हरभरा पिकामध्ये घाटेअळी ही मुख्य कीड आहे. हरभरा पिकाचे घाटेआळी मुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. पीक ३ आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक आळया दिसू लागतात, पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खालेले दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब महत्त्वपूर्ण ठरतो.
फुलगळ थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. एकाएकी अचानक खराब वातावरणामुळे फुलगळ होण्यास सुरुवात होते व ते थांबण्यास किंवा थांबण्याचे नावच घेत नाही तर यासाठी आपण फुलगळ थांबविण्यासाठी करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना कोणते स्प्रे दिली पाहिजे याविषयी महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत.
फुलोरा तयार होणाऱ्या कालावधीत, मातीमध्ये पोषणाचा तुटवडामुळे फुलांची गळणी होऊ शकते. तसेच फुलोरा तयार होण्याच्या नंतर, ४५-६५ दिवसांच्या कालावधीत फुलांची गळणी होऊ शकते. यामध्ये उष्णतेचे प्रमाण आणि पाणी व्यवस्थापन प्रमुख कारणे ठरतात. हरभरा फुलगळ रोखण्यासाठी 1 टक्के 13:00:45 या विद्राव्य खताची फवारणी केल्यास पिकांचे पेशीमधील अन्ननिर्मीतीची क्रीया जोमाने होवून फुलगळ कमी करतात येवू शकते. किंवा प्लॅनोफिक्स 15 लिटरच्या पंपात 5 एम एल टाकून फवारणी करणे.
घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण
घाटेआळीच्या एकात्मिक नियंत्रण पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य किटकनाशके, जैविक कीटकनाशक, यांत्रिकि व मशागतीय पद्धतीने किडनियंत्रण, आंतरपिके व मिश्रपिके, कामगंध सापळे यांचा वापर व रासायनिक पद्धतीने किडनियंत्रण इ. पद्धतींचा समावेश होतो.
पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी शेतामध्ये पेरावी. या पिकाचा मित्र किडीच्या आकर्षण यासाठी उपयोग होतो पर्यायी घाटे अळीचे नियंत्रण होते.
पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मिटर अंतरावर एका हेक्टरमध्ये ५० ते ६० तूर काटक्यांची मचाणी लावावीत. त्यावर कोळसा, चिमण्या, साळुंख्या असे पक्षी येतात आणि आळ्या टिपून खातात.
घाटे आळीची अर्थिक नुकसान पातळी समजण्याकरिता हेक्टारी ५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
सलग दोन ते तीन दिवस घाटेअळीचे ८ ते १० पतंग सापळ्यात आढळून आल्यास किंवा हरभरा पिकात एक मीटर लांब ओळीत दोन आळ्या आढळून आल्यास किंवा १.५ टक्के घाट्यावर उपद्रव दिसून येताच घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
पिकांच्या फेरपालट याकरिता तृणधान्य अथवा गळित धान्याची पिके घ्यावीत.
पेरणीपुरवी जमिनीची खोल नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात म्हणजे घाटेआळीचे जमिनीतील कोष जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन त्यांचा सूर्याच्या प्रखर उष्णतेने व पक्षांपासून नाश होतो.
उपाययोजना व फवारणीची वेळ, कीटकनाशक व प्रमाण
पहिली फवारणी पिकास (फुलकळी लागण्याच्या वेळेस)
निंबोळी पावडर – २५ किलो निंबोळी पावडर रात्रभर ५० लिटर पाण्यात भिजत ठेवावी.सकाळी कापडाच्या साह्याने अर्क काढून त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे. हे द्रावण एक हेक्टर क्षेत्रात फवारावे.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीच्या १० ते १५ दिवसानंतर)
हेलिओकि -५०० मिली ५००लिटर पाण्यातून प्रति हेक्टीरी फवारावे.
तिसरी फवारणी (जास्तीत जास्त घाटे लागल्यानंतर)
इमामेक्टिन बेंझोएट – ५ टक्के एस .जी. ४ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.