• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी पंढरीचा वारकरी…दिलीप झेंडे

Team Agroworld by Team Agroworld
December 7, 2020
in इतर
0
कृषी पंढरीचा वारकरी…दिलीप झेंडे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी खात्यातील अत्यंत अभ्यासू अधिकारी म्हणून दिलीप झेंडे हे सर्वाना परिचित आहेत. शेतकरी वर्गातील ते आवडते अधिकारी असून कृषी सहसंचालकपदी कार्यरत असलेल्या दिलीप झेंडे यांची नुकतीच राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण प्रभारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मार्गावर असलेल्या दिवेगाव या गावातील दिलीप झेंडे यांनी कृषी विभागात आपली लोकाभिमुख ओळख जपली आहे. कृषी पंढरीचा वारकरी असलेल्या झेंडे यांनी कोरोना काळात विविध उपक्रम राबून शेतकरी व सामान्य नागरिक यांच्यात अतिशय उल्लेखनीय सुसंवाद साधून कौतुकास्पद काम केले. शिवाय राज्याकडे लक्ष देतांनाच त्यांचे गाव परिसरातील युवापिढी व शेतीसंवर्धनाकडे देखील विशेष लक्ष असते.  याच पार्श्वभूमीवर अ‍ॅग्रोवर्डने त्यांच्याशी साधलेला संवाद त्यांच्यात शब्दात खास अ‍ॅग्रोवर्डच्या वाचकांसाठी…

* कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी
मी मूळ पुणे जिह्यातील दिवेगाव येथील रहिवाशी असून आजही परिवाराला शेतीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शेतीचा आणि आमचा जणू जन्मोजन्मीचाच संबंध आहे. आमचे कुटुंब हे पूर्वापारपासून शेतीशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आजही आम्ही सर्व शेती करतो, माझी आई आजही नियमितपणे शेतात जाते. मीही शक्य तसे आठवड्यातून एकदा तरी शेतात जातो. त्यामुळे शेती संबधित क्षेत्रातच काम करायला मिळाले हे माझे भाग्य समजतो. त्यामुळे साहजिकच शिक्षणासाठी कृषी शाखा निवडली आणि कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून कृषीमध्ये १९८५ यावर्षी बीएस्सी केले. त्यानंतर राहुरी येथे एम.एस्सी पूर्ण केले. १९९१ या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यांनतर शासनच्या वर्ग-१ श्रेणीत शासकीय सेवेत रुजू झालो. २९ वर्षाच्या सेवेत राज्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, फलोत्पादन प्रकल्प व्यवस्थापक, कृषी सहसंचालक, प्रक्रिया व नियोजन संचालक अशा विविध पदावर काम करत असतांनाच आता कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी नेमणूक झाली आहे.

* शेतकऱ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळात आपण कोणकोणते उपक्रम राबविलेत..?
लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशच ठप्प झाला असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांच्या घरी अन्नधान्य, दुध, भाजीपाला टंचाई भासू नये यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच शहरातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी यांच्या सुचनेनुसार तसेच सर्वांशी चर्चा करून शेतकरी ते थेट ग्राहक हा उपक्रम राबविला. त्यासाठी विविध शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, आठवडे बाजार व काही संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. याचबरोबर अशाप्रकारचे आधी सुरु असलेले उपक्रम हे वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिले आणि अशा गटांना त्यांना हव्या असलेल्या गरजेच्या सर्व सुविधा पुरविल्या. पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या चारही बाजूला असलेल्या ग्रामीण भागातील गटांना त्यांच्या गावाच्या बाजूला असलेल्या शहरातील भागात भाजीपाला, फळे व इतरही जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन करून दिले. शेतकऱ्यांनी देखील या काळात रात्री १२.०० वाजेपर्यंत भाजीपाला, शेतमाल वितरणाची कामगिरी चोख पार पाडली. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये एक नवीन भावनिक नाते तयार झाले.
पुणे जिल्ह्यात दररोज जवळपास २००० टन भाजीपाला हा थेट ग्राहकांना वितरीत केला जात होता. कृषी विभागामार्फत या सर्व गटांना शहरातील गृहनिर्माण सोसायटी, सहकारी सोसायटी व इतर ग्राहकांची माहिती या सर्व गटांना पुरविली. त्यामुळे त्यांनाही वाहतूक व वितरण व्यवस्था चोखपणे पार पाडता आली. वरीलप्रमाणे नाशिकची द्राक्षे, उस्मानाबादची कलिंगड, कोकणातील हापूस आंबा असा विविध भागातील शेतमाल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. त्यासाठी संपूर्णपणे विक्री व्यवस्था ही फक्त शेतकऱ्यांनीच सांभाळली आणि खऱ्या अर्थाने पिकविणारा शेतकरी हा विकायला शिकला. यावेळी नेहमीच ज्याच्या उदारतेचे उदाहरण दिले जाते त्या शेतकऱ्यांनीही लाभाचे झुकते माप हे ग्राहकांना दिले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी ग्राहकांना हापूस आंबा नेमका कसा ओळखावा याच्याही काही टिप्स दिल्या. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या प्रती असलेला आदर आणखीच वाढला आणि ग्राहकांनी देखील भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांना नाराज केले नाही.

