मुंबई : Solar Agriculture Scheme… विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठा उपलब्ध होवून त्यांची विजेची समस्या कायम स्वरुपी सुटणार आहे. शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट इरिगेशन योजनांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
राज्यातील विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी महत्त्वाकांक्षी सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार प्रतिवर्षी ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर या दराने जमिनी भाडेतत्वावर घेणार असून यातून चार हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. कृषी वाहिनीचे सौर ऊर्जाकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण आणि महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रतिवर्ष असा दर ठरवण्यात आला आहे. त्यासाठी प्रथमवर्षी पायाभूत वार्षिक भाडेपट्टीच्या दरावर ३ टक्के सरळ पद्धतीने वाढ केली जाणार आहे.
भाडेपट्ट्याचे दर निश्चित करण्याचे आदेश
प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणकडील एकूण कृषी वाहिन्यांपैकी किमान ३० टक्के कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जा करण जलद गतीने केले जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणाऱ्या जमिनीसंदर्भात प्रतिवर्षी ७५ हजार प्रतिहेक्टर किंवा २०१७ च्या निर्णयात नमूद ६ टक्के दरानुसार भाडे पट्ट्याचा दर निश्चित करावा, असा आदेश देण्यात आला आहे. प्रत्येक जिह्यात योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना होणार दिवसभर वीजपुरवठा
योजनेचा शेतकऱ्यांना विशेष फायदा होणार असून शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. राज्यामध्ये शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट इरिगेशन योजना आहेत, त्यानाही या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला दिवसभर वीजपुरवठा होईल आणि त्यांची होणारी गैरसोय थांबणार आहे. सौरउर्जेचा वापर करून शेती सुजलाम सुफलाम करण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