• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2021
in यशोगाथा
1
ग्रो बॅग लागवड आणि ‘स्लाईस’ विक्री  पिंजारी-शहांचा हळदीचा अभिनव प्रकल्प
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

चिंतामण पाटील, जळगाव
हळद लागवडीच्या 10 वर्षानंतर अशपाक पिंजारी आणि मिलन शहा या मित्रांनी उत्पादक ते विक्रेते असा टप्पा गाठला आहे. ग्रो बॅग तंत्राने लागवड करून निर्यातक्षम उत्पादन ते आता घेत आहेत. त्यांनी उत्पादीत केलेल्या हळदीच्या बेण्याला परदेशात मागणी असून हळद स्लाईस उद्योगातही त्यांनी क्रांती केली आहे.

नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा….कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक

या दोघा मित्रांनी हळद उत्पादन आणि हळद प्रक्रिया उद्योगाला वाहून घेतले आहे. बालपणापासून मित्र असलेल्या दोघांनी दहा वर्षांपासून हळद लागवडीत सातत्य राखताना हळद उत्पादन आणि प्रक्रियेत विविध प्रयोग केले आहेत. ग्रो बॅग संकल्पनेवर आधारित लागवडीचा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला असून या पद्धतीमुळे चारपट अधिक व गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा दावाही त्यांनी केला आहे.

 

हलक्या जमिनीत, कमी पाण्यात उत्पादन
हळद हे प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यात येणारे प्रमुख पीक. सांगली ही हळदीची मोठी बाजारपेठ असल्याने पश्चिम महाराष्ट्रात हळदीची लागवड आहेच. परंतु खानदेशात हळद हा तसा नवलाईचा विषय. खानदेशात पूर्वी अल्प प्रमाणात शेतकरी हळद लागवड करीत असतीलही परंतु ते प्रमाण नगण्य होते. मात्र 2010-11 यावर्षी हळद सोन्याशी स्पर्धा करू लागली तेव्हा हळदीचे क्षेत्र खानदेशातही विस्तारले. शेतकरी केळी व कापसाला पर्याय म्हणून हळद लागवड करू लागले. अमळनेरचे अशपाक पिंजारी व मिलन शहा या मित्रांनी भागिदारीत हळद लागवड केली. दुष्काळी कालखंडात देखील हळद लागवडीत त्यांनी खंड पडू दिला नाही. परिणामी आज हळदीचे विक्रमी उत्पादक म्हणून त्यांची ख्याती आहे.
अमळनेर तालुक्यातील धार शिवारात अशपाक पिंजारी यांची 40 एकर शेती आहे. हलक्या प्रतीची माती व दुष्काळ प्रवण भाग असल्याने या भागात बहुतांश शेतकरी कोरडवाहू पिके घेतात. या मुरुम मिश्रित हलक्या प्रतीच्या मातीत अशपाक पिंजारी आणि मिलन शहा कापूस, मका, ज्वारी अशीच पिके घेत. कालांतराने धार-मालपूर लघुसिंचन तलावामुळे त्यांच्या बांधापर्यंत पाणी साचू लागल्यांने त्यांच्या विहिरींना बर्‍यापैकी पाणी राहू लागले. तरीही बागायती पिके घ्यावीत इतके पाणी नव्हते. हळदीचा अनुभव मात्र वेगळा राहिला. चांगला पाऊस झाल्यावर जून महिन्यात लागवड करुन डिसेंबर-जानेवारीपर्यंत सिंचन करूनही हळदीचे जोमदार पीक आल्याने दोघा मित्रांनी हळद लागवड सुरु ठेवली.

7 गुणधर्म असलेल्या वाणांची लागवड
त्यांचे हळदीचे क्षेत्र 28 एकरावर विस्तारले आहे. ही लागवड करक्युमा लोंगा, करक्युमा केसिया, करक्युमा एरोमैटिका, करक्युमा ऐम्बाडा या 4 वर्गात विभागली आहे. पिवळ्या हळदीसाठी सेलम, चेन्ना सेलम, वायगाव, ए.सी.सी. 48 प्रगती, राजापुरी, रोमा आणि लेकाडोंगा या वाणांची लागवड केली आहे. औषधी गुणधर्म असलेली आंबे हळद व काळी हळद त्यांनी लावली असून सौंदर्यप्रसाधनात वापरल्या जाणार्‍या कस्तुरी या पांढर्‍या हळदीचीही त्यांनी लागवड केली आहे. तीन आणि चार ओळीत लागवड : गादीवाफ्यावर दोन ओळीत लागवडीच्या पद्धती आहेत. पिंजारी- शहा यांनी 3 आणि 4 ओळीतही लागवड करून उत्पादन वाढविले आहे. ओळींच्यामध्ये बेडवर ठिबक टाकली आहे. 1 फुटावर ड्रीपर असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. गादीवाफे तयार करताना ते कमी उंचीचे केले आहेत. नंतर पीक जसजसे मोठे होत गेले तसतसे टप्प्याटप्प्याने भर दिली. खोडाभोवती मातीची भर झाल्याने हळदीच्या बुंध्याचे व मूळांचे चांगले पोषण होऊ शकले. तीन किंवा चार ओळीतल्या लागवडीसाठी नेहमीपेक्षा दर एकरी जास्त बेणे लागते. मात्र, एकरी उत्पादनात वाढ होत असल्याने फायदा होतो असा अशपाक पिंजारी यांचा अनुभव आहे.

 

फक्त विद्राव्य खतांचा वापर
गादीवाफे तयार करण्यापूर्वीच शेणखत पसरविले जाते. सध्याचा जमिनीचा पोत पाहता, फॉस्फेट व पोटॅश ही दाणेदार स्वरुपातील खते जमिनीतून दिली तरी पिकांना फारसा उपयोग होत नाही हा अनुभव आल्याने आता हळदीसाठी सुरुवातीपासूनच विद्राव्य खते दिली जातात.
सुरुवातीच्या 3 महिन्यांपर्यंत 19-19-19 व पुढच्या 3 महिन्यात 12-61-00 हळद पक्व होण्याच्या काळात 00-00-50 असा विद्राव्य खतांचा डोस दिला जातो. पिकांच्या याच कालखंडात ते सल्फेट देतात. ज्यामुळे हळदीतील कुरकुमीनच्या प्रमाणात वाढ होते. हळदीची वाढ चांगली झाल्यास कंदही चांगले पोसले जातात. परंतु युरियाचा अनावश्यक डोस दिल्यास काइक वाढ होणे नुकसानीचे ठरु शकते. युरिया दिल्याने फक्त वरची पाने आणि दांड्यांची वाढ होईल कंदांची वाढ होणार नाही. त्यामुळे युरियाचा अधिक वापर टाळून पोषक अन्नद्रव्य देण्याकडे आमचा कल असतो, असे पिंजारी यांनी सांगितले.

 

हळद बेण्याची युगांडाला निर्यात
मार्केटिंग कौशल्य असलेल्या अशपाक पिंजारी आणि मिलन शहा यांनी देशांतर्गत शेतकर्‍यांना तर बेणे विकलेच शिवाय मोठ्या प्रमाणात परदेशी निर्यातही केले. सन 2020 मध्ये त्यांच्या बेण्याला युगांडा या देशातील शेतकर्‍यांकडून मागणी होती. 100 टन मागणी असताना कोरोना संसर्गामुळे निर्बंध आल्याने केवळ 22 टन बेणे ते निर्यात करू शकले.

सिंचन व्यवस्थापन
सिंचनासाठी 4 विहिरी व बोअरवेलचा वापर केला जातो. या भागात मे-जून महिन्यात पाण्याची पातळी फारच खोल जात असल्याने भरपूर पाऊस झाल्यानंतरच हळदीची लागवड केली जाते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावरच गरज भागते. मात्र, पावसाने ओढ दिल्यास ठिबक संचाद्वारे पाणी दिले जाते. मालपूर सिंचन तलावामुळे पिंजारी यांच्या शिवारातील विहिरींना डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत चांगले पाणी असते. हळदीला एवढ्याच कालखंडात पाण्याची खरी गरज असते. हळदीत कायम वाफसा परिस्थिती ठेवल्यास जमिन नरम राहते. त्यामुळे हळदीचा कंद पोसला जाऊन उत्पादन वाढते.