सक्षम वितरण प्रणाली
शेतकऱ्यांना याकाळात कोणतीही वितरणाची माहिती नसतांना अॉनलाइन कंपन्यांच्या प्रणालीप्रमाणेच स्वतःची वितरण साखळी तयार केली. शहराच्या चारही बाजूंनी बाहेरच्या जागेत त्यांनी गोडाऊन सदृश जागा भाड्याने घेतल्या. त्याठिकाणी शहरात जाणारा शेतमाल हा प्रतवारी करून तयार केला. त्यामुळे विविध ठिकाणी तो पॅकिंग करून हव्या त्या ठिकाणी पाठविण्यास तयार ठेवला. परिणामी, शहरात जास्त गोंधळ न होता व्यवस्थितपणे वितरण पार पडले. एकप्रकारे शेतकऱ्यांनी अल्पावधीच एक परिपूर्ण वितरण साखळी तयार केली. शेतमाल निवडणे, पॅकिंग करणे, वाहतूक करणे, वितरण करणे यासाठी याकाळात नुकतीच नोकरी गमाविलेले तरुण मुले पुढे आली आणि सक्षम अशी वितरण प्रणाली तयार झाली. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या.

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी राबविलेल्या काही क्रियाशील उपक्रमांचा स्मार्ट योजनेत आपण सहभाग करून घेणार आहोत. या सर्व प्रक्रियेत गरज असलेल्या सर्व परवानग्या तसेच इतरही सहकार्य कृषी विभागाने केले. आमच्यासह इतरही समाजघटकांनी यावेळी खूप सहकार्य केले. पुण्यातील एका पत्रकार मित्राने त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करून थेट शेतकऱ्यांचा शेतमाल घेण्यासाठी जवळपास ३५० ते ४०० कुटुंबांना तयार केले. अशा प्रकारे इतरही शासकीय अधिकारी, पोलीस व इतरही समाज माध्यमांनी खूप मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे यासर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

* लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेला हा उपक्रम पुढेही असाच सुरु राहणार का..?
लॉकडाऊन संपल्यानंतर बऱ्यापैकी पर्यायी व्यवस्था उभी राहत आहे. तरीही याकाळात फारच सक्रियपणे सर्व गटांनी कामे केली असली, तरी त्यातील काही गटांनी अजूनही आपल्या कामात सातत्य ठेवले आहे. कृषी विभागामार्फत अशा गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य आहेच.

 

