• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पाचटात हळदीचे भरघोस पीक

Team Agroworld by Team Agroworld
June 11, 2019
in तांत्रिक
0
पाचटात हळदीचे भरघोस पीक
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

हळद हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे जमीनीतील हवेच्या व्यवस्थापनास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उघड्या जमीनीतील पाण्याचे बाष्पीभवन झाले की पाण्यातील अविद्रव्य क्षार वरील थरात साचतात आणि हवेचे व्यवस्थापण बिघडवितात. त्यामुळे विनाखर्चीक आच्छादित जमीनीत हळदीची लागवड केली तर पूर्वमशागत व अंतरमशागतीवरील खर्चात पूर्ण बचत होते. जमीनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारल्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापणावरील ५० टक्के पेक्षा अधिक खर्चात बचत, रासायनिक खताची कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यामुळे होते आणि जैविक गुणधर्म सुधारल्यामुळे पूर्वी दिलेल्या रासायानिक खतातील अन्नद्रव्य जे की मातीच्या कणावर स्थिर झालेले असतात ते सुध्दा हळदीच्या पिकास उपलब्ध होतात.

१.    हवामान –

     हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. थंडीचालु होण्यापुर्वी जेवढी निरोगी कायीक वाढ अधिक तेवढे उत्पादन अधिक हा ठोकताळा लक्षात ठेवावा. हळदीचे पीक व्यवस्थित येण्यासाठी २४ ते ३५ से.ग्रे. तापमान आवश्यक असते.

२.    जमीन –

     या पिकास मध्यम प्रतीची तसेच निचरा चांगला होणारी जमीन आवश्यक आहे. पाचटामुळे जैविक गुणधर्म सुधारत असल्याने मध्यम भारी जमीनीत सुध्दा लागवड करण्यास हरकत नाही. चुनखडीयुक्त जमीन या पिकाला उपयुक्त नाही.

३.    सुधारीत वाण –

     फुले स्वरुपा, सेलम, कडाप्पा, राजापूरी इत्यादी सुधारीत वाण असून फुले स्वरुपा या वाणामध्ये कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के जे की सर्व वाणामध्ये जास्त असून हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विंटल प्रती हेक्टरी आहे.

४.    हळद लागवड पद्धत –

     ऊसाचे दोन खोडवे घेतल्यानंतर पूढील पिकासाठी कोणतीही मशागत न करता ठिबक सिंचनचे लॅटरवरील ड्रीपरच्या जवळ दोन्ही बाजूस प्रक्रीया केलेले हळदीचे बेणे ५ ते ७ से.मी. खोल दाबुन घ्यावे यासाठी गरजे ऐवढे ऊसाचे पाचट बाजूला करुन बेणे लागवड वरंब्यावर करावी.

     हळदीची लागवड १५ मे ते ७ जून या कलावधीत पाण्याची उपलब्धता व तापमान विचारात घेऊन करावी. बेणे ३० ग्राम पेक्षा वजनाने मोठे, डोळे फुगलेले असावेत तसेच कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे वापरु नये. लागवड ड्रीपरच्या दोन्ही बाजूस ३० से.मी. वर करावी. कंदमाशी या किडीपासून आणि बुरशीजन्य रोगापासून सरंक्षण मिळण्यासाठी बेणे क्विनॉलफॉस २५ ई.सी. – १४ मिली + बावीस्टीन २० ग्राम – १० लि पाण्यात १५ ते २० मिनीट बुडवून लागवडीसाठी वापरावे. एकरी १००० कि.ग्रा. बेणे लागते.

५.    अन्नद्रव्य व्यवस्थापन –

     पूर्व मशागतीच्या वेळेस शेणखताच्या वापर आवश्यक असला तरी ऊसाचे पाचट कुजण्याच्या प्रकीयेत सेन्द्रीय अन्नद्रव्याचा पूरवठा पिकास होतो त्यामुळे शेणखत टाकावयाची आवश्यकता नाही. रासायनिक खताची शिफारस २०० : १०० : १०० कि.            नत्र : स्फुरद : पालश प्रती हेक्टरी आहे. पाचटामुळे जैविक गुणधर्मात सुधारणा झाल्यामुळे पूर्वीच्या पिकास टाकलेल्या स्फुरद व पालाशचे उपलब्धीकरण या पिकास होते. तसेच नत्राची मात्रा फवारणीच्या माध्यमातून द्यावी पहिली फवारणी १ टक्के युरीयाची लागवडी नंतर सहा आठवड्यानी, दुसरी फवारणी पीक अडीच ते तीन महिन्याचे झाल्यानंतर २ टक्के युरीयाची करावी. तसेच १९ : १९ : १९ / १३ : ० : ४५ व ० : ५२ : ३४ या विद्राव्य खताच्या फवारण्या ५ ग्राम प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिकाच्या वाढीची अवस्था विचारात घेऊन कराव्यात. तसेच सुक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारण्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्या तरच घ्याव्यात. ठिंबक द्वारेही द्रवरुप खते देता येतात.

६.    आंतरमशागत –

     ऊसाच्या पाचटामुळे तण खुरपणी किंवा तणनाशक वापरण्याची आवश्यकता नाही. हळदीच्या लागवडीनंतर अडीच ते तीन महिण्याने गड्डे उघड पडले असले तर गड्यांना माती लावून झाकणे आवश्यक आहे. ऊस फुटला असेल तर ग्लायसेल सारख्या तण नाशकाचा वापर बेणे उगवणीपुर्व करावा किंवा कापून जनावरास वैरण म्हणून वापर करावा.