 

किड रोग व्यवस्थापन
हळद हेच स्वत: औषधी पीक आहे. तथापी हवामानातील बदल किंवा देखभालीत दुर्लक्ष झाल्यास भाद्रपद महिन्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच पाने कुरतडणार्‍या व खाणार्‍या अळींचाही प्रादुर्भाव होतो. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प असते. नुकसानीची पातळी अल्प असेल तर फवारणी टाळली जाते. नुकसानीची शक्यता अधिक असेल तेव्हा क्विनॉलफॉसची फवारणी प्रती 15 लिटर पाण्याच्या पंपाद्वारे केली जाते. मात्र, वर्षानुवर्षाच्या लागवडीनंतरही पाने खाणार्‍या अळींसाठी पिंजारी यांना कोणत्याही प्रकारची फवारणी करावी लागलेली नाही. भाद्रपद महिन्यात अचानक तापमानात वाढ होते. सर्‍यांमध्ये पाणी साचून राहते, हवेत आर्द्रता व वाढत्या तापमानामुळे केळीप्रमाणे हळदीवर करपा येऊ शकतो. अशावेळी रोगाच्या आगमनापूर्वीच कॉन्टाफ प्लस (हेक्झाकोनॉझोल) व टिल्ट (पेन्टॅकोनॉझोल) या बुरशीनाशकाची फवारणी केली जाते.
हळदीच्या शेतात पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतल्यास हळकुंडे निरोगी राहतात व मुळ्या कुजत नाहीत. त्यामुळे हळदीचे गड्डे चांगले पोसले जातात.

नऊ महिन्यानंतर काढणी
हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने ते पक्व झाले आहे की नाही हे पिकाच्या बाहेरील परिस्थितीवरुन दिसते. याबाबत अशपाक पिंजारी यांनी सांगितले, की नैसर्गिक परिस्थिती पोषक राहिली, खत व सिंचनाचे चांगले व्यवस्थापन राखले गेल्यास पीक 8 ते 9 महिन्याचे झाल्यानंतर काढणीस तयार होते. पीक 240 दिवसांचे होईपर्यंत पाणी दिले जाते. काढणीच्या 1 महिन्याअगोदर पाणी देणे बंद करण्यात येते. पीक पक्व होऊनही पाणी देणे सुरु ठेवल्यास जमिन टणक होऊन काढणीस त्रास होतो. साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पीक काढणीची सुरुवात होते. पीक पक्व झाल्याची ओळख हळदीच्या दांड्यातला अर्क कंदात उतरून दांडा पूर्ण वाळतो. सुकलेली पाने शेताबाहेर काढली जातात त्यानंतरच पीक काढणीस सुरुवात होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी करुन (आडवी पास मारुन) हळदीचे कंद काढले जातात. त्यानंतर महिला मजुरांच्या सहाय्याने वेचणी केली जाते. वेचणी करतानाचे मातृकंद (गट्टू) वेगळे केले जातात. सॉर्टींग करुन हळद हवा खेळती राहू शकेल अशा जाळीदार पिशव्यांमध्ये भरुन ठेवली जाते.

हळद प्रक्रिया
हळकुंड पेक्षा पावडर करून विकल्याने फायदा वाढेल म्हणून स्वतःचा ब्रांड विकसित करून त्यांनी हळद पावडरची विक्री सुरु केली. बाजारात 60 रुपये किलोपासून हळदीचे दर असताना सर्वोत्तम गुणधर्मामुळे त्यांच्या हळदीला 140 ते 180 रुपये किलोचा दर मिळाला. हळकुंड विक्रीपेक्षा हळद पावडर विकणे फायद्याचे असले तरी त्यात अधिक मेहनत असून बाजारात स्पर्धा प्रचंड असल्याने त्यांनी वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग स्लाईस बनवून विकण्याचा होता.

100 टक्के गुणधर्मासाठी हळद स्लाईस
आजवर हळद शिजवून वाळविण्याची किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया शेतकर्‍यांना अवलंबावी लागत होती. शिजवण्याच्या प्रक्रियेत हळदीतील महत्वाचे घटक नष्ट होत. याला पर्याय म्हणून ओल्या हळदीचे काप करून सुकवून विकण्याचा निर्णय पिंजारी आणि मिनल शहा यांनी घेतला.
अशाप्रकारे नव्या पद्धतीने हळद सुकविण्यासाठी त्यांनी गुजरात मधील विविध ठिकाणी भेटी दिल्या. दिवसभरात दोन ते अडीच टन ओल्या हळदीचे काप (स्लाईस) करणारे मशिन आणले. 2020-21 पासून या पद्धतीने स्लाईस करून वाळवलेल्या हळदीला भरपूर मागणी आहे. मागीलवर्षी सेलम 120 रुपये किलो या दराने, वायगाव 180 ते 240 या दराने तर मातृकंदच्या स्लाईसला 240 रुपये किलोचा दर मिळाला. 7 टन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सुकलेल्या स्लाईस विकल्या. यावर्षी उत्पादनापूर्वीच 25 टन मागणी नोंदविण्यात आली आहे. हळद उत्पादन, बेणे विक्री आणि प्रक्रिया अशा तीनही पातळीवर पिंजारी आणि शहा यशस्वी झाले आहेत. त्यांच्या हळदीत करक्युमीनचे प्रमाण 7 टक्क्यांच्यावर व दर्जेदार असल्याचे कोची येथील स्पाईस बोर्ड ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केले आहे. नवे तंत्र आत्मसात करून ते रुजविण्यात त्यांचा हातखंडा आहे. असंख्य शेतकरी त्यांच्या मार्गाचा अवलंब करून हळद लागवडीकडे वळले आहे.

