दचकलात ना? अगदी अशक्यप्राय अशी ही गोष्ट शक्य करून दाखविली आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील भुंतर येथील एका तरुणाने. या तरुणाचे नाव आहे गौरव शर्मा धोक्को. गौरव यांनी घराच्या एका मजल्यावरच लॅब उभारून फक्त 45 दिवसात कॉर्डीसेप्स मिलिटेअर्स मशरूम तयार केला आहे. हा औषधी मशरूम सुमारे 5 लाख रुपये प्रति किलो दरापर्यंत विकला जातो.
भारतीय शेतीचा चेहरामोहरा, भवितव्य बदलून टाकतील असे 5 स्टार्ट-अप्स
चीनमध्ये खेळाडूंच्या स्टॅमिना वाढीसाठी होतोय वापर
मुख्यत: स्टॅमिना आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी या मशरूमचा वापर औषध म्हणून केला जातो. चीन, थायलंड आणि मलेशियानंतर आता भारतात प्रथमच त्याचे उत्पादन झाले आहे. कॉर्डीसेप्स मिलिटरिस मशरूममध्ये उच्च प्रतिकारशक्ती बूस्टर असल्यामुळे चीन सरकार आपल्या खेळाडूंसाठी याचा सर्वाधिक फायदा करवून घेत आहे.
बेंगळुरू येथील कंपनीकडूनच खरेदी
गौरव शर्मा यांनी पहिल्या टप्प्यात तीन हजार डबाबंद कर्टन्समध्ये या मशरूमचे उत्पादन घेतले आहे. बाजारात त्याची किंमत तीन ते पाच लाख रुपये किलो आहे. आता मशरूम सुकल्यानंतर बेंगळुरू येथील कंपनीला विकले जाणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
विषाणूविरोधी, जीवाणूविरोधी गुणधर्म
गौरव शर्मा यांनी सांगितले, की “कॉर्डीसेप्स मिलिटरिस मशरूममध्ये कर्करोगविरोधी, विषाणूविरोधी, जीवाणूविरोधी, मधुमेहविरोधी, वृद्धत्वविरोधी, ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. कॉर्डीसेप्स ही परजीवी मशरूमची एक प्रजाती आहे. हा मशरूम कमी तापमानात वाढतो. त्याला वर्मवुड देखील म्हणतात. हे मशरूम हिमालय पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 3,600 मीटर उंचीवर आढळते.”
या मशरूममुळे शरीरातील स्टॅमिना आणि प्रतिकारशक्ती वाढते.; तसेच अनेक आजार बरे करण्यातही ते गुणकारी आहे. हा मशरूम कर्करोग, साखर, थायरॉईड, दमा, उच्च बीपी, हृदयविकार, संधिवात, उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या गंभीर आजारांवर अतिशय गुणकारी मानला जातो.
जगभरातून वाढती मागणी
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मशरूम संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ सतीश कुमार म्हणाले, “अशा प्रकारच्या अनोख्या आणि शेतकऱ्यांना अल्पावधीत भरभक्कम उत्पन्न मिळवून देणाऱ्या औषधी पिकांबाबात नेमक्या माहितीचा भारतात अभाव आहे. कॉर्डिसेप्स मिलिटरिस मशरूम अनेक गंभीर रोगांचे निर्मूलन करण्यास सक्षम आहे. त्याला जगभरातून वाढती मागणी आहे.”
मलेशियामध्ये असताना मित्राकडून मिळाली कल्पना
गौरव शर्मा हे मलेशियामध्ये असताना तिथल्या एका मित्राकडून त्यांना या मशरूमची भारतात लागवड करण्याची कल्पना सुचली. तिकडे दीड वर्षे हे मश्रुम वाढवण्याचे तंत्रज्ञान गौरव यांनी शिकून घेतले. त्यानंतर आता हिमालयात, घरच्या प्रयोगशाळेत हा मशरूम तयार करण्यात गौरव यांना यश आले आहे.
After China, Thailand and Malaysia, now in India, Cordyceps Mushroom Farming In Laboratory In Kullu Himachal Pradesh.
Can I give me more information about kardiceps mashroom