७.    पाणी व्यवस्थापन –

     लागवडीपूर्व ठिंबकद्वारे १२ ते १४ तास ओलवा निर्माण करावा आणि नंतर प्रक्रीया केलेले बेणे लावावे. नंतर पाणी दररोज ठिंबक १ ते २ तास चालवावे. उगवणीनंतर पाण्याची गरज वाढते. तद्नंतर ठिंबक सिंचन सुर्यप्रकाशाची तीव्रता, जमीन आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन चालू ठेवण्याचे नियोजन करावे. पाचटामुळे पाणी कमी लागते. पीक काढणीच्या अगोदर १५ दिवस पाणी बंद करावे.

८.    आंतरपिके –

     पाऊसाळ्यात योग्य अंतरावर तुरीसारखे पीक घेतले भविष्यात हळदीभोवती आर्द्रता वाढण्यास मदत होते आणि त्याचा उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच तुरीचे अतिरिक्त उत्पादनही मिळते. मिरची, कोथीबींर इत्यादी सारखी अंतरपीक म्हणून घेण्यास हरकत नाही.

९.    कीडनियंत्रण –

     १)  कंदमाशी – आकाराने डासासारखी पण मोठी व काळसर रंगाची असते. अळी पिवळसर असून पाय नसतात. या किडीच्या अळ्या गड्यामध्ये शिरुन त्याच्यावर उपजीवीका करतात नियत्रंणासाठी गड्डे मातीने झाकुन घ्यावेत तसेच क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली १० लिटर पाण्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान २ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात.

     २)  पाने गुंडळणारी अळी – ऑगस्टच्या शेवटच्या आढवड्यापासून ते नोव्हे दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येते रोगोर ०.५ टक्के या किटकनाशकाची फवारणी करावी.

१०.   रोगनियंत्रण –

     १)  कंदकुज – कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत जास्त प्रमाणात येतो. खोड लगतचा भाग काळपट राखी पडतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले घाण वास येणारे पाणी बाहेर येते.

           शेतातील पाण्याचा निचरा करावा. मेटॅलॅक्झिल ८ टक्के आणि मँकोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्राम प्रती लिटर प्राणी या प्रमाणे ठिंबकमधून ड्रेचींग करावी.

     २)  पानावरील ठिपके – लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सुर्याकडे धरुन पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबुस राखी रंगाचा दिसतो. या रोगाची तीवृता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. १ टक्के बोर्डोमिश्रणाची १५ ते २० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

११.   काढणी –

     चांगले उत्पादन देणाऱ्या हळद पिकाची ८.५ ते ९ महिण्यानी काढणी करावी. पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते व पाने जमीनीवर लोळतात. ६० ते ८० टक्के पाने वाळतात. ही पाने कापून वेगळा करावे. पाने कापल्यास हलके एक पाणी द्यावे म्हणजे वापसा आल्यावर व शेत खोदल्यावर मोठी ढेकळे निघणार नाहीत. कुदळीने गडडे खोदुन काढावेत. हाळकुंडे व गोल गड्डे असे प्रतवारी करुन सावलीत ठेवावे कारण पुढील वर्षी गोल गडडे लागवडीसाठी वापरावयाचे असतात.

१२.   उत्पादन –

     ओल्या हळदीचे सर्वसाधारणपणे हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल येते. या व्यतिरिक्त २५ ते ३० क्वि गोल गडडे मिळतात. तसेच पॉलीश केलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विं. उत्पादन येते. ओल्या १०० कि.ग्रा. हळदीपासून १५ ते २२ कि.ग्रा. पॉलीश केलेली हळद मिळते.

१३.   साठवण –

     काढणीनंतर गोल किंवा जेठे गड्डे सावलीत ढीग करुन साठवितात. एक ते दीड महिण्यांनी गड्डयाच्या मुळया, पुर्णपणे कुजलेले गडडे अलग करुन नष्ट करावेत. नंतर निवडलेल्या गड्डयाची गोलाकार रास करुन त्यावर पाला झाकुन ते वारा खेळेल अशा जागी सावलीत साठवावेत. दर १५ दिवसांनी गडडे हलवावे.

१४.   हळद शिजवणे –

     प्रेशर कुकरचा वापर करुन किंवा डिझेलच्या बॅलरपासून बनविलेले दिड फुट उंचीचे व दोन फुट व्यासाचे ४-५ सच्छिद्र ड्रम पाच फुट व्यासाच्या कडई मध्ये पाणी ओतून शिजवतात.

डॉ. गुरुनाथ थोन्टे

एम.एस्सी. (कृषी) पीएच.डी.

मो.नं. 9421695448

सेवानिवृत्त अधिकारी,कृषि विभाग,लातूर.

Email –  gurunaththonte@rediffmail.com

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कीडनियंत्रणहळद
Previous Post

ऊस खोडवा व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान

Next Post

नोकरी अन् शेती सांभाळून यशस्वी शेळीपालन

Next Post
नोकरी अन् शेती सांभाळून   यशस्वी शेळीपालन

नोकरी अन् शेती सांभाळून यशस्वी शेळीपालन

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.