ग्रो बॅग तंत्राने लागवड
हळदीमध्ये जगभर जे जे नवनवीन बदल होत असतील ते आत्मसात करण्याची या दोघा मित्रांची नेहमीच तयारी असते. आताही त्यांनी ग्रो बॅग तंत्राने हळद लागवडीला प्रारंभ केला आहे. यात दोन पद्धती आहेत. 1) ीेळश्र श्रशीी (मातीविरहित) आणि 2) ीेळश्र लशीी (मातीसह) ीेळश्र श्रशीी मध्ये प्लास्टिक गोण्यांमध्ये कोको पिट भरून त्यात हळद लावण्यात येते. हे बाब खर्चिक असल्याने त्यांनी ीेळश्र लशीी पद्धतीने माती वापरून लागवड केली. यात 70 टक्के मातीत 10 टक्के ऑर्गेनिक कार्बन असलेले खत
(प्रत्येक गोणीत 2 ते 3 किलो) व उर्वरित 25 टक्के गांडूळखत वापरून गोण्या भरून त्यात हळद लागवड केली. या पद्धतीने लागवड केल्याने उत्पादन 4 पट अधिक व दर्जेदार येते. सध्या पिंजारी-शहा यांनी 600 गोण्यांमध्ये लागवड केली असून ठिबक सिंचनाद्वारे पाणी ते देत आहेत. अशा पद्धतीने लागवड पावसाळा सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यात होत असल्याने उगवण होताना उच्च तापमानापासून बचाव व्हावा म्हणून नेटचे आच्छादनही केले आहे. हा प्रयोग त्यांची ज्या 28 एकर शिवारात हळदीची लागवड केली आहे, त्याच शिवारात केलाला असल्याने मोकळ्या शेतातील हळद आणि ग्रो बॅग पद्धतीने लागवड केलेली हळद यातील फरक चटकन लक्षात येते. बॅगेतील हळद अधिक गुणवत्तापूर्ण असल्याचे दिसून येते.

हळद आमच्या दृष्टीने फक्त शेतातील एक पीक नाही तर तो आमच्यासाठी सतत चिंतनाचा विषय आहे. हळदीच्या लागवडीपासून तिच्यावरील प्रक्रियेपर्यंत जे काही जगात नवे घडते त्याची दखल घेऊन आम्ही ते आमच्या शेतात राबवितो. लागवडीचा सलग दहा वर्षाचा अनुभव त्यासाठी आम्हाला प्रयोग करायला कारणीभूत ठरतो. त्यामुळेच कालबाह्य झालेल्या बाबी टाळून आम्ही नवनवीन तंत्र उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात वापरतो. ग्रो बॅग लागवड आणि स्लाईस करून विक्री ह्या तंत्रामुळे हळद क्षेत्रात क्रांती झाली आहे आणि त्यातही आम्ही आहोत हे आमच्यासाठी विशेष आहे.
– अशपाक पिंजारी
– मिनल शहा
मो. नं. 9503210270

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: BananaExportFarmerGrow BagMuskUgandaआंबे हळदकस्तुरीकेळीग्रो बॅगनिर्यातयुगांडाशेतकरीसांगली
Previous Post

अखेर रिलायन्सकडून 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुरु

Next Post

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

Next Post
देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : शरद पवार

Comments 1

  1. Bhatu Patil says:
    4 years ago

    ashpak pinjari . आपला उपक्रम छान वाटतो .परंतु याला फार्मर प्रोड्युसर कंपनीची जर जोड मिळाली तर मोठया प्रमाणात हा व्यवसाय वाढू शकतो

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish