• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकरी महिलांचे कष्ट कमी करणारी अवजारे

Team Agroworld by Team Agroworld
April 27, 2019
in तांत्रिक
0
शेतकरी महिलांचे कष्ट कमी करणारी अवजारे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


शेती काम करताना लागणारे श्रम आणि वेळ वाचविण्यासाठी काही सोपे अवजारे उपलब्ध आहेत. विशेषतः या अवजारांच्या वापराने शेतात काम करणार्‍या महिलांचे कष्ट कमी होण्यास मदत होते. ही अवजारे कमी किंमतीची असून योग्यरितीने वापर केल्यास देखभालीवर खर्च देखील करावा लागत नाही.
प्रा. दीप्ती पाटगावकर


  • कापूस वेचणी कोट
    कापूस वेचणीचे काम करण्यासाठी खास कोट तयार करण्यात आला आहे. खास कापडापासून हा कोट तयार करण्यात आला आहे. याला पुढील बाजूला वेचलेला कापूस ठेवण्यासाठी खिसा आहे. या खिशात जळपास पाच किलो कापूस मावतो. यामुळे कापूस वेचणी करताना काम वेगवान होते. या कोटमुळे शरीराचे देखील संरक्षण होते.
    सायकल कोळपे
    सायकल कोळपे हे वापरण्यास अत्यंत सोपे व स्वस्त आहे. या कोळप्याचे चाक दोन फूट व्यासाचे आहे. याला मागील बाजूस तण काढण्यासाठी पास जोडलेली आहे. चालविण्यासाठी सायकल सारखे हँडल आणि स्क्रु लावलेले आहे. यामुळे दोन तासातील अंतराप्रमाणे पास कमी जास्त करता येते. या यंत्राच्या साहाय्याने एक व्यक्ती एका दिवसात एक एकर शेतातील आंतरमशागत करु शकतो.
    दातेरी हात काळपे
    या कोळप्याचा वापर आंतरमशागतीसाठी व पिकाच्या ओळीतील तण काढण्यासाठी होतो. यामध्ये एक व्ही आकाराची पास लावलेली आहे. यासमोर दातेरी रोलर दिलेला असून हे अवजार मागे-पुढे चालवितात. दोन्ही हातांनी हँडल पकडून रोलरवर दाब द्यावा लागतो. यामुळे रोलरने तणांचे तुकडे होतात आणि माती मिसळतात. व्ही आकाराच्या पासामुळे तण मुळासहित उपटले जाते.
    खत कोळपे
    पिकाला खत देताना जमिनीतून देणे आवश्यक आहे. यासाठी खत कोळपे हे प्रभावी आहे. पिकाला खत देण्याबरोबरच आंतरमशागतीचे काम देखील याद्वारे होते. यामुळे दोन्ही प्रकारची कामे एकाच वेळी होऊन श्रम आणि वेळीची मोठी बचत होते.
    धसकटे गोळा करण्याचे अवजार
    पीक काढणीनंतर व वखणीनंतर धसकटे गोळा करण्याचे अवजार सोयीचे आहे. हे अवजार वजनाने हलके असल्याने एक महिला देखील याचा वापर करु शकते. यात दीड ते सव्वादोन फुटी लोखंडी अँगलला दर अर्धा इंच अंतरावर 3 इंच असलेली लोखंडी सळी लावलेली आहे. सळईचे जमिनीतले टोक अनुकुचीदार असते. याचे हँडल 5 फुटी असून बाबूंचे किंवा हलक्याचे लोखंडी पाईपचे असते. यामुळे वाकण्याची गरज पडत नसल्याने काम सोपे होते.
    पोते भरण्याची चौकट
    पोते भरण्यासाठी लोखंडी अँगलपासून चौकट बनवली आहे. या चौकटीस हुक असून यामध्ये पोते अडकविता येते. यामुळे पोते हे पूर्णपणे भरले जाते आणि शिवतानाही सोपे होते. स्टँडची उंची ही कमी जास्त करता येते. या चौकटी एका व्यक्तीचे काम वाचते.
    शेंगा तोडणी चौकट
    शेंगा तोडणीसाठी 2 बाय 2 बाय 1 फूट आकाराची चौकट आहे. या चौकटीच्या साहाय्याने एका वेळी चार व्यक्ती शेंगा तोडणी करु शकतात. शेंगा असलेल्या वेलीला तोडणी चौकटीवर धरुन तोडणी केली जाते.
    भुईमूग शेंगा फोडणी यंत्र
