मुंबई : Kavada Pakshi… शेतीपूरक व्यवसाय म्हणून आजही ग्रामीण भागात कुक्कुटपालन केले जाते. हा व्यवसाय शेतक-यांसाठी सर्वात सोयीस्कर जोडधंदा असून त्याच्या व्यवस्थापनातील खर्चसुद्धा शेतक-याला परवडणारा आहे. सध्या जास्तीत-जास्त ग्रामीण युवक कुक्कुटपालनाकडे वळत आहे. पण असाच एक पक्षी आहे. ज्याची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा महाग आहेत. पण त्या पक्ष्याला पाळण्यासाठी लायसन्स असावं लागतं. त्याचं मांसही कोंबडीपेक्षा चांगल्या किमतीत बाजारात विकलं जातं असून तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता.
भारतातल्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन हा जोडधंदा आहे. अनेक शेतकरी शेतीसोबत कोंबड्या पाळतात, तर अनेक जण पोल्ट्री फार्म सुरू करून हा व्यवसाय करतात. त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवतात. पण, फार कमी लोकांना माहिती असेल की ग्रामीण भागात आणि जंगलात कवडा नावाचा एक पक्षी आढळतो.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
का लागतं लायसन्स?
या पक्ष्याला हिंदीत तितर असं म्हणतात. हा पक्षी वर्षभरात जवळपास 300 अंडी घालतो. तुम्ही कवडापालन करून कुक्कुटपालनापेक्षा जास्त नफा मिळवू शकता. मात्र, का लागतं लायसन्स? कवडा हा जंगली पक्षी आहे. त्याचं मांस खूप चविष्ट असतं आणि खवैये मोठ्या आवडीने खातात. सध्या या पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. याच कारणामुळे भारत सरकारने त्याच्या शिकारीवर बंदी घातली आहे. कवडा पालन करायचं असेल तर त्यासाठी सरकारकडून लायसन्स घ्यावं लागेल. हा पक्षी जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत अंडी घालण्यास सुरुवात करतो. त्याचा व्यवसाय फार कमी वेळात सुरू करता येतो.
फक्त 4-5 कवडा पक्ष्यांचं पालन करून सुरु करा व्यवसाय
सरकार शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदतही करतं. असं केल्याने कवडा पक्ष्यांची संख्याही वाढेल आणि शेतकऱ्यांना नफाही मिळेल. अन्न आणि जागेची गरज कमी कवडा पक्ष्यांचा आकार लहान व वजन कमी असल्याने त्याला अन्न व जागेची गरजही कमी असते. व्यवसायासाठी गुंतवणूकही खूप कमी असते. केवळ 4-5 कवडा पक्ष्यांचं पालन करून त्याचा व्यवसाय सुरू करता येतो. त्याचं मांसही कोंबडीपेक्षा चांगल्या किमतीत बाजारात विकलं जातं. ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
या अंडीत मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात
कवडा पक्ष्यांची अंडी विविधरंगी असतात. त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन, फॅट आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. प्रति ग्रॅम पिवळ्या बलकामध्ये 15 ते 23 मिलिग्राम कोलेस्टेरॉल आढळते. अनेक प्रकारच्या आजारांमध्ये कवडा पक्ष्यांच्या अंड्यांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