* सोयाबीन बोगस बियाण्याच्या कारवाई बाबत काय सांगाल..?
राज्यात चार लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. प्रती हेक्टरी जवळपास ७५ किलो बियाणे पेरणीस लागते. यापैकी २० लाख क्विंटल बियाणे हे घरचे वापरले जाते तर विविध कंपन्यांच्या मार्फत उर्वरित बियाण्यांचे वाटप केले जाते. त्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा सर्वाधिक वाटा असतो. सोयाबीन या पिकाची माहिती घेतल्यास असे लक्षात येईल की हे बियाणे खूप नाजूक आहे. या बियाण्याचा अंकुर हा बाहेरील बाजूस असतो. त्यामुळे त्याला थोडा जरी धक्का लागला तरी बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे काढणीपासून ते विक्रीपर्यंत त्याला कोणत्यानाकोणत्या ठिकाणी धक्का लागतोच. उदा. घरी किंवा दुकानात बियाण्यांचे पोते एकावर एक जरी रचून ठेवले तरी खालच्या पोत्यातील बियाण्यांवर एखादेवेळी उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याचप्रमाणे सदोष पेरणीमुळेदेखील बियाणे उगवणीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आद्रता १२ ते ३०% असतांना पेरणी करण्यास आपण सांगतो. यावर्षी पहिलाच पाऊस चांगला झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या पावसाची वाट न पाहता पेरणी केली. परंतु, पहिल्या पावसाने जमिनीखाली उष्णता निर्माण होऊन बियाण्यांची काही प्रमाणात हानी झाली. त्याचप्रमाणे लॉकडाऊनचा काळ सुरु असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी सहाय्याने (ट्रॅक्टर) पेरणी केली. परंतु बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरचालक हे अकुशल असल्याने बियाणे योग्य खोलीवर न पडता जास्त खोल रुजले गेले. सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात न उगविण्यामागे हेदेखील कारण असल्याचे चौकशीअंती आढळले. जवळपास १ लाख १७ हजार तक्रारी याबाबत प्राप्त झाल्या आणि त्यावेळी आढळलेल्या विविध कारणांची तपासणी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला. त्याचबरोबर दोषी आढळलेल्या ११ बियाणे कंपन्यांवर कृषी विभागाने कारवाई करून तत्काळ त्यांचे परवाने रद्द करून गुन्हे दाखल केले.


      

* महाबीजच्या सर्वात जास्त तक्रारी होत्या यात कितपत तथ्य आहे..?
महाबीजच्या बियाण्याबाबत काही तक्रारी आल्या हे सत्य आहे. परंतु त्या सरसकट सर्व महाबीजच्याच बियाण्यांच्या बाबतीत होत्या असे नव्हे तर काही फक्त लॉटच्या बाबतीत होत्या. त्याठिकाणी त्रुटी दिसल्यास महाबीजने तत्परतेने बियाणे बदलून दिले. परंतु, बियाणे किंवा पैसे परत मिळत आहे हे समजल्यावर  काही शेतकऱ्यांच्या तक्रारीत देखील वाढ झाल्याचे दिसून आले. मुळात यावर्षी जे बियाणे पेरले गेले ते खरीप-२०१९ मधील होते आणि आपल्याला आठवत असेल त्यावेळी पीक काढणीच्या वेळी प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने शेतमाल हा बराच खराब झाला होता. त्यामुळे प्लॉटवरच बियाण्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आणि अप्रमाणित बियाण्यांचा पुरवठा झाला. महाबीजने सर्व प्लॉट हे गुणवत्तापूर्ण तपासून दिले. सर्वच बियाणे खराब होते असे नाही तरीही प्राप्त झालेल्या तक्रारींची आम्ही तत्परतेने दखल घेऊन योग्य ती चौकशी केली.
महाबीजचे सर्वच बियाणे खराब आहे असे आपण म्हणू शकत नाही. तक्रार करतांना आपल्याला कोणत्या कंपनीचे बियाणे आहे, त्याचा टॅग नंबर व पावती द्यावी लागते. जेणेकरून हे कोणत्या कंपनीचे हे बियाणे आहे व कोणत्या लॉटचे आहे, हे समजणे सोपे जाते. त्यासाठी आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की बियाणे वापरतांना पाकीट किंवा पोते उलट्या बाजूने फोडावे जेणेकरून टॅग नंबर तसाच राहील व थोडे तरी बियाणे हे नमुना म्हणून पाकिटात शिल्लक ठेवावे तसेच मालाची पावती जपून ठेवावी. अशा परीस्थितीत तो एक महत्वपूर्ण पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. ज्या ठिकाणी असे पुरावे मिळाले त्या ठिकाणी महाबीजने नवीन बियाणे उपलब्ध करून दिले. सोयाबीन पेरणी ४३ लाख हेक्टरवर झाली असून प्राप्त तक्रारी १.२५ लाख आहेत. त्यामुळे हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नसले तरी सर्वच ठिकाणी महाबीजचे बियाणे होते हे वस्तुस्थितीला धरून नक्कीच नाही. बऱ्याच ठिकाणी पावसाने तसेच अधिक खोलीवर पेरल्या गेल्यानेही बियाणे खराब झाले हेही नाकारता येणार नाही.

