तांत्रिक

कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

मुंबई : सध्याच्या काळात वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. माशीच्या नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात ‘क्यू ल्यूर’ कामगंध सापळे एकरी 5 या प्रमाणात मंडपात लावावेत. फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी.

 

प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत. वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी. कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (300 पीपीएम) 5 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

 

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

 

Shriram Plastic And Irrigation

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

 

 

Related Articles

Back to top button