• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मराठवाड्यातील पिकांवर गोगलगायीचे संकट; धनंजय मुंडे यांनी केली नुकसानभरपाईची मागणी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2022
in हॅपनिंग
1
मराठवाड्यातील पिकांवर गोगलगायीचे संकट; धनंजय मुंडे यांनी केली नुकसानभरपाईची मागणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बीड : मराठवाड्यातील खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असतानाच उगवण झालेल्या पिकांवर शंखी आणि अन्य प्रकारातील गोगलगायींचे संकट ओढवले आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागात, गेल्या काही दिवसातील पोषक वातावरणामुळे उगवण झालेले सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागा, तसेच इतरही पीके गोगलगायी खाऊन फस्त करत आहेत. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आता राज्य सरकारने तात्काळ पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

अ‍ॅग्रोवर्ल्ड.. आता “युट्युब” वरही..! 🌱

https://youtu.be/LqVqe0JkRS8

राज्याला कृषी मंत्रीच नसल्याने स्थिती आणखी भीषण

यंदा मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. मात्र, सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींच्या प्रादुर्भावाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे हे दोन आठवडे राज्याबाहेर होते. त्यातच नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे सध्या कृषी खाते मंत्र्याविना पोरके आहे. सक्षम नेतृत्त्वाच्या अनुपस्थितीत कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा घेऊन इतरही उपाययोजना केल्या, परंतु त्याला खूप उशीर झाला आहे. डोळ्यादेखत उगवलेले पीक नष्ट होत असताना आता वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच; पण उगवलेली रोपे कशी जोपासावीत, हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

 

 

हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी रविवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे तसेच कृषी अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली. मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना काही शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यानंतर जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करुन त्वरीत हेक्टरी 50 हजाराची मदत सरकारने करावी, अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उगवण झालेल्या पिकाचे 100 टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे आणि दुबार पेरणी, असे दुहेरी संकट बीडसह मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांसमोर असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

 

अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक प्रादुर्भाव

अंबाजोगाई तालुक्यात एकीकडे पावसाअभावी पिके संकटात आहेत, तर दुसरीकडे सर्वत्र गोगलगायींचा जबरदस्त प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना शेतात खुरपणीपूर्वी मजूर लावून गोगलगायी वेचून घ्याव्या लागत आहेत. आता कृषी विभागातर्फे एकात्मिक पद्धतीने गोगलगायीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

 

 

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुचविलेले उपाय

शेतकऱ्यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून शेताचे बांध स्वच्छ ठेवण्यासह इतर उपाययोजना करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे. बांध स्वच्छ राहिल्यास गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.

शेतामध्ये किंवा बागेमध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा कलतानी, गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर किंवा सकाळी लवकर शेतामध्ये जाऊन त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी वेचाव्यात. गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.

 

रासायनिक पद्धतीने गोगलगाय प्रादुर्भाव व्यवस्थापन

गोगलगायी या कोणत्याही समागमाशिवाय नैसर्गिकरित्या वर्षभरात 1,200 अंडी घालू शकतात. त्यांचा वाढीचा वेग भयानक आहे. त्यामुळे शेते गोगलगाय प्रादुर्भावातून मुक्त ठेवण्यासाठी रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. त्यासाठी मेटाल्डिहाईड 2.5 टक्के गोळ्यांचा वापर करावा. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.

 

फळबागांना असे करा गोगलगाय प्रादुर्भावातून मुक्त

फळबागेमध्ये झाडांच्या खोडास 10 टक्के बोर्डेपिस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे, शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. गोगलगाय नाशकाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.

Rout of snails invade on crops in Marathwada. Snails began damaging Soybean, Cotton and other crops in different areas of Marathwada. Worried farmers who spotted snails in abnormal numbers in their fields brought it to the notice of the Agriculture department as well NCP Leader Dhananjay Munde.

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Dhananjay MundeSnails Rout AttackSoybean Cotton Cropsखरिप हंगामगोगलगायधनंजय मुंडेनुकसानभरपाईमराठवाडामेटाल्डिहाईड स्नेलकिल
Previous Post

नेदरलँडमध्ये भारतासारखेच “किसान आंदोलन”; सरकारविरोधात हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले, अनेक हायवे जाम!

Next Post

इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी

Next Post
इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी

इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी

Comments 1

  1. Prakash Bodkhe says:
    3 years ago

    महाविकास आघाडीने अडीच वर्षांत शेतकऱ्यांना इतकी मदत केली की शेतकऱ्यांनी कीतीही पैसे खर्च केले तरी अजून पैसे शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे

ताज्या बातम्या

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.