बाकी क्षेत्रासह कृषी क्षेत्रातही महिला आज प्रगती करत आहेत. एवढेच नाहीतर शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रमासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला शेती करत आहेत. अशाच एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने देखील उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेती व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. दाभाडी येथील रहिवासी असलेल्या भावना निकम या एक उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात राहणाऱ्या भावना नीलकंठ निकम या प्रयोगशील महिला शेतकरी महिलेने कुंटूंबाची जबाबदारी सांभाळून शेतातील सर्व कामे करत एक महिला यशस्वी उद्योजकही होऊ शकते हे सिद्ध करून दाखविले आहे. भावना निकम आज आत्मविश्वासाने कृषी क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. भावना निकम यांचे एफवायबीए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. भावना यांचा प्रवास सोपा नव्हता, लग्नापूर्वी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गावात किंवा जवळपास कोणतेही महाविद्यालय नव्हते, त्यामुळे 40 किलोमीटर अंतरावरील सटाणा तालुका परिसरातील महाविद्यालयातून पदवी मिळवली. यानंतर भावना यांचे नीलकंठ निकम यांच्याशी लग्न झाले. भावना निकम यांचे सासरे सरकारी नोकरीत करायचे आणि सासू पारंपारिक शेती करायच्या पण वृद्धापकाळामुळे सासू आता काम करू शकत नव्हती. काही काळानंतर सासरच्या आकस्मिक निधन झाले. आणि सासऱ्यांच्या जागी त्यांचे पती नीलकंठ यांना सरकारी नोकरी लागली, पण नीलकंठ यांना ही नोकरी आवडत नव्हती. अखेर पत्नी भावना यांच्याशी बोलून त्यांनी शेतीत नशीब आजमावल्याचे सांगितले.
काळ्या आईची निस्वार्थ सेवा
भावना यांनी पतीसोबत शेतीत काम करायला सुरुवात केली, पण ते सोपे नव्हते. शेती होती पण पाणी नव्हते. फेब्रुवारीमध्ये विहिरीत पाणी संपते. पारंपरिक पद्धतीने शेती करताना खूप कष्ट करावे लागले. मातृत्वाच्या आनंदापासूनही भावना दोनदा वंचित राहिल्या. अशक्तपणामुळे त्यांना आजारांना सामोरे जावे लागले, परंतु, या सर्व अडचणींचा सामना करत त्यांनी स्वत:ला शेतीसाठी समर्पित केले आणि काळ्या आईची निस्वार्थ सेवा केली. पारंपारिक पद्धतींकडून आधुनिक पद्धतींकडे वळत शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या पतीने त्यांना वेगवेगळ्या कृषी परिषदांना पाठवले. आधुनिक आणि तंत्रज्ञान आधारित शेतीकडे भावना यांचा प्रवास सुरू झाला. गेल्या 12 वर्षांपासून त्या शेती व्यवसाय करत असून त्यांच्याकडे 6 हेक्टर शेतजमीन ही वहितीखालील आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, टोमॅटोसह पॉली हाऊस व शेडनेटमध्ये शिमला मिरची व इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन त्या घेत आहेत. शेतातील जवळपास सर्वच कामे भावना या स्वतः करतात. जसे की, निंदणी, फवारणी, ट्रॅक्टर चालविणे एवढेच नाहीतर त्या वेळप्रसंगी बाहेर गावावरून शेतमजुरांना कामासाठी शेतात आणतात. शेत आणि घरातील विद्युत जोडणीचे कामही त्या करत असून पाईपलाईन दुरुस्ती असेल यासारखी अनेक कामे त्या कुटुंबाला सांभाळून करत आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर
भावना निकम आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यशस्वी प्रयोग करत असून खर्चात बचत करण्यासह उत्पादन वाढीवर भर दिला देत आहे. शेतात बारामती पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी शेततळे उभारले आहे. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत अवजारे कृषी विभागाच्या मदतीने भावना निकम यांनी खरेदी करून शेतीला कृषी यांत्रिकीकरणाची जोड दिली आहे. यामुळे मजुरांची समस्या, वेळ व खर्चात बचत होत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी ट्रायकोकार्ड, फवारणीसाठी निंबोळी अर्क, दशपर्णाकाचा वापर करत आहेत. तसेच उत्पादन वाढीसाठी भावना निकम सेंद्रिय खतांचा वापर करतात. त्यात कंपोस्ट खत, गांडुळखत, हिरवळीचे खत, बायोगॅस स्लरीचा वापर त्या करत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन
शेतीला जोडधंदा म्हणून भावना यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी 12 हजार पक्ष्यांच्या कुक्कुटपालनासाठी शेडही उभारला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या शेतात पॉली हाऊस उभारले असून त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. या ढोबळी मिरचीची विक्री ही वाशी आणि नवीन मुंबई बाजारसमितीत केली जाते. यातून भावना यांनी दर्जेदार गुणवत्तेच्या भाजीपाला पिकांचे उत्कृष्ट उत्पादन घेतले असून चांगला नफाही कमावला आहे. भावना यांनी 1 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष फळ पिकाची लागवड केली असून यातून उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे. निर्यातक्षम चांगल्या गुणवत्तेची द्राक्ष काढणी करून व्यापाऱ्यांमार्फत द्राक्षांची निर्यात केली जाते. भावना निकम यांनी बायोगॅसचा शेतीसाठी व कुटूंबाच्या स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला आहे. तसेच सौर कंदील, एल.ई.डी बल्बचा वापर त्या करत असून ऊर्जेची बचतही करत आहेत.
फार्मर प्रोड्युसर कंपनीची केली स्थापना
आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खत, कीटकनाशके उपलब्ध व्हावे, यासाठी मालेगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील महिलांना भावना यांनी एकत्र केले आणि कृषिक्रांती महिला महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. या फॉर्मर प्रोड्युसर कंपनीत 10 संचालक आहेत. भावना यांनी याच कंपनीअंतर्गत त्यांच्या दाभाडीगावात राजमाता महिला या फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. महिलांनी एकत्र येऊन लघुउद्योग सुरु करावा, यासाठीही भावना यांनी कृष्णा स्वयंसहायता समुह स्थापन केले. आणि त्याचे भरारी ग्रामसंघात रूपांतर केले. या भरारी ग्रामसंघात दोनशे महिला सदस्य आहेत. यातील महिला गटांना लघु उद्योग करण्याची संधी मिळाली आहे.
रोप लागवड यंत्र
तुम्हाला हेही वाचायला आवडेल. 👇