील सर्वांत श्रीमंत देश

Next Post

केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण

Next Post
केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण

केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण

ताज्या बातम्या

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

राज्यातील धरणांत 87 टक्के साठा

राज्यातील धरणांत 87 % साठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2025
0

कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना

जीएसटी घटल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

आता फक्त 5% जीएसटी

शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

भारतीय बासमतीवर 50% टेरिफ

पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात होणार चांदी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

कपास किसान ॲप

कापूस विकण्यासाठी आता घरबसल्या करा देशभरातील बाजार समित्यांत बुकिंग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.