जळगाव : मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या मोठ्या पावसामुळे कपाशीत बोंडसड, आकस्मिक मर व नैसर्गिक गळचा प्रादुर्भाव झाला आहे. आकस्मिक मरमुळे शेतामधील झाडे अचानक जागेवरच सुकत आहे. दरम्यान, स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची नितांत गरज आहे.
सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. आकस्मिक मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
बोंडसड वरील लक्षणे व उपाय
कारणे
१. फुले व बोंडे तयार होण्याच्या वेळी जास्तीचा पाऊस व पर्यायाने सतत आर्द्रतायुक्त हवामान
२. बोंडांवर किटकांमुळे (विशेषतः लाल ढेकुण) होणाऱ्या इजा/व्रण
३. सघन लागवड व नत्राची अत्याधिक मात्रा देणे
४. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास नुकसानग्रस्त बोंडांवर झालेल्या बुरशीच्या दुय्यम प्रादुर्भावामुळे तसेच कवडी करपा या रोगांच्या बुरशीमुळे
लक्षणे
अनेक प्रकारच्या बुरशीच्या एकत्रित पादुर्भावामुळे होते. सुरवातीला बोंडावर छोटे तपकीरी किंवा काळया रंगाचे ठिपके दिसुन येतात व नंतर मोठे होउन पुर्ण बोंड व्यापतात अशी बोंडे न उघडता अपक्व अवस्थेतच गळुन पडतात.
उपाय
१. योग्य अंतरावर लागवड करून रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर
२. पीक दाटलेले असल्यास खालची लांब दांड्याची जुनी पाने काढून टाकावीत जेणेकरून पीकात हवा खेळती राहील.
३. रोगाच्या प्रसारास कारणीभूत लाल कोळी (dusky cotton bug or red cotton bug) च्या नियंत्रणासाठी प्रोफॅनोफॉस २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
४. बोंडअळी साठी संरक्षणात्मक उपाययोजनां सोबतच बाविस्टीन, कार्बेडाझिम यासारख्य आंतरप्रवाही बुरशीनाशकाची ४५ दिवसानंतर १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
आकस्मिक मर वरील लक्षणे व उपाय
कारणे
जास्त काळ शेतात पाणी साचून राहिल्यास ही विकृती दिसते.
प्रखर सूर्यप्रकाश व जास्त तापमान असल्यास व लगेच पाणी दिल्यास किंवा पाऊस पडल्यास देखील या विकृतीची बाधा होते.
लक्षणे
१. पानांची चमक कमी होऊन पाने मलूल व निस्तेज होतात.
२. झाड संथ गतीने सुकु लागतात.
३. शेंडा झुकलेला दिसत नाही तसेच खोड, मुळ देखील कूजत नाही.
४. झाड उपटल्यास सहजगत्या उपलटले जात नाही.
५. झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात व नलिका अर्धवट किंवा पूर्ण बंद होतात.
६. काही वेळेस विकृतीग्रस्त झाडाच्या अर्धा भाग निरोगी व अर्धा भाग रोगट दिसतो व बऱ्याचवेळा एका ठिकाणी दोन झाडे असल्यास एक झाड निरोगी व एक झाड रोगट दिसते.
उपाय
१.५ टक्के युरिया व १.५ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशचे द्रावण करून १५० ते २०० मी.ली. द्रावण विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याभोवती ओतावे. नंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डायअमोनिअम फॉस्फेट (DAP) चे द्रावण तयार करुन १५० ते २०० मी. ली द्रावण विकृतीग्रस्त झाडांच्या बुंध्याभोवती ओतावे.
नैसर्गिक गळ वरील लक्षणे व उपाय
कारणे
१. पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अथवा शेतात जास्त काळ पाणी साचून राहिल्यास पात्यांची, फुलांची अथवा लहान बोंडाची गळ होते.
उपाय
१. योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
२. पॉलीक अॅसीटीक अॅसीड या संजिवकाच्या १०० मी.ली ४५० लिटर पाण्यात याप्रमाणे २-३ ते आठवडयाच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात (१५ लिटर पाण्यात ३ ते ४ मी.ली).
सौजन्य
डॉ. गिरीश चौधरी – 9423156231
डॉ. संजीव पाटील – 9422775727
डॉ. तुषार पाटील
तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी
- कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
Comments 1