• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2023
in तांत्रिक
3
कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कांदा-लसूण, वेल वर्गीय पीके, कोबी वर्गीय पीके, टोमॅटो

कांदा-लसूण
कांदा रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण
• फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, फिप्रोनील (5 एससी) 1 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 1 मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२25 ईसी) 2 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
• मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.
• काळा किंवा तपकिरी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल (75 डब्ल्यूपी) 1 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (5 ईसी) 1 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात पानांवर फवारणी करावी.
• फवारणीवेळी 0.5 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.

कांदा-लसूण :
रांगडा कांदा रोपवाटिका –
• रांगडा हंगामासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.
• एक एकर कांदा लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी दोन ते तीन किलो बी पुरेसे होते.
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी 200 किलो शेणखतासोबत 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे.

• रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून 10 ते 15 सें.मी. उंच, 1 ते 1.2 मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.

  • वाफे तयार करताना 1,600 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश प्रति 200 वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत.
  • रुंदीशी समांतर 5-7.5 सें.मी. अंतरावर रेघा पाडून 1-1.5 सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे.
  • पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे.नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे.
  • तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पेरणीनंतर 20 दिवसांनी हाताने खुरपणी करून, 800 ग्रॅम प्रति 200 वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
https://youtu.be/ltR7srf41bk?feature=shared

टोमॅटो
ब्लॉसम अँड रॉट टोमॅटो पिकामध्ये कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्याची वाढ खुंटून शेंडा ठिसूळ व अशक्त होतो. फळांचे देठ कमकुवत होऊन फळगळ वाढते. फळांच्या खालच्या बाजूस काळसर भाग (ब्लॉसम अँड रॉट) तयार होऊन थोड्या दिवसांनी ही फळे कुजून गळून पडतात. फळ नासणे, फळ बारीक होऊन सुकल्यासारखे होणे, फळे तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे अशा समस्या दिसून येतात.

  • कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
  • माती परीक्षणानुसार कॅल्शिअमची कमतरता असल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून कॅल्शिअमयुक्त खते वापरावीत.
  • जमिनीमधून कॅल्शिअम नायट्रेट, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समद्वारेसुद्धा कॅल्शिअमचा पुरवठा केला जाऊ शकतो.
  • टोमॅटो पुनर्लागवडीनंतर रोपावस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत चिलेटेड कॅल्शिअम 0.5 ते 1 ग्रॅम किंवा कॅल्शिअम क्लोराईड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कोबीवर्गीय पिके
रोग नियंत्रण
करपा
प्रसार रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो.
लक्षणे
• प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.
• ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.
उपाययोजना
• रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
• फवारणी (प्रति लिटर पाणी) मँकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 2.5 ग्रॅम किंवा क्‍लोरथॅलोनील 2.5 ग्रॅम अधिक स्टीकर 1 मि.लि.

https://eagroworld.in/khodva-us-suru-us-pik-vyavasthapan/

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

 

केवडा
प्रसार
रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो.
लक्षणे
• रोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते.
• प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात.
• पुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात.
• फुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो.
उपाययोजना
• पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.
• फवारणी (प्रति लिटर पाणी) मेटॅलॅक्‍झिल + मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2.5 ग्रॅम किंवा क्‍लोरथॅलोनील 2.5 ग्रॅम अधिक स्टीकर 2 मि.लि.

 

Rise

 

वेल वर्गीय पिके
फळकूज/ फळसड हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, बोट्रायटीस, चोनेफोरा, रायझोक्टोनिया अशा विविध रोगकारक बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळसड होते.
व्यवस्थापन
• फळांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी.
• रोगाची लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा कॅप्टन (50 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील (75 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• फळावर कापसासारख्या पांढर्‍या बुरशीची वाढ असेल, तर मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

https://eagroworld.in/poultry-farming-workshop-agroworld-organized-on-september-17-in-nashik/

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कांदा लसूणकीड नियंत्रणकोबीटोमॅटोभाजीपाला
Previous Post

अत्याधुनिक शेतीला चालना देण्यासाठी स्पाउडीचा पुढाकार

Next Post

या बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

Next Post
या बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

या बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

Comments 3

  1. Pingback: या बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर - Agro World
  2. Pingback: बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार - कृषीमंत्री मुंडे - Agro World
  3. Pingback: पाऊस सुरूच राहणार; रिटर्न मान्सून लांबणार! - Agro World

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish