जळगाव : Kisan Diwas… आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? की तो फक्त 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वास्तविक, हा विशेष दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे मसिहा चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे मसिहा म्हणूनही ओळखले जातात. चौधरी चरणसिंग यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सालापासून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्याचा घेतला निर्णय
शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरणसिंग यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते
देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते. शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करणे हा या विशेष दिवसाचा उद्देश आहे. देशात या निमित्ताने शेतकरी जागृतीपासून अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत.
शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न
हा दिवस साजरा करण्यामागील आणखी एक उद्देश असा आहे की, यातून समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण घेऊन सक्षम बनवण्याची कल्पना येते. शेतकरी दिन साजरे केल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल लोकांना शिक्षित केले जाते.
कोण होते चरण सिंग ?
चौधरी चरण सिंग यांचा जन्म पिता चौधरी मीर सिंग व माता नेत्रा कौर यांच्या परिवारात, २३ डिसेंबर १९०२ रोजी, उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथील नूरपूर या गावी झाला. खूप गरिबी अनुभवून शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले. राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले. म्हणूनच आजही शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून चरण सिंग प्रत्येकाच्या आठवणीत आहेत.
पार्श्वभूमी
चरण सिंग यांनी नूरपूर गावातूनच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मॅट्रिक ते मेरठच्या सरकारी शाळेतून उत्तीर्ण झाले. चरण सिंग यांनी विज्ञान, कला क्षेत्रात पदवी मिळवली आणि पुढे ते वकील झाले. एकंदरीतच चरण सिंग यांचे बालपण अत्यंत साधे व गरिबीत गेले. अनेक मजदूर, शेतकरी इत्यादी लोकांच्या सहवासात ते वाढले होते. चरण सिंग यांचे वडील स्वतः शेतकरी होते. कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती तेव्हा जशी होती आत्ता सुद्धा तशीच आहे.
आपण जिथे जन्म घेतो, ज्या परिस्थिती मध्ये वाढतो आणि ज्या समाजात राहतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. अश्याच शेतकऱ्यांची गरिबी, दुःख त्यांच्या समस्या जवळून अनुभवणाऱ्या व मजदूर आणि शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या चरण सिंह यांनी पुढे आयुष्यभर शेतकरी आणि मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न केलेत.