नवी दिल्ली : पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यापूर्वी, या योजनेद्वारे मिळणारे आणखी दोन महत्त्वाचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना असलेल्या पीएम किसान योजनेत काही कारणाने तुम्ही अजून सामील झाला नसाल तर लगेच अर्ज करा. कारण याद्वारे तुम्हाला शेतीसाठी वर्षाला सहा हजार रुपये तर मिळतीलच, पण इतर काही महत्त्वाचे फायदेही मिळू शकतात.
शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन
ऑगस्टमध्ये 12वा हप्ता येण्याची शक्यता
पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. 11 कोटी शेतकर्यांसाठी सरकार एकाच वेळी 22,000 कोटी रुपये जारी करेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून, तुम्ही आधीच नोंदणीकृत नसल्यास, लवकरात लवकर नोंदणी करा आणि जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करा. अन्यथा, केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11 हप्त्यांमध्ये 2 लाख कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. पीएम किसान योजनेच्या सदस्यांना इतर कोणते फायदे मिळू शकतात, ते समजून घेऊ.
पीएम किसान योजना : शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळते
जर तुम्ही शेती करत असाल आणि तुमचे नाव या योजनेत मंजूर झाले, तर तुम्हाला सरकारने अधिकृतपणे शेतकरी म्हणून मान्यता दिली आहे, असे समजावे. या योजनेत सरकार शेतजमीन, आधार, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आदींची पडताळणी करते, त्यानंतर लाभ मिळतो. या आधारावर इतर कृषी योजनांसाठीही तुमची ओळख शेतकरी म्हणून निश्चित केली जाते.
असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय..
किसान क्रेडिट कार्ड मिळवणे होईल सोपे
पीएम किसान सन्मान निधी योजना ही किसान क्रेडिट कार्ड योजनेशी म्हणजेच केसीसीशी जोडली गेली आहे. केसीसी बनवण्याच्या कामाला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. मोदी सरकारने विशेष मोहीम राबवून 2 कोटी 51 लाख किसान क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. ज्यांची एकत्रित क्रेडिट मर्यादा 2.64 लाख कोटी रुपये इतकी आहे.
सध्या पीएम किसान योजनेचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवणे सोपे होणार आहे. कारण त्याचे जमिनीचे रेकॉर्ड, आधार आणि बँक खाते यापूर्वीच पडताळलेले आहे. एवढेच नाही तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर केसीसीचा फॉर्मही अपलोड करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजावर उपलब्ध आहे.
पीएम किसान मानधन योजना
जर तुम्ही शेती करत असाल आणि पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतील, तर या पैशातून शेतकरी पेन्शन योजनेचा प्रीमियम थेट कापला जाऊ शकतो. तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे गुंतवण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी आधार कार्डाशिवाय इतर कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.
कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण नोंद भारत सरकारकडे आधीच खातरजमा केली गेली आहे. तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतूनच मानधन योजनेचा प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकता. सध्या देशात आतापर्यंत सुमारे 23 लाख शेतकरी किसान पेन्शन योजनेत नोंदणीकृत झालेले आहेत.
पीएम किसान योजना लाभ घेण्यासाठी ही खातरजमा अवश्य करून घ्या
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी यापुढे सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय, सरकारने ई-केवायसी करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत दिली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते जोडलेले बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी असण्याचे फायदे जारी राहू शकतील. तसे केले नाही तर इथून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास नक्कीच अडचण निर्माण होऊ शकते.
तुम्हाला या खालील बातम्याही वाचायला नक्कीच आवडेल; सबंधित लिंकवर क्लिक करा … 👇👇
- आयआयटीयन इंजिनियर तरुणाने अमेरिकेतील इंटेल कंपनीतील लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून गावात येऊन उभा केला 44 कोटींचा डेअरी उद्योग; कसे ते जाणून घ्या ..
- Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
- आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती
- हर्बल फार्मिंग : कलियुगातील ‘संजीवनी’ असलेल्या ‘नोनी’ फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल दुप्पट नफा
Comments 3