भेंडेगावातील गंगाधर व्यवहारे यांनी केली सुरुवात
भेंडेगाव (ता.वसमतनगर, जि.हिंगोली) येथील गंगाधर रुस्तूमराव व्यवहारे या शेतकर्याने एक हेक्टर जमीन क्षेत्रात तुतीची लागवड करून गत तीन वर्षापासून रेशीम कोष निर्मिती सुरू केली आहे. त्यांच्या प्रेरणेने गावातील अनेक शेतकर्यांनी तुतीची लागवड करीत रेशीम उद्योग चालू केले आहेत. रेशीम कोषाच्या विक्रीतून महिन्याकाठी गावात लक्षावधी रुपयाची उलाढाल होवून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळत आहे. वसमतनगर तालूक्यातील अन्य गावातील शेतकरी शूध्दा दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे वळत आहेत.
वसमतनगर तालूका तसा यापूर्वी केळी आणि आता हळद उत्पादनासाठी मराठवाड्यात अग्रेसर आहे. अलिकडच्या काही वर्षांपासून येथल्या शेतकर्यांचा कल तूती लागवड करून रेशीम उत्पादनाकडे वाढत आहे. याच तालूक्यातील भेंडेगावचे प्रयोगशील शेतकरी गंगाधर व्यवहारे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत गेल्या तीन वर्षांपासून रेशीम उत्पादन करत आहेत. रेशीम शेतीच्या अनुभवातून प रिसरातील 25 ते 30 शेतकर्यांना मार्गदर्शन करून रेशीम उद्योगाकडे वळवले आहे. केवळ सहावी पर्यंतच शिक्षण झालेल्या ( वय 52) असलेल्या गंगाधर व्यवहारे यांच्याकडे फक्त 3 एकर 20 गुंठ्ठेच जमीन आहे. शेती सिंचनासाठी 60 फूट खोल विहीर खोदली आहे. पूर्वी आपल्या शेतीत ते हळद, कापूस, सोयाबीन ही पीके घ्यायचे. पण गत चार वर्षांपासून पाऊस कमी होवू लागल्याने त्यांनी कमी पाण्यावर येणार्या तूतीची लागवड करून रेशीम उत्पादनाकडे वळाले आहेत.
तुती लागवडीस प्रारंभ
सुरवातीला वर्ष 2016 मध्ये त्यांनी एक एकर जमिनीची आडवी उभी नांगरणी व कुळवाच्या दोहेरी पाळ्या देवून मशागत केली. यानंतर 5 फूट रूंदीच्या सर्या तयार केल्या. सरीवर 2 फूट लांबी अंतरावर तूती कांडी बेण्याची लागवड केली. त्यास सरीने विहिरीचे पाणी दिले. काही दिवसातच तुती बेणे कांडी अंकूरली. तुतीची जोमदार वाढ होण्यासाठी 50 किलो निंबोळी पेंड, 50 किलो जैविक कल्पतरु ही खत मात्रा बेण्याच्या बुंध्याभोवती समप्रमणात देण्यात आली. दर पंधरा दिवसाआड पाणी पाळ्या देणे चालू ठेवले. जमीन काळीची असल्यामुळे तुतीस पाणी कमी लागले. तुतीवर तांबेरा व भुरी रोग येवू नये म्हणून 20 मि.ली. न्यूओक्रॉन 17 लिटर पाण्यात मिसळवून पंपाद्वारे फवारणी केली जाते.
संगोपनगृहाची उभारणी
तूती लागवडीनंतर लगेचच रेशीम अळ्यांच्या संगोपनगृहाचे उभारणीचे काम चालू केले. त्यासाठी 50 फूट लांब, 25 फूट रूंद अकाराच्या जागेत शेडबांधणी करण्याचे ठरले. चारी बाजूने खोलवर खोदून जमीनीवर सिमेंट कॉक्रेटींगने भरून घेतला. यानंतर 4 फूट उंची पर्यंत विट्यांच्या भिंतीचे बांधकाम करण्यात आले. संपूर्ण शेडमध्ये फरशी बसवण्यात आली आहे. भिंतीपासून 6 फूट उंची पर्यंत चोहूबाजूने लोखंडी जाळी बसवली आहे आणि वरती लोखंडी एंगल बसवून पत्रे बसवून संगोपनगृह शेडची उभारणी करण्यात आली आहे.
रॅकची मांडणी
संगोपनगृहाचे बांधकाम होताच आत मध्ये दोन ओळीत लोखंडी एंगल पासून बनवलेले 40 फूट लांब आणि 20 फूट रूंदीचे व त्यात प्रत्येकी 6 खाने असलेले रॅक मांडण्यात आले. रॅकमधील खान्याच्या खालच्या भागाला नायलोन बारीक दोरीपासून बनवलेली जाळी बांधण्यात येवून त्यावर रद्दी पेपरचे अच्छादन केले. थंडीच्या दिवसात उब निर्माण होण्यासाठी विद्यूत बल्ब बसवले.
प्रत्यक्ष कोष निर्मिती
रेशीम कोष उत्पादन करण्यासाठी शेडमधील चॉकी सेंटर मधून दोनशे अंडीपूंज खरेदी करून ते रॅक मध्ये आणून ठेवले जातात. रेशीम अळीच्या वाढीनुसार कोवळा तूती पाने चारा कापून आणून टाकला जातो. रेशीम अळीवर ग्रॅसरी रोगाचा प्रादूर्भाव येवू नये म्हणून दीड किलो विजेता पावडर सुती कपड्यातून हलवून हळूवारपणे अळीच्या अंगावर टाकले जाते. यामुळे ग्रॅसरी रोगाच्या प्रादूर्भावामुळे अळी क ाळी पडून दगावण्यापासून वाचते. रॅक मध्ये अंडीपूंज ठेवल्यापासून पुढे तुती चारा अळीच्या शरीर वाढीप्रमाणे दिवसातून दोन वेळा असे 16 दिवस खाऊ घातला जातो. तद्नंतर 17-18 व्या दिवशी अळी कोष निर्मितीच्या अवस्थेत गेल्यावर सुलभ पद्धतीत कोष निर्मिती करता यावी याकरिता तीच्यावर चंद्रिका अंथरली जाते. यानंतर ही अळी चंद्रिकेच्या छिद्रातून वरच्या पृष्ठभागावर जावून चंद्रिकेच्या खाप्यात तीन दिवसाच्या कालावधीत पूर्ण कोष तयार करून सुप्त अवस्थेत जाते. अंडीपूंज काळापासून रेशीम कोष तयार करण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागतो. या पद्धतीने रेशीम कोषाची निर्मिती झाल्यावर पाचव्या दिवसी तयार कोष चंद्रिकेतून काढून घेतले जातात. रेशीम कोष निघाल्यानंतर दरवेळी संगोपनगृह आतून पूर्ण निर्जंतूकीकरण करावे लागते.
रेशीम कोषाचे उत्पादन
व्यवहारे यांनी वर्ष 2016 ला एक एकरात तुतीची लागवड केली होती. त्यासाली त्यांना वर्षभरातील रेशीम कोष विक्रीतून चांगला फायदा मिळाल्याने तुतीचे क्षेत्र एक एकरहून 1 हेक्टरवर नेले. त्यांच्या प्रेरणेतून गावातील जवळपास 20 ते 25 शेतकर्यांनी गट करून रेशीम उद्योगास प्रारंभ केला तो आजही चालू आहे. त्यांनी वर्ष 2016 ते 2018 या तीन वर्षात रेशीम कोष उत्पादनाचे एकूण 13 क्रॉप घेतले असून त्यातून 18 क्विंट्टल दर्जेदार रेशीम कोषाचे उत्पादन घेतले आहे. सुरवातीस प्रति किलोला 500 रुपये दर मिळाला, तर कधी बाजारातील आवकेच्या तेजीमंदीनुसार कमीत कमी प्रति किलो 250 पासून 500 रुपयापर्यंत दर मिळाला आहे.
उत्पादन खर्च, निव्वळ उत्पन्न
रेशीम उद्योग चालू करण्यासाठी प्रथम वर्षी मोठा खर्च येत असतो. यामध्ये त्यांना संगोपनगृह बांधणीकरीता 2 लाख 50 हजार रुपये तर प्रत्येक क्रॉप घेण्यासाठी सर्व मिळून 18 हजार रुपये याप्रमाणे तीन वर्षात घेण्यात आलेल्या 13 क्रॉपसाठी 2 लाख 34 हजार रुपये खर्च आला. एकूण उत्पादन खर्च हा शेडसह 4 लाख 84 हजार रुपये आला आहे. तर रेशीम कोषाचे उत्पादन 18 क्विंटल झाले असून त्यापैकी पहिल्या वर्षीच्या 5 क्विंटलच्या कोषाला प्रति किलो 450 रुपये दर मिळाला. दुसर्या वर्षातील 650 किलो कोषास 400 रुपये प्रति किलो आणि तिसर्या वर्षाच्या 650 किलो रेशीम कोषाला सरासरी 230 रुपये प्रति किलो भाव मिळाला. यंदा रेशीम कोषाच्या दरात मंदी आली आहे. तीन वर्षात उत्पादित झालेल्या 18 क्विंटल रेशीम कोषाच्या विक्रीतून एकूण 6 लाख 34 हजार 500 रुपये त्यांना मिळाले आहेत. शासनाच्या रेशीम संचालनालय अंतर्गतच्या मनरेगा योजनेतून शेडबांधणी साहित्य व रोजगारासाठी म्हणून एकूण जवळपास 1 लाख 50 हजार रुपये आर्थिक साह्य मिळत आहे. त्यांना कोष विक्रीतून आलेले 6 लाख 34 हजार 500 रुपये व मनरेगा योजनेतून मिळालेले अर्थ साह्य 1 लाख 50 हजार रुपये म्हणजे मिळालेल्या एकूण 7 लाख 84 हजार रुपयातून आजपर्यंतचा उत्पादन खर्च 4 लाख 84 हजार रुपये वजा जाता 3 लाख रुपये रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
इतर शेतकरी प्रेरित
सुरवातीस वर्ष 2015-16 ला भेंडेगावात गंगाधर व्यवहारे यांच्या पुढाकारातून कपिल सोनटक्के आणि मुंजाजी चांदोजी व्यवहारे यांनी रेशीम शेतीस सुरवात केली. यानंतर साहेबराव व्यवहारे, मुंजाजी गंगाधर व्यवहारे, लिंबाजी व्यवहारे, मदन व्यवहारे, टोपाजी विश्वनाथ सोनटक्के, कल्याण ज्ञानोबा कोल्हे, ज्ञानोबा पांडूरंग व्यवहारे यासह एकूण 25 शेतकर्यांनी तुतीची लागवड करीत संगोपनगृहाचे बांधक ाम करून रेशीम उद्योग चालू केला. सध्या भेंडेगाव शिवारात 30 ते 35 एकरावर तुतीची लागवड झाली आहे. अजूनही त्यात वाढ होत आहे. रेशीम कोषाच्या विक्रीतून महिन्याकाठी गावात लक्षावधी रुपयाची उलाढाल होवून शेतकर्यांना खात्रीलायक उत्पन्न मिळत आहे.
विक्री व्यवस्थापन
समुहाने रेशीम कोष निर्मिती करणार्या रेशीम उत्पादक शेतकर्यांचे रेशीम कोष निघाल्यानंतर ते जमा करून ते एका बारदान डागात भरून पॅक केले जातात. 20 किलोचा एक डाग केला जातो. सगळ्यांचे रेशीम कोष डाग एका वाहनातून नांदेड येथील रेल्वे स्थानकावर नेले जावून तेथे त्याचे वजन करून नांदेड – बंगळूर रेल्वे गाडीच्या पार्सल डब्यातून ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे नेवून तेथील रामनगरातील कुकूनच्या रेशीम कोष विक्री बाजारात नेले जातात. तेथील व्यापारी एबीसी असी कोषाची प्रतवारी करून चालू दरानुसार बीट पुकारुन कोषाची खरेदी करतात. वजन व प्रति किलो दरानुसार शेतकर्यांना कोषाचे लगेच पैसे अदा केले जातात.
