ऐश्वर्या सोनवणे
किचन गार्डन म्हणजे घराच्या अंगणात किंवा छतावर लागवड केलेली छोटी बाग.. जिथे भाज्या, आणि औषधी वनस्पतींची लागवड सुद्धा केली जाते. किचन गार्डनमुळे ताज्या आणि निरोगी भाज्या सहज आपल्या मिळतात. यामुळे अन्नाची गुणवत्ता सुधारते आणि रासायनिक पदार्थांचा वापर कमी होतो. यामुळे घराच्या आसपास हिरवळ निर्माण होते.
बरीच लोक गच्चीच्या बागेसाठी सुद्धा अनेक विविध प्रकारचे रासायनिक खत व फवारणी वापरत असतात. ज्यात काही खत नकळत भाजीपाल्यांसाठी किंवा फळांसाठी धोकादायक असतात. आता त्यावर देखील एक सोपा उपाय आहे. आपण घरच्या घरीच ऑरगॅनिक खत तयार करू शकतो, तेही किचन मधल्या भाजीपाल्याच्या सालींपासून.
वेस्ट झालेल्या भाजीपाल्यापासून मिळते एनपीके
एनपीके म्हणजेच नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे आपल्याला वेस्ट झालेल्या भाजीपाल्यापासून सुद्धा मिळते. जसे की केळी, संत्रे, कोरफड, कांदा, निंबू, वटाणे आणि झेंडूच्या फुलापासून बनवले जाते. बायो एन्झाईम म्हणजेच एक ऑरगॅनिक फर्टीलायझर स्प्रे. ज्यात नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस आहे. फळाचा आकार वाढवण्यासाठी, फुलांना दाट करण्यासाठी आणि पालेभाज्यांची चांगली वाढ होण्यासाठी या ऑरगॅनिक फर्टीलायझर स्प्रेचा चांगला वापर होतो.
कसे बनवले जाते ऑरगॅनिक फर्टीलायझर स्प्रे
हे अगदी सोप्या व घरगुती पद्धतीने बनवले जाते. हा स्प्रे तुम्ही किचन मधील निघालेले पालेभाज्यांच्या सालीपासून तयार करू शकता. जसे की केळी, संत्रे, कोरफड, कांदा, निंबू, वटाणे आणि झेंडूच्या फुलापासून सुद्धा. त्यासाठी एक लिटरची पाणी बॉटल किंवा एखादे असे पात्र घ्या जात एक लिटर पाणी बसेल. त्या पाण्यात पालेभाज्यांच्या साली हे तीन ते चार दिवसासाठी टाकून ठेवावे. व त्या पाण्याला बंद करून ठेवावे. तीन तर चार दिवसानंतर ते पाणी फवारणी योग्य तयार होईल. तयार झालेल्या पाण्याची फवारणी पिकांवर करून घ्यायचे आहे. या पाण्यामुळे पिकावर कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही. व त्यामुळे कीड रोग लांब राहते.
केळीच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते. पोटॅशियम फळांचा रंग, आकार आणि चवीला सुधारतो. संत्रीच्या सालीमुळे झाडाला कीड लागत नाही, पालेभाज्याचा व फळांचा सुगंध देखील चांगला येत असतो, आणि झाडे हेल्दी राहतात. कोरफडला वनस्पती वाढीस चालना देणारा वनस्पती म्हणतात. यामुळे पिकाची वाढ चांगली होत असते. कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस जास्त असते. हे जास्त प्रमाणात फुलांसाठी वापरले जाते. या भाजीपाल्याच्या सालींपासून पिकांना एनपीकेचा डोस मिळत असतो.
या पाण्याची फवारणी वेगळी किंवा एकत्र सुद्धा करू शकता. या पाण्याला डायरेक्ट झाडाच्या मुळाशी ड्रेंचिंगद्वारे देखील देता येऊ शकते. किंवा या पाण्याची फवारणी देखील करता येऊ शकते. हे एक प्रकारे ऑरगॅनिक फार्मिंग म्हटले जाऊ शकते. निशुल्क व घरगुती बनवलेले सेंद्रिय फवारणी जे पालेभाज्यांची, फळांची, आणि फुलांची आकार, रंग सुधारत असतो.
यासाठी घ्यायची दक्षता
या पाण्याचा वापर तीन ते चार दिवसाच्या आत करावा. या पाण्याला बनवण्यासाठी लागणारा काळा सुद्धा तीन ते चार दिवस आहे. चार दिवसाच्या वर पाणी साठवून ठेवल्यास ते दमट आणि घाण वास येऊ शकतो. त्याच बॉटलमध्ये पाणी साठवण्यापूर्वी बॉटल नीट स्वच्छ धुऊन घ्यावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