    शेंगा फोडणी यंत्रात एक फ्रेम असून त्याच्या तळाशी एक अर्धवर्तुळाकार जाळी दिलेली आहे. याच्या मध्यावर एक हँडल असून त्याच्या फ्रेममधील टोकाशी एक कॉस्टिंगचा दातेरी फ्लाट दिलेली आहे. शेंगा यंत्रात टाकल्यानंतर दांडीच्या सहाय्याने शेंगा फोडणीसाठी दिलेली दातेरी कास्टिंग हालविली जाते. कास्टींग व जाळी यामध्ये शेंगा येऊन त्या फुटतात. यात शेंगादाणे फुटीचे प्रमाण केवळ 3 ते 4 टक्केच आहे. आठ तासात साधारण 80 ते 90 किलो शेंगा फोडणीचे काम हे यंत्र करते. भुईमुग शेंगा सोबतच एरंडी बिया देखील या यंत्राने फोडता येते.
    पळ्हाट्या उपसणी अवजार
    कापसाच्या पळ्हाट्या उपटण्यासाठी खाली वाकुन जोर लावून ते उपटावे लागतात. यामुळे हात, पाठ व कंबरदुखीचा त्रास हातो. यासाठी चिमट्याचा वापर करणे फायद्याचे आहे. यात एक चिमटा असतो. त्यामध्ये पळ्हाट्या पकडून लिव्हरच्या साहाय्याने ते उपटावे लागते. याचे हँडल उंच असल्याने खाली न वाकताच सहजपणे पळ्हाट्या उपटा येतात. या चिमट्याचे वजन सव्वापाच किलो असून एक व्यक्ती एका तासात 50 वर्गमीटर एवढ्या क्षेत्रातील पळ्हाट्या काढू शकते.
    वांगे, भेंडी तोडणीचे हातमोजे
    शेतीत महिलांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. विशेषतः किचकट कामे ही त्यांनाच करावी लागतात. खूरपणी, कापणी, भाजीपाला पिके असतील तर त्यांची काढणीची कामे करावी लागतात. ही कामे करत असताना काही वेळा शारिरीक इजा होण्याचा संभव असतो. भेंडी आणि वांगे काढणीचे काम महिला करतात आणि हे जिकरीचे आहे. तोंडणी करताना हातांना इजा होवू नये, यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयाने खास हातमोजे तयार केले आहेत.
  • वांगी व भेंडी तोडणीसाठी तयार करण्यात आलेले हातमोजे हे सुती कापडापासून तयार करण्यात आले आहेत.
  • या मोज्यांची उंची हाताच्या कोपरापर्यंत असल्याने संपूर्ण हात यामुळे झाकले जातात. यामुळे हाताला काटे टोचणे किंवा खरचटणे हे प्रकार टळतात.
  • यामुळे भेंडी आणि वांगे सहज तोडता येत असल्याने कमी वेळात जास्तीचे काम होते.
  • या मोज्यांना हाताच्या जाडीनुसार समायोजित करण्याची व्यवस्था आहे.
  • शेतकरी महिला गटांना या मोज्यांची निर्मिती करुन विक्रीचा व्यवसाय करता येईल.
    रब्बी पेरणी यंत्र
    रब्बी पिकांची पेरणी करताना ओलाव्यासाठी खोलवर करावी लागते. यासाठी रब्बी पिकांसाठी खास पेरणी यंत्र उपलब्ध आहे. या यंत्रामध्ये लोखंडी फण असून खास रचना केली आहे. हे यंत्र तिफणीद्वारे 13 ते 15 सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करु शकते. या यंत्राद्वारे बी आणि खते पेरणी अशी दोन्ही कामे एकत्रित करता येतात. यामुळे वेळेची बचत होऊन योग्यरित्या पेरणी होते.
    मो.नं.9404988770
    (लेखिका औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक आहेत.)

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कापूस वेचणी कोटखत कोळपेदातेरी हात काळपेभुईमूग शेंगा फोडणी यंत्रसायकल कोळपे
Previous Post

सोने तारण पीककर्जाचा पर्याय

Next Post

दुष्काळी परिस्थितीत फळबागेचे व्यवस्थापन

Next Post
दुष्काळी परिस्थितीत फळबागेचे व्यवस्थापन

दुष्काळी परिस्थितीत फळबागेचे व्यवस्थापन

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.