तूर
* तूर हे पीक अति पावसाला संवेदनशील आहे म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहिलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. तूर पिकात फाईटोप्थेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी चारही बाजूने एक मीटर अंतरावर कार्बेन्डाझिम 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
* अतिपावसामुळे तूर, पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे.करिता शेताच्या एका बाजूने ङ आकाराचा 2 फुट चर खोदून ज्यादा पाण्याचा निचरा करावा.
* जिथे कुठे मर रोगाची किवा मुळकुजवा रोगाची सुरुवात होत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरिया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे.
* हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझियम 4 किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/NW6M1yxTidg
कापूस
* अतिपावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचून पाने पिवळी पडून पिकाची वाढ खुंटलेली दिसून येत आहे.
* कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात एक ओळ सोडून लहान चर काढावेत.
* अकस्मिक मर किंवा मूळकुज दिसू लागल्यास कॉपरऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक युरिया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हे द्रावण झाडांच्या मुळा जवळ प्रति झाड 100 मिलि द्यावे. तसेच पीक 30 ते 40 दिवसांचे झाले असल्यास दोन टक्के युरीयाची फवारणी करावी. यासाठी 200 ग्रॅम युरिया प्रती दहा लिटर पाणी असे प्रमाण वापरावे.
* पिकाची वाढ पूर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पीक 40 ते 45 दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशी करिता 31 किलो तर बागायती कपाशी करिता 51 किलो निमकोटेड युरिया प्रति एकरी द्यावा.
* खत पाण्याचा निचरा झाल्यावरच द्यावे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केलेला कापूस सध्या पाते अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर पातेगळ होत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी एन ए ए या संजीवकाची 40 मिली प्रति 180 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकरी किंवा 2.5 मिली प्रतिदहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे पातेगळ थांबण्यास मदत होते.
* कपाशीवर रस शोषक किडी विशेषतः मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टिसीलियम लेकॅनी 40 ग्रॅम किंवा अॅसीटामिप्रीड (20 टक्के) 60 ग्रॅम किंवा डायमीथोएट (30 टक्के) 260 मिली प्रति एकर या प्रमाणे फवारावे.
आपत्कालीन पीक नियोजन
पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जास्त पाऊस आणि उशिरा झाल्याने खरीप ज्वारी, बाजरी, मुग ,उडीद,तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, मका इत्यादी पिकांना हानिकारक ठरला आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकास बसला आहे. अशा परिस्थितीत 15 ऑगस्ट नंतर कोणती पिके घ्यावीत याचे पिक नियोजन कसे असावे याचा विचार होणे गरजेचे आहे.
कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून, चार 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.
ऑगस्टचा दुसरा पंधरवडा – सूर्यफूल, तूर, एरंडी. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1)
सप्टेंबर पहिला पंधरवडा – रब्बी ज्वारी.
मराठवाडा विभाग
मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो.
* सप्टेंबर दुसरा पंधरवडा – रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल, हरभरा, जवस आणि गहू.
* ऑक्टोबर पहिला पंधरवडा – रब्बी ज्वारी, करडई आणि जवस गहू, रब्बी गहू.
* ऑक्टोबर दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा: हरभरा,करडई,जवस.गहू,रब्बीज्वारीआणिसूर्यफूल.
विदर्भ विभाग
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश होतो.कृषी हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश व जास्त पावसाचा प्रदेश अशा तीन उपविभागांमध्ये विभागला जातो. या तिन्ही उपविभागांत ढोबळ मानाने एकाच वेळी पाऊस पडतो.
* पीक उत्पादनातील (जोखीम) कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
* राज्य शासन राबवित असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येणार आहे. त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा.
* मजूर कमतरता लक्षात घेता मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जात आहे.
पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे. पिकास पाणी द्यावे. आपापल्या विभागात प्रत्यक्षात पावसास होणारी सुरवात विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार शेतकर्यांनी पीक नियोजन करावे.
काही ठळक बाबी
* अति पावसाच्या( इगतपुरी, महाबळेश्वर, कोंकण, गोंदिया, भंडारा , सिंदेवाही ) प्रदेशात 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान हुलगा (कुलथी), Rice Bean, वाल, पावटा इत्यादी पिके घ्यावीत
* मध्यम पावसाच्या प्रदेशात तूर, सूर्यफूल,मका इत्यादी पिकांचे उशिरा पक्व होणारे वाण पेरावेत.
* कोरडवाहू भागात : तूर,मटकी, बाजरी इत्यादी पिकांचे उशिरा पक्व होणारे वाण पेरावेत.
डॉ. मधुकर बेडीस, डॉ. योगेश पाटील, श्री. कैलास महाले
कृषि तंत्र विद्यालय, जळगाव – 425001
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
Comments 1