टरबूज लागवड व्यवस्थापन : टरबूज लागवडीसाठी चांगल्या निचाऱ्याची क्षमता असलेली वाळूमिश्रित चिकनमाती किंवा हलकी चिकनमाती सर्वोत्तम मानली जाते. त्याचबरोबर मध्यम ते हलके, व भुसभुशीत जमीन या पिकास योग्य असते. ज्यात टरबुजाची वेल अलगदपणे पसरू शकेल. योग्य जमीन निवडून लागवड केल्यास टरबूज चे उत्पादन भरघोस ही येते असते.
हवामान
टरबूज लागवडीसाठी उष्ण सूर्यप्रकाश व कोरडसर हवामान योग्य असते. पिकाला 22°C ते 35°C तापमान आवश्यक आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम वारा वेलीच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाची आहे. अति पाऊस किंवा वाऱ्याचा जास्त वेग असल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. योग्य हवामान आणि व्यवस्थापनामुळे उच्च दर्जाचे उत्पादन मिळते आणि नफा वाढतो.
मशागत
लागवडीच्या पूर्वी शेतास उभी व आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखरणी करावी. यामुळे शेतातील माती मोकळी होते आणि त्यातील असलेले बारीक जीवजंतू ही मारले जातात. बरोबरच जमिनीला एकसमान करणे, सिंचन करणे, लागवडी पूर्वीचे खत लावणे, शेत चांगल्या प्रकारे कुजले की त्यात १५ ते २० गाड्या शेणखत टाकणे. वेळोवेळी अशी मशागत करणे गरजेचे असते.
सुधारित वाण
सर्वोत्तम उत्पादनासाठी लागत असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम गुणवत्तेचे वाण निवड करणे. टरबूज पिकासाठी योग्य वाणाची निवड ही हिवाळी आणि उन्हाळी हंगामाच्या आधारावर केली जाते. योग्य वाण निवडल्यास फळांचे चांगले वजन, उत्पादन वाढ, आणि बाजारपेठेतील मागणी जास्त प्रमाणात आणि योग्य दरात असते. जास्त प्रमाणात टरबूजची वापरली जाणारे वाण म्हणजेच शुगर क्वीन, बाहुबली, मधुबाला, रसिका, सुपर क्वीन KSP 1358 इ.
लागवडीची वेळ
टरबूज लागवडीचा योग्य कालावधी हे स्थानिक हवामान, बाजारपेठेची मागणीवर ठरतो. साधारण टरबूजची उन्हाळ्यात जास्त मागणी असल्यामुळे त्या पिकाची लागवडीसाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या सुरूवातीचा काळ हा सर्वोत्तम ठरतो .
बियाणे व बीज प्रक्रिया
टरबूज पिकाची लागवड ही रोप व बियाणे या दोन्ही पद्धतीत होत असते. जर बियाणे पद्धतीने लागवड केली तर टरबूजसाठी हेक्टरी २.५ ते ३ kg बियाणे पुरेशे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे. योग्य आणि गरजेनुसार बियाणे निवडण करणे. टरबूज लागवड करण्याआधी तयार केलेले शेत लागवडीच्या एक दिवस आधीच आर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात ओले असलेले पाहिजे. बियाणे लावण्याआधी त्याची दिशा तपासणी गरजेचे आहे कारण योग्य दिशेत लागवड केल्यास उत्पन्न ही चांगले आणि दर्जेदार दराचे येते.
लागवड
टरबूज लागवड ही तीन वेगवेगळ्या पद्धतीत केले जाते. आळे पद्धत, सरी वरंबा पद्धत आणि रुंद गादी वाफ्यावर लागवड. ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत योग्य प्रमाणात मिसळून मध्यभागी ३-४ बिया टाकून करणे याला आळे पद्धत म्हणतात. सरी वरंबा पद्धतीमध्ये २ × ०.५ मीटर अंतरावर टरबूजासाठी ३ ते ४ बिया टाकून लावाव्या. रुंद गादी वाफ्यावर ३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टाकाव्यात.
आंतरमशागत
बी उगवून त्याची वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत वेलीच्या आजूबाजूचे सर्व तण काढून शेतजमीन भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे. शेतातील वाढलेले तण हातांनी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो आणि कडक झालेला भाग हा वेलीच्या वाढीला थांबवू शकतो. म्हणून टरबुजला आठवड्यात दोन वेळा पाणी देणे गरजेचे आहे .
कीड व रोग व्यवस्थापन
टरबूज पिकावर जास्त प्रमाणात येणारे कीड आणि रोग हे भुरी, करपा, गमी स्टेम तसेच कीड फळमाशी, फुलकिडे, पांढरी मशी येत असतात. रोगासाठी केलेले उपाय हे डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी. व टरबूजवर किड दिसल्यास मँलाँथीआँन हे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.
काढणी
साधारणपणे टरबूज उन्हाळ्या महिन्याच्या सुरुवातीस काढले जाते. काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी आणि काढणीपूर्वी 7-10 दिवस पाणी देणे थांबवा. फळाची काढणी करण्यासाठी फळ परिपक्व असायला पाहिजे जसं की फळाची वेल, फळ जाड आणि गर्द हिरव्या रंगाचे असायला पाहिजे. फळ छान उमठले की ते काढण्या योग्य झालेले असतात. टरबूज पूर्णपणे ७५ ते ९० दिवसांमध्ये तयार होतो. फळाची रंग आणि त्याच्या टनकदार आवाजावरून ते तयार असल्याची निशाणी आहे.
एकरी उत्पादन
टरबूजचे उत्पादन साधारणत हेक्टरी २०-२५ टन किंवा जास्त ही असू शकते. टरबूजला हेक्टरी खर्च २५ ते ४० हजार रुपये असू शकतो. बाजारात टरबूजची किमत बदलत असते, तरी देखील १०-१५ रुपये प्रति किलो विक्री सहज होऊ शकते.