बाजार भाव

कापसाला येथे मिळतोय सर्वाधिक दर ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

पुणे : गेल्या वर्षी कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र, कापसाला हवा तसा दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना अखेर हा कापूस विकावा लागला. दरम्यान, यावर्षी कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज सर्वाधिक दर हा हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर हा 7 हजार 200 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 445 रुपये मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक देखील हिंगणघाट बाजार समितीत झाली.

 

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कापसाला भाव मिळत आहेत. तसेच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला काल (दि. 21) रोजी 7,100 ते 7,200 इतका भाव मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (21/11/2023)

संगमनेर क्विंटल 150 6550
समुद्रपूर क्विंटल 736 7200
मारेगाव क्विंटल 1095 7050
उमरेड क्विंटल 460 7050
वरोरा क्विंटल 1455 7200
वरोरा-खांबाडा क्विंटल 595 7200
नेर परसोपंत क्विंटल 56 7025
काटोल क्विंटल 165 7050
सिंदी(सेलू) क्विंटल 125 7180
बारामती क्विंटल 14 6750
हिंगणघाट क्विंटल 4200 7200
वर्धा क्विंटल 1200 7150

 

Planto Advt
Planto

 

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button