Home तांत्रिक भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

केळी निर्यात

श्री. गोविंद हांडे,
कृषी सेवारत्न, सल्लागार निर्यात,
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ, पुणे

पुणे : जगभरातील काही प्रमुख फळपिकांपैकी केळी हे एक प्रमुख फळपिक आहे. केळी ही फायबर आणि खनिजांनी समृध्द असल्यान जगभरात तिला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातून विदेशात केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षी भारतातून 2 लाख 19 हजार 737 मेट्रीक टन इतकी केळी निर्यात करण्यात आली. यापैकी 50 टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा होता. यामुळे महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना मोठी निर्यातसंधी उपलब्ध होत आहे.

जगामध्ये केळी उत्पादनात, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे देश अग्रेसर आहेत. केळी लागवड व उत्पादन यामध्ये भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे केळी उत्पादक राज्य आहे. केळी हे महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे नगदी फळपिक म्हणून उदयास आले आहे. राज्यातून मागील तीन-चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात होत आहे.सध्या महाराष्ट्र राज्य देशात केळी निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

Nirmal Seeds

केळीची निर्यात प्रामुख्याने सन 2013-14 पासून सुरुवात झाली. यावर्षी भारतातून 34,828 मेट्रिक टन तर महाराष्ट्रातून 5,147 मेट्रिक टन केळीची निर्यात झाली. मागील आठ वर्षांमध्ये केळीच्या निर्यातीमध्ये दरवर्षी वाढ होत गेली. सन 2020-21 मध्ये भारतातून 2,32,518 मेट्रिक टन केळीची केळीची निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून 1,63,696 मेट्रिक टन निर्यात झाली. ही आजवरची सर्वाधिक केळीची निर्यात झालेली आहे. सदर निर्यातीद्वारे 740 कोटी परकीय चलन देशाला प्राप्त झाले असून त्यामध्ये 556 कोटी महाराष्ट्राचा वाटा आहे.

Sunshine Power House of Nutrients

अशी आहे केळी निर्यातीची आकडेवारी

2013-14 पासून केळी निर्यातीला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी याला शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद देत 34,828 मेट्रीक टन तर महाराष्ट्रातून 5,147 मेट्रीक टन केळी निर्यात केली. त्यानंतर यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. 2021-22 मध्ये ही आकडेवारी भारतातून 2,19,737 तर महाराष्ट्रातून 1,47,428 मेट्रिक टन पर्यत पोहोचली आहे. ही वाढती आकडेवारी जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर यांसह केळीचे उत्पादन घेणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी मोठी आशादायी आहे.

अनु. क्रमांकवर्षभारतातून निर्यातमहाराष्ट्रातून निर्यात
साठा मेट्रिक टनमूल्य कोटीसाठा मेट्रिक टनमूल्य कोटी
12013-1434828154514718
22014-15632732411403443
32015-169321635834915116
42046-1711075138838219129
52017-1810131234944569149
62018-1913450241261831208
72019-20195746659108960429
82020-21232518740163693556

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