जळगाव : प्लास्टिक मल्चिंग… शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. अत्याधुनिक पध्दतीचा वापर करुन केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही तर त्यासाठी आवश्यक बाबींचाही विचार सरकारकडून केला जात आहे. ठिबक, स्प्रिंक्लर हा त्यामधलाच एक भाग आहे. पण आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती अच्छादन म्हणजेच प्लास्टिक मल्चिंग रहावे. जेणेकरुन पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास तर टाळता येतोच शिवाय किड-रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण होते. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपरचे लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे करावा हे जाणून घ्या..
मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळत आहे. विशेष: भाजीपाल्यासाठी याचा वापर वाढत आहे. वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना याची खरेदी योग्य दरात करता यावी म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात आहे. फळझाड, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती असणार आहे?
अनुदान हे सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 32,000 रुपये असून या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे.
जर डोंगराळ क्षेत्र असेल, तर प्रति हेक्टर हे 36,800 रुपये मापदंड असणार आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18,400 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.
प्लास्टिक मल्चिंग पेपरचे लाभ कोणते?
वनस्पतींची मुळे चांगली वाढतात.
शेतातील मातीची धूप रोखते.
ताणांपासून संरक्षण होते.
शेतात पाण्याचे ओलावा कायम राखते आणि बाष्पीभवन रोखते.
बागवानीमध्ये तण नियंत्रित करते आणि वनस्पतींसाठी दीर्घ काळापासून संरक्षण करते.
हे जमीन कडक होण्यापासून वाचवते.
या योजनेसाठी कोण सहभागी होऊ शकते त्यासाठी आवश्यक पात्रता काय?
शेतकरी
बचत गट
शेतकरी उत्पादक कंपनी
शेतकरी समूह
सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात.
विविध पिकांकरिता वापरावयाची मल्चिंग फिल्म कोणती?
ज्या पिकांना 11-12 महिने कालावधी लागतो. म्हणजे पपई यांसारख्या फळपिकांना – 50 मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
3-4 महिन्याच्या कालावधीत येणारे पिकांसाठी म्हणजेच भाजीपाला, स्ट्रॉबेरी इत्यादींसाठी – 25 मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
तसेच जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी – 100 किंवा 200 मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती ?
आधार कार्डची छायांकित प्रत
आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
7/12 उतारा
8-अ प्रमाणपत्र
अर्ज कोठे करावा?
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा आणि या योजनेची अधिक माहिती मिळवावी.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना : जाणून घ्या ही केंद्र सरकारी योजना 1 हेक्टर तळ्यासाठी कसे मिळवून देईल मत्स व्यवसाय कर्ज
Comments 2