* कृषी निविष्ठामधील भेसळीबाबत आपण काय उपाययोजना करत आहात..?
भेसळ करणे ही एक मानवी अप्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे बियाण्यात भेसळ करणे म्हणजे अप्रमाणित बियाणे उपलब्ध करून देणे ही देखील एक भेसळच आहे. काही ठिकाणी बियाण्यांत विशिष्ट प्रकारच्या तणाची देखील भेसळ केली जाते. काही ठिकाणी ठराविक प्रकारच्या खत खरेदीसाठी आग्रह केला जातो. ज्याला आपण लिंकिंग म्हणतो. शेतीत प्रामुख्याने ४-२-१ अशी नत्र, स्फुरद व पालाश या मात्रा प्रमाणे शिफारस केली आहे. परंतु, शेतकरी काही वेळा फक्त नत्राचीच मागणी करतात. त्यामुळे एकाच खताची मागणी वाढते आणि दुकानदाराने दुसरे शिफारस केलेले खत दिल्यास ती लिंकिंग समजून अनेकदा तक्रारी वाढतात. प्रत्यक्षात हे लिंकिंग नसते. फक्त नत्रच जास्त प्रमाणात वापरल्यास पीक फक्त उंच वाढते (कायिक वाढ) आणि कोवळे दिसते. परिणामी, शेतकरी देखील पिकाच्या वाढीवर खूष होतो. मात्र अशा कोवळ्या पिकांवर जास्त प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. रासायनिक औषधींचा खर्चदेखील वाढतो. त्यासाठी प्रत्येकाने जमिनीची मातीसह पाणी तपासणी करावी. तसेच ही बाब लक्षात घेऊन शासनाने मृदाकार्ड देखील आणले आहे. परीक्षण अहवालानुसार गरजेप्रमाणे आवश्यक ते व तेवढेच खत वापरावे. कोणत्या खताची तुमच्या शेतीला आवश्यकता आहे, हे माहिती असण्यासाठी आपण तज्ज कृषी निविष्ठा विक्रेते असावेत म्हणून विक्री परवाना देतांना त्यांना कृषी पदवीधर असण्याची अट घातली आहे. कृषी विभागामार्फत युरिया पुरवठा करणाऱ्या राज्यातील प्रमुख २० कंपन्यांच्या साठ्याची तपासणी करून योग्य तेथे कारवाई देखील केली गेली.

* गुलाबी बोंडअळी बाबत…     
राज्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी, जिनिंग मिल, उत्पादक कंपनी यांच्या सहाय्याने उपक्रम राबवून वर्षभरातच या अळीला अटकाव करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ज्या ठिकाणी इतर राज्ये यासाठी २-३ वर्षे काम करत आहेत त्याठिकाणी आपण कमी कालावधीत सर्वांच्या सहकार्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झालो आहोत. अॅग्रोवर्डच्या माध्यमातून आजही राज्यातील शेतकऱ्यांना मी पुन्हा हेच अवाहन करू इच्छितो की त्यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीचे फरदड (दुबार) घेणे टाळावे. त्यापेक्षा रब्बीतील इतर पिके घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी. तसेच सोयाबीनचे योग्य प्रकारे साठविलेले घरचे बियाणे देखील ३ वर्षे पेरणीसाठी वापरले तरी चालते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की, त्यांची कोणतीही रास्त तक्रार असेल तर कृषी विभाग त्यावर नक्कीच कठोर कारवाई करेल.

* आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना
राज्यात ३० सप्टेबर १९९३ ला गणेशोत्सव साजरा करून विसर्जनानंतर जेव्हा किल्लारीला रात्री भूकंप झाला. त्यानंतरचे चित्र खूप वेदनादायी होते. त्यावेळी आम्ही त्याठिकाणी सेवा देण्यास हजर झालो. मात्र त्या भूकंपाने आयुष्याची क्षणभंगुरता सर्वांना दाखविली. त्याठिकाणी काम करत असतांना आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात त्यांना शेतातील कामे करण्यापासून ते विक्रीपर्यंत विविध मदत केली. त्याचाच भाग म्हणून आम्ही पुण्यातील द्राक्ष उत्पादक व्यापाऱ्यांना आवाहन करून भूकंपग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा माल खरेदीसाठी आग्रह केला. त्या व्यापाऱ्यांनी देखील सामाजिक भान राखत वाढीव दरात माल घेत सर्व रक्कमही आगाऊ दिली, हे सर्व अनुभव डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अंगावर शहारे येतात. असाच प्रसंग २००५ च्या अतिवृष्टीच्या वेळी आला. त्यावेळी अक्षरशः मुंबई बुडताना पहिली. यावेळीही आम्ही कोकणातील शेतकऱ्यांना मदतीसाठी हजर होतो. या सर्व ठिकाणी काम करण्याचे दु:खदायी समाधान आहे. खऱ्या अर्थाने अशाच वेळी नैसर्गिक संकटात मानवी मुल्यांचा कस लागतो आणि यामुळेच समाजही अधिक सुदृढ होतो.

* आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण कोणता.
प्रशासकीय सेवा करावी, सरकारी अधिकारीच बनावे, असे मला लहान असतानापासून घरातील सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळी या सर्वाचा आग्रह होता. घरातूनही सातत्याने याच गोष्टींचा पाठपुरावा सुरु होता आणि वेळोवेळी मला तीच जाणीव करून दिली जायची. त्यामुळेच ती गोष्ट कुठेतरी माझ्या अंतर्मनात बिंबली गेल्याने मी आज या पदावर आहे. त्यामुळे शेतकरी असून त्याच विभागात काम करण्याचा योग आल्याचे समाधान आहे. मला आठवते तत्कालीन राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा सुमतीताई पाटील यांनी मुलाखतीच्या वेळी मला सांगितले होते की, येथून पुढे तुम्ही कृषी क्षेत्रातच काम करा. इतर क्षेत्रात जाण्याचा विचारही करू नका. त्यावेळी वेळी मला त्यांचा उद्देश समजला नाही. परंतु, अशा वरिष्ठ मंडळींकडे दूरदृष्टी असते. अर्थातच त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे मोल मला आज लक्षात येत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी काहीना काही घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही करतोय. आजवर मिळालेल्या मित्रमंडळी, आईवडील व इतर सहकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत गुरूची भूमिका माझ्या आयुष्यात पार पाडली आहे.


* कामाचा व्याप व कुटुंब यांचा सुसंवाद कसा साधतात..?
कुटुंबाला देण्यासाठी मला पुरेसा वेळ नक्कीच मिळत नाही, याचे शल्य मला कायम आहे. मात्र मला एका गोष्टीचे समाधान आहे की, माझी हीच कमकुवत बाजू माझी अर्धांगिनी सौ. मंजुषा हिने उत्तमरीत्या पार पाडली असून सौ. मंजुषा पूर्णपणे घराची जबाबदारी सांभाळतात. पण जसे शक्य असेल त्याप्रमाणे मीही घरातील प्रमुख सणवार व इतर कार्यक्रमांना हजर असतोच. बऱ्याच वेळा प्रत्येक ठिकाणी हजर राहणे शक्य होत नाही.

