• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गेल्या 50 वर्षांपासून भुताटकीने झपाटलेले रेल्वे स्टेशन!

ना कुठली ट्रेन थांबते, ना कुणी प्रवासी उतरला

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2022
in वंडरवर्ल्ड
1
गेल्या 50 वर्षांपासून भुताटकीने झपाटलेले रेल्वे स्टेशन!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कोलकाता : आपल्यापैकी अनेकांना महेश कोठारेचा “झपाटलेला” हा चित्रपट आठवत असेल. तात्या विंचू याच्या भुताने लक्ष्याला झपाटलेले होते. एखाद्या व्यक्तीला भुताने झपाटेलेले आपण समजू शकतो, कारण वाद -प्रवाद काहीही असले तरी भुताखेतांच्या, आत्मा – प्रेतात्म्यांच्या कथा आपल्याकडे चवीने चघळून सांगितल्या जातात, रंगवून-रंगवून पारावर या गप्पा हाणल्या जातात. मात्र, एखाद्या व्यक्तीऐवजी संपूर्ण रेल्वे स्टेशनच झपाटलेले असेल तर…! फेकू स्टोरी वाटतेय ना? मात्र, असे एक झपाटलेले रेल्वे स्टेशन भारतात आहे. गेल्या 50 वर्षांत या भुताटकीने पछाडलेल्या रेल्वे स्टेशनवर एकही ट्रेन थांबलेली नाही. या स्टेशनवरून एकही प्रवासी चढलेला अथवा उतरलेला नाही. हे स्टेशन आहे पश्चिम बंगालमधील गाजलेल्या पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोदर (बेगुनकोडोर)!

दूध डेअरीसाठी केंद्र सरकारकडून मिळवा 7 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज…

 

स्टेशन कार्यान्वित करण्याचे प्रयत्न ठरले फोल
कोलकाता शहरापासून 325 किमी ईशान्येस असलेल्या पुरुलियातील बेगुनकोदर हे निर्मनुष्य, ओसाड छोटे स्टेशन आहे. बेगुनकोदर स्टेशन दक्षिण -पूर्व भारतीय रेल्वे, रांची विभागाच्या अंतर्गत येते. इथे नेहमीच भयाण, भयानक शांतता पसरलेली जाणवते. या स्टेशनबाबत इतके प्रवाद आहेत की येथे कायम स्मशान शांतताच असते. कधीतरी कुणाला काही विचित्र अनुभव येतो आणि त्यानंतर भुताखेतांच्या कथा रंगवून ती आख्यायिक बनून जाते. अशा ठिकाणी जायला मग लोकं घाबरतात. तसेच काहीसे या बेगुनकोदर स्टेशनचे झाले आहे. रेल्वे कर्मचारी या स्टेशनवर काम करण्यास तयार नाहीत; तसेच बदली कर्मचारीही येथे येत नाहीत. बिना स्टेशन मास्तर व बिना सिग्नल स्टेशन सुरू ठेवणे शक्यच नसल्याने ते 42 वर्षे बंद केले गेले होते. मध्यंतरी हे स्टेशन कार्यान्वित करण्याचे, पर्यटन स्थळ बनविण्याचेही प्रयत्न झाले; परंतु तरीही एकही प्रवासी फिरकत नसल्याने, ना कुणी इथे उतरत असल्याने आजही हे स्टेशन एकाकीच आहे. त्यामुळेच बऱ्याच प्रयत्नांनंतरही बेगुनकोदर स्टेशनचे दृश्य आजही फारसे बदललेले नाही.

राज्यभरात पावसाचे धुमशान; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठीही “ऑरेंज ॲलर्ट” जारी

एकेकाळी होते गजबजलेले ठिकाण
या भागातील वृद्ध रहिवासी सांगतात, की एकेकाळी हे स्टेशन दिवसभर लोकांच्या गर्दीने गजबजलेले असायचे. स्टेशनवर सर्व प्रवासी गाड्या थांबत होत्या. त्या काळात स्टेशन परिसरात मोठी लगबग दिसायची नेहमी. स्टेशन ऑफिस, क्वार्टर सारे भरलेले असायचे. स्तेशनबाहेर लोकप्रिय बाजारपेठही होती; पण आज हा सारा फक्त भूतकाळ स्मरणात उरला आहे. आता दिवसासुद्धा कोणी तिथे जात नाही. फक्त एक शंभर वर्षांहून जुनी ब्रिटिशकालीन स्टेशनची इमारत भयाण जीवघेण्या शांततेत एकाकी उभी आहे. या इमारतीच्या आसपासच्या हवेतही भूतखेत, प्रेतात्म्यांचा वास असतो, अशा समजुतीतून कुणी जवळपासही फिरकत नाही.

नेमके झाले काय हे स्टेशन विराण व्हायला?
या स्टेशनवर गेल्या 50 वर्षात एकही ट्रेन थांबलेली नाही. कारण या स्टेशनवर पांढर्‍या साडीतील एक भूत पाहिल्याच्या कथा पसरू लागल्या. अनेकांनी भुतांच्या गोष्टी सांगितल्यापासून हे स्टेशन विराण झाले आहे. इथे 1962मध्ये जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून हे स्टेशन बांधले गेले. मात्र 1967 साली या रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी करत असताना स्टेशन मास्तरांना भूत दिसल्याचे सांगितले जाते. रेल्वेच्या ट्रॅकवर पांढऱ्या साडीतील एक भूत दिसल्यामुळे स्टेशन मास्तर घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. नंतर पांढर्‍या साडीतील भूत येथे फिरत असल्याचा दावा करणारे स्टेशनमास्तरच संशयास्पद स्थितीत मरण पावलेले आढळून आले. त्यांच्या पत्नीचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे मृतदेह रेल्वे स्टेशन परिसरात ट्रॅकजवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

 

 

स्टेशन मास्तर नाही, सिग्नल देणार कोण?
परिसरात फिरणाऱ्या भूतानेच या दाम्पत्याचा बळी घेतल्याचे बोलले जाऊ लागले. इथे रेल्वेखाली काही काळापूर्वी ठार झालेल्या महिलेचेच हे भूत असल्याचा दावा करत जोरात अफवा पसरवल्या गेल्या. या घटनेनंतर सर्व रेल्वे कामगारांनी तेथून पळ काढला. बरेच लोक अजूनही स्टेशन मास्तरांच्या अतृप्त आत्म्याचा साक्षीदार असल्याचा दावा करतात. काही दावा करून सांगतात, की तो रुळांवरून चालतो आणि नंतर अचानक हवेत गायब होतो. कुणी त्याला दिसले तर तो त्याचा गळा आवळून रक्तरंजित अनुभव देतो. या अशा कहाण्यांमुळे पुन्हा बेगुनकोदर स्टेशनवर कुणीच फिरकले नव्हते. नवे कर्मचारीही इथे यायला तयार होईनात. बिना स्टेशन मास्तर व बिना सिग्नल स्टेशन सुरू ठेवणे शक्यच नसल्याने ते बंद केले गेले. रेल्वे खात्याने या स्टेशनवर गाड्या थांबवणे बंद केले. या स्टेशनवर कुणीही प्रवासी चढत किंवा उतरत नव्हता. या स्टेशनवरून गाड्या जायच्या, मात्र अजिबात थांबायच्या नाहीत.

 

ममता बॅनर्जी यांनी केले स्टेशन कार्यान्वित करण्याचे प्रयत्न
*ममता बॅनर्जी या 2009 साली रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी हे रेल्वे स्टेशन पुन्हा कार्यरत केले. जुनी स्टेशन-इमारत पुन्हा रंगवली गेली. येथे तीन पॅसेंजर गाड्यांचे थांबा देण्यात आले. त्यानंतर काही दिवस हळूहळू प्रवासी इथे येऊ लागले. मात्र, तरीदेखील तिथे काही भीतीदायक घटना आणि गुन्हे घडत होते. त्यासाठी पोलिसांनी गस्त घालून परिस्थितीचे निरीक्षण केले. त्यावेळी काही समाजकंटक टोळकी मध्यरात्रीच्या सुमाराला स्टेशन परिसरात येऊन मुद्दाम परिसरात घबराट पसरेल असा उपद्रव निर्माण करत असल्याचे लक्षात आले. हीच मंडळी जाणूनबुजून, तिखट-मीठ लावून भुताखेतांच्या, प्रेतात्म्यांच्या अफवा पसरवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. बंगलोरच्या पॅरानॉर्मल रिसर्च टीमने नुकताच या स्टेशनवर रात्री मुक्काम करून येथे कोणत्याही प्रकारचे भूतखेत, प्रेतात्मा नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर हळूहळू आता या रेल्वे स्टेशनकडे पाहण्याची नागरिकांची दृष्टी बदलत आहे. मात्र, अजूनही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तिथे कुणीही फिरकत नाही. संध्याकाळनंतर या रेल्वे स्टेशनवर अजूनही रेल्वे थांबत नसल्याचे सांगितले जाते.

 

बेगुनकोदर स्टेशनच्या अंधविश्वासू दंतकथांबद्दल काय म्हणतात जाणकार?
अंधश्रद्धा आणि भुताखेतांच्या भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे अनेक जाणकार लोक असा दावा करतात, की बेगुनकोदर रेल्वे स्टेशन काहीही पछाडलेले वैगेरे नाही. जाणकारांच्या मते, या स्टेशनवर फक्त एकच ट्रेन थांबत होती. शिवाय हे स्टेशन गावातील रहिवासी वस्तीपासून बऱ्याच दूरवर निर्जन ठिकाणी, जंगलात आहे. या गावांपासून दूर असलेल्या ठिकाणी कोणालाही काम करायचे नव्हते. कारण गाडी नसताना इथे भयाण शांततेत माशा मारत बसावे लागते. व्यावसायिकांनी टपऱ्या टाकल्या तर व्यवसायही होईना. वर्दळ नाही, ग्राहकच नाही तर हे सारे चालणार कसे? त्यामुळे हळूहळू सारे ओसाड होत गेले. त्यात रेल्वे कर्मचारी शहरात राहतात. त्यांना अशा निर्जन, सोयी-सुविधा नसलेल्या ठिकाणी काम करायला फारसे आवडत नाही. त्यामुळे तेच अनेकदा उपद्रवी शक्तींना हाताशी धरून भुताखेतांच्या अफवा पसरवतात, जेणेकरून घाबरून लोक स्टेशनकडे फिरकणारच नाहीत आणि इथला कारभार गुंडाळला जाऊन रेल्वे कर्मचाऱ्यांना दुसरीकडे चांगल्या ठिकाणी बदली मिळेल. त्यातच संध्याकाळी सहाच्या सुमारास रांची-चंद्रपुरा-धनबाद पॅसेंजर ट्रेन गेली की, त्यानंतर बेगुनकोदर स्टेशनवर एकही ट्रेन थांबत नाही. त्यामुळे वर्दळ नसल्याने, जंगली प्राणी व गुन्हेगारांच्या भीतीने लोक शक्य तितक्या लवकर या निर्जन रेल्वे स्टेशन परिसरातून निघून जातात. स्टेशनचे कर्मचारीही रात्री तिथे राहत नाहीत. यामागे काहीही भुताटकी वैगेरे आजिबात नाही.

Reality of the haunted railway station in West Bengal. Train did not stop here for 50 years.

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अजब-गजब बातमीअंधविश्वासझपाटलेलेपश्चिम बंगालपुरुलियाबेगुनकोदर रेल्वे स्टेशनॲग्रोवर्ल्ड वंडरवर्ल्ड स्टोरी
Previous Post

दूध डेअरीसाठी केंद्र सरकारकडून मिळवा 7 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज…

Next Post

नेदरलँडमध्ये भारतासारखेच “किसान आंदोलन”; सरकारविरोधात हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले, अनेक हायवे जाम!

Next Post
नेदरलँडमध्ये भारतासारखेच “किसान आंदोलन”; सरकारविरोधात हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले, अनेक हायवे जाम!

नेदरलँडमध्ये भारतासारखेच "किसान आंदोलन"; सरकारविरोधात हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले, अनेक हायवे जाम!

Comments 1

  1. Pingback: नेदरलँडमध्ये भारतासारखेच "किसान आंदोलन"; सरकारविरोधात हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्याव

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.