जळगाव : हरभरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. तसेच ते द्विदल वर्गीय असल्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. हरभऱ्याचा उपयोग रोजच्या जीवनात डाळीचे पीठ अथवा बेसन म्हणून केला जातो शिवाय हरभऱ्या पासून म्यालिक आम्ल सुद्धा संकलित केले जाते. हरभरा हे पीक कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी हरभरा या पिकाची निवड करण्यास हरकत नाही. जाणून घ्या.. पूर्व मशागत आणि पेरणीची वेळ.
महाराष्ट्रात हरभ-याखाली क्षेत्र वाढत जाऊन सन 2014-15 मध्ये 14.27 लाख हेक्टरपर्यंत पोहचले आणि त्यापासून 10.88 लाख टन हरभरा उत्पादित झाला. तसेच सरासरी हेक्टरी उत्पादकता 7.62 क्विंटल/हेक्टरपर्यंत जाऊन पोहचली. प्रगतशील शेतक-यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 कि. पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
मिळेल समाधानकारक उत्पादन
पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या विदर्भातील शेतकरी या पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.
शेतकरी बांधवांनी जिरायत अथवा बागायत हरभरा पेरणी वेळेवर व चांगल्या भारी जमिनीमध्ये करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मररोग प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादनशील वाणांची निवड करून त्याची बियाणे उपलब्धता वेळेवर करणे गरजेचे आहे.
हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी काही ठळक मुद्दे
हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे.
अधिक उत्पादन देणा-या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर
योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत
वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर
बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर
तणनियंत्रण
पाण्याचे योग्य नियोजन
रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण
छोटी आडवी स्ट्रीप क्रुझ कमाई
जमीन व हवामान
हरभरा पिकास मध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक 700 ते 1000 मि.मी. पर्जन्यमान असणा-या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो.
अशा जमिनीत जिरायत हरभ-याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
विशेषत: पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: 10 अंश ते 15 अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान 25 अंश ते 30 अंश सें.ग्रे. असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: 5.5 ते 8.6 सामू असणा-या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.
पूर्वमशागत
हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (25 सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात. खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पेरणीची वेळ
जिरायत हरभ-याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा 10 ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणा-या पावसाचा जिरायत हरभ-याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (10 सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (5 सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Agricultural drones : वडिलांची मेहनत पाहून मुलाने कमालच केली शेती उपयोगासाठी बनवला कृषी ड्रोन
- Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी
Comments 3