*गावाकडे आपले विशेष लक्ष असते आणि सामाजिक क्षेत्रात आपण नेहमी सहभागी असतात त्याविषयी काय सांगाल…?
दिवेगावातील आमच्या झेंडे परिवारातील आम्ही १२ ते १५ प्रशासकीय अधिकारी आहोत व गावातील मिळून जवळपास ५० जण शासकीय सेवेत विविध विभागात उच्चाधिकारी पदावर कार्यरत आहोत. आमच्या याच सर्व मित्रमंडळीनी मिळून गावाच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांच्यावतीने मोठे सभागृह बांधून त्याचे लोकार्पण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केले. या सभागृहात नाममात्र दरात गावातील विविध कार्यक्रम पार पडतात.गावातील शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून एकत्र करून विविध उपक्रम राबविले जात आहेत. पंचक्रोशीतील सीताफळ व अंजीर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना उपयुक्त असे प्रकल्प उभारले आहेत. त्यात कोल्ड स्टोरेज, फळप्रक्रिया हेही आहेत. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी २००० टन क्षमतेचा सीताफळ पल्प काढण्याचा प्रकल्प उभारला आहे. असे विविध उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांकडून राबविले जातात. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये उल्लेख केलेले स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे नरेंद्र पवार हेदेखील आमच्यात भागातील शेतकरीपुत्र आहेत.
शेतीबरोबरच गावातील तरुणांना स्पर्धापरीक्षांच्या बाबतीत सर्व सहकार्य केले जाते. सनदी अधिकाऱ्यांच्या पुरंदर चॅिरटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध शिबीर आयोजित केली जातात. त्यामध्ये आरोग्य शिबीर, वाहतूक परवाना शिबीर, विविध शासकीय योजना बाबत माहिती असे विविध कार्यक्रम राबविले जातात. आपण पहिले तर लक्षात येईल की आमच्या भागात अॅग्रो टुरिझम व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असून त्यानिमित्ताने हॉटेलचेही प्रमाण वाढले आहे. त्यासाठी त्यांना विविध परवानग्यांची गरज असते. त्याबाबत आमचे नेहमीच सहकार्य असते. यासोबतच आम्ही आर्थिकदृष्ट्या व बौद्धिकदृष्ट्या संपन्न अशा विविध उद्योजकांच्या भेटी आमच्या लोकांना घडवून आणत असतो.

फार्मगेट
सुविधा या संधी उपलब्ध करून देतात याचा प्रत्यय आमच्याकडे येईल. आमच्या भागात फार्मगेट ही संकल्पना राबविली जाते. यामध्ये घरातील वयोवृद्ध, महिला आणि मुले हे सहभागी असतात. या संकल्पनेत शेतातील शेतमाल हा शेताजवळील मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी उपलब्ध केला जातो. म्हणजे एकप्रकारे पिकविणारा शेतकरी देखील आता पणन कौशल्य शिकला आहे. अशा प्रकारे घरातील वरिष्ठ देखील याकामात मदत करून सक्रिय राहतात आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम करण्यास त्यांचा हातभार लावतात.

* वारी आणि तुमचा कसा संबध आहे.
घरात पूर्वीपासून वारीची परंपरा आहे. परंतु, आता घरातील मंडळी वयोमानानुसार संपूर्ण वारी पायी जाऊ शकत नाही. तरीही काही सदस्य ठराविक अंतर हे वारी करतात. आमच्या गावात दिवेघाटातून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येते. त्यावेळी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी घर आणि गाव तत्परतेने हजर असते. वारकरी मंडळीच्या गरजेनुसार औषधोपचार, अन्न, वाहतुकीची साधने पुरविणे अशी विविध कामे केली जातात. त्याचबरोबर आम्ही धार्मिक कार्यक्रमात शेतीबाबत माहिती, पिकविमा, तांत्रिकदृष्ट्या महत्वाची माहिती यांचा सुरेख संगम यावेळी साधतो. एकूण काय तर वारीतही आमचा शेतकरी हिताचा स्वार्थ आम्ही साधतोच.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी निविष्ठाकृषी पंढरीकृषी विभागगुलाबी बोंडअळीदिवेगावपुरंदर चॅिरटेबल ट्रस्टफार्मगेटमहाबीजलॉकडाऊनवारीसीताफळ व अंजीरसोयाबीन
Previous Post

मसाल्यांसाठी शोधावा लागलेला देश – भारत Curious 2 Know? वाचा तर मग …

Next Post

महिला संचालित मणिपूरचा पाचशे वर्षे जुना बाजार

Next Post
महिला संचालित मणिपूरचा पाचशे वर्षे जुना बाजार

महिला संचालित मणिपूरचा पाचशे वर्षे जुना बाजार

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish