बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. दारू बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. ब्रेड वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी यीस्ट वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. औषधे बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो. अळिंबी प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी चवीला रुचकर असते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास बुरशीची मोठी मदत आहे. अन्नसाखळीचे चक्र बुरशीमुळेच पूर्ण होते. निसर्गाच्या अन्नसाखळीत बुरशी सफाईकामगार म्हणून काम करते. टाकाऊ घटकांचे विघटन करण्याबरोबरच नैसर्गिक बीजारोपण प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा असतो. जंगलात, गवताळ प्रदेशात वनस्पती वाचण्यास बुरशीचा आधार असतो. वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर बुरशीचे कवच तयार होते. बियांना आवश्यक असलेले प्रोटीन्सही बुरशीच देते. पावसाळ्यात या बिया रुजतात आणि रोपे येतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशी ही संजीवनी आहे. सर्दी, तापापासून ते कर्करोग, एड्स अशा गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे गुणधर्म या घटकामध्ये आहेत.
1.ट्रायकोडर्मा: – एक बुरशी जी इतर बुरशीना खाते. उपयोग:- करपा , भुरी,डाऊनी,जमीनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम .
2.स्युडोमनास: – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो. उपयोग:- करपा,भुरी,डाऊनी,जमिनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
3.अँपिलोमयसिंन: -एक बुरशी जी इतर बुरशींना खाते. उपयोग:- करपा,भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
4.बॅसिलस सबटीलस: – एक जिवाणू जो इतर बुरशींना खातो. उपयोग:- करपा,डाऊनी,सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरिता उत्तम .
5.बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस कुष्टारकी:- हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो.तिचे खाने बंद होऊन 72 तासात मरते. बाजारात डायपेल-8,डेल्फिन,हाॅल्ड या नावाने उपलब्ध आहे.
6.ब्युव्हेरिया ब्रासीना: – एक बुरशी जी रसशोषक किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- मावा,तुडतूडे ,मिलीबग करीता उत्तम.
7.मेटारायझम अनिसपोली: – एक बुरशी जी अळीवर्गीय किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .
8.वेस्टडीकम्पोजर: – तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात, बहुउपयोगी आहे .
9.रायझोबियम: -हे जिवाणू द्विदलवर्गिय कडधान्ये,तेलबिया यांच्या मुळींवर गाठी करून राहतात व हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
10.अझोटोबॅक्टर व अँझोस्प्रिलम:- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळींजवळ राहून हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
11.PSB: – हे जिवाणू जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
12.KSB: – हे जिवाणू जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
13.माईकोरायझा बुरशी (वैम HD)
पपई,केळी,मिरची,हळद,ऊस,सोयाबीन,कापूस,संत्रा,अद्रक अश्या पिकांची लागवड करत असाल किंवा केली असेल तर या पिकांसाठी अतिशय उपयुक्त अश्या माईकोरायझा बुरशी चा वापर करा व उत्पादनात वाढ करा.
क्रमशा:- भाग -१