पुणे : राज्यात आता शेतसारा ऑनलाईन भरता येणार आहे. (Shetsara Online) भूमिअभिलेख विभागाने ई चावडी अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांमध्ये ऑनलाईन शेतसारा भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.
FarmLand Tax
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
भूमिअभिलेख विभागाच्या या सुविधेमुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांनाही शेती कर, बिनशेती कर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर, रोजगार हमी उपकर तसेच शिक्षण उपकर आदी प्रकारचे सर्व कर घरबसल्या भरण्याची सोय होणार आहे.
Shetsara Online, शेतसारा ऑनलाईन कशासाठी?
शेतसारा अर्थातच जमीन महसूल कर हा ब्रिटिशकालीन भार आहे. खरे तर इंग्रजांच्याही आधीपासून काही परकीय राजांनी जमिनीवर हा कर लावण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या काळात हा कर म्हणजेच लगान अत्यंत जुलमी पद्धतीने वसूल केला जात होता. पूर्वी शेतसारा हा या सर्व परकीय सत्तांना महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. पुढे स्वातंत्र्यानंतर नव-नवीन करांची आकारणी सुरू झाली. तरीही जमिनींवर आकारला जाणारा हा सर्वात जुना कर आजही वसूल केला जात आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार हा कर आकारला जातो. त्याची थकबाकी मोठी असून कर भरणा सोपा होऊन वसुलीत वाढ व्हावी म्हणून ही ऑनलाईन सुविधा दिली जात आहे.
ऑनलाईन शेतसाराचे सॉफ्टवेअर तयार
शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भूमि अभिलेख विभागाकडून ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच काही बदल केले गेले आहेत. जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या काळात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या सुविधेचा लाभ देण्यासाठी काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) आता यशस्वी चाचणी घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमीनविषयक शेतसारा हा महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सप्रमाणेच ऑनलाईन भरता येणार आहे.
अनेक शहरी खातेदारांना होणार फायदा
अनेक खातेदार हे शहरात राहतात. तर काही खातेदार नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. त्यामुळे या नागरिकांना आपल्या जमिनींच्या कराची माहिती मिळत नाही व कर जमा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा नागरिकांना आता हा कर भरणे सोयीचे होणार आहे.
सर्व्हे नंबरनिहाय मिळणार माहिती
या सुविधेमुळे सर्व्हे नंबर अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम (जमीन महसूल) किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे. तसेच जमिनींचा अनधिकृत वापर सुरू असल्याची माहिती मिळणार असून, त्याचा दंडही ऑनलाइन भरता येईल.
पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या गावात वापर
राज्यातील 356 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर भरणा आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शहरालगतची पाच गावे निवडण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ज्या गावात शेती तसेच अकृषिक (एनए) जमिनी आहेत, त्या गावांमध्ये या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यात नोटीसही ऑनलाईन बजावली जाणार आहे. कर भरण्याची सुविधाही ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शेती कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी
शेतीचा कर तसा कमी असल्याने या कराची वसुली अपेक्षित तेवढी होत नाही. थकबाकीची रक्कम साचत साचत हा कर वाढत जातो. त्यात तलाठी कार्यालयात गेल्यावरच थकबाकीची रक्कम ही कळते. आता सातबारा उतारा घरबसल्याच ऑनलाईन मिळत असल्याने नागरिकांना तलाठी कार्यालयातसुध्दा जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूलच होत नाही, अशी सरकारी यंत्रणेची ओरड आहे.
तलाठ्यांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन देणार
प्रत्येक महसूल विभागात आणि जिल्ह्यातही महसूल रजिस्टर नमुना लिहिण्याची पद्धत वेगळी असते. त्यातील व्यावहारिक अडचणी सोडवून ऑनलाईन संगणकीय कर आकारण्याच्या पर्यायासाठी सॉफ्टवेअर प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. लहान गावांमध्ये एनए जमिनी नसल्याने आता शहरालगतची गावे निवडून एनए कर सुद्धा आकारण्याच्या पर्यायाची चाचणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Cotton Rate 2022 – शेतकऱ्याला 10 हजारांच्या वर भाव मिळू लागताच ‘सेबी’कडून कमोडिटी बाजारात कापूस व्यवहारांना महिनाभराची स्थगिती ; कापूस विक्रीची घाई करू नका
महा ऊसनोंदणी MahaUs Nondani | व्वा, आता आपल्या शेतातूनच थेट करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाचे 1 नंबर ॲप
Comments 2