प्रतिक्रिया
रेशीम प्रक्रिया उद्योग उभारावेत
कर्नाटक राज्यातील सुमारे 75 टक्के शेतकर्यांकडे रेशीम कोष निर्मितीचे उद्योग आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर रेशीम कोषावर होणारे प्रक्रिया उद्योगही आहेत. त्यांच्या कोषाला महाराष्ट्रातील कोषापेक्षा दर अधिक मिळतो. त्यांच्या तुलनेत आपल्याला कमी दर दिला जातो. कर्नाटक सरकार तेथील रेशीम उत्पादक शेतकर्यांना दरात मंदी असो की, तेजी कोषाला प्रति किलो 75 रुपये अनुदान देते. त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील रेशीम उत्पादक शेतकर्यांना किलोला 100 रुपये अनुदान देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रेशीम कोष खरेदी विक्री बाजारातील मंदीच्या काळात कोषाचे दर एकदम प्रति किलो 200 ते 250 रुपयावर खाली कोसळतात. अशा वेळी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते. अनुदानामुळे शेतकरी रेशीम उद्योगात टिकून राहून हा रेशीम उद्योग महाराष्ट्रात तग धरून राहू शकेल. याशिवाय राज्यात रेशीम कोषावर प्रक्रिया करणारे उद्योग प्रकल्प तात्काळ उभारणे तितकेच महत्वाचे आहे.
- गंगाधर रुस्तूमराव व्यवहारे
रा. भेंडेगाव, ता. वसमतनगर जि.हिंगोली
मो.नं. 7888290038.
रेशीम शेतीमुळे आर्थिक सुबत्ता
मी शेतीत एक एकर तुतीची लागवड तीन वर्षापूर्वी केली आहे. रेशीम कोष निर्मितीचा उद्योग सातत्याने चालवत आहे. बोअरवेलचे पाणी तुतीला दिले जाते. माझ्या कुटूंबात रेशीम उद्योग शेतीमुळे आ र्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. परंतू, जमीन 5 एकर पेक्षा अधिक असल्यामुळे मनरेगा योजनेतून शेडसाठी दिली जाणारी आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे मला दुसर्याच्या संगोपनगृहात रेशीम क ोषाची निर्मिती करून घ्यावी लागते. वर्षभरातील 6 बॅचच्या उत्पादनातून जवळपास 420 किलो कोष निर्मिती होते. किलोला सरासरी 400 भाव मिळला. विक्रीतून 1 लाख 68 हजार रुपये येतात. यातून 40 हजार रुपये उत्पादन खर्च जाता 1 लाख 28 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
- मुंजाजी चांदोजी व्यवहारे
मो.नं. 9607667765
शेतकर्यांच्या सभा घेवून त्यांना रेशीम उद्योग विषयीच्या योजनांची माहिती वेळोवेळी द्यावी लागते. रेशीम उद्योग हा कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी मनुष्यबळात करता येणारा व अधिक उत्पन्न देणारा शेतीपुरक उद्योग आहे. नैसर्गिक आपत्तीत सुरक्षित असल्याने थोडीफार पाण्याची सोय असणार्या प्रत्येक शेतकर्याने एक तरी एकर तुतीची लागवड करून आपल्या शेतीत रेशीम उद्योग चालू केला पाहिजे. यासाठी शासन मनरेगा योजनेंतर्गत शेतकर्यास रेशीम किटक कोष निर्मिती करण्यासाठी संगोपनगृह बांधणी साहित्यासाठी 49 हजार रुपये व वर्षात 201 दिवस प्रति दिवस 203 रुपये रोज मनुष्य दिवस आर्थिक मदत देते. तसेच चंद्रिका, निर्जंतूकीकरण औषधी, कपडा याच्या खरेदीकरिता 32 हजार रुपये मदत देते. यामुळे गट समुहाने रेशीम उद्योग शेती करणार्या शेतकर्यास आर्थिक पाठबळ मिळून हा व्यवसाय वृंध्दीगत होत आहे. याच पद्धतीने भेंडेगाव येथील शेतकर्यांनी गत तीन वर्षापासून रेशीम उद्योग चालू केले आहेत.
- जी.एम. मिसाळ
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
जिल्हा रेशीम कार्यालरेशीम उत्पादनातून लाखोंची उलाढालय, हिंगोली.
मो.नं. 8329363388, 9850447096.