जिंतूर तालूक्यातील धानोरा (बु) येथील मोरे कुटुंबीयांनी पारंपरिक पिक पध्दतीला टप्याने फाटा देत शेतीला आधूनिकतेची जोड देत आपल्या शेतीत खरीप-रब्बी हंगामात कांदा, हळद, मिरची तर मुरमाड जमीनीत डाळींब आणि त्याला पुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म हे उद्योग उभारुन शेतीत उत्पन्नाचे विविध श्रोत तयार केले आहेत.
परभणीच्या जिंतूर तालूक्यातील बहूतांश जमीन ही डोंगराळ, खडकाळ आहे. येथील जमीनीला कोणत्याही धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी विहीर, बोअर व शेततळ्याच्या पाण्यावरच बागायती पिके घेतात. येथील विष्णू बापूराव मोरे, आबासाहेब बापूराव मोरे, आत्माराम बापूराव मोरे, नितीन दत्तराव मोरे व तुकारामराम बापूराव मोरे हे सुध्दा आपल्या ४५ एकर शेतीत काही ठिकाणी विहीर बोअर व शेततळे खोदून त्याच्या पाण्यावर बारमाही बागायती पिके घेत आहेत. त्यांच्या शेतीत सोयाबीन, कापूस, हळद, मुग, उडीद, तूर ही पिके घेतली जातात. त्याच बरोबर आता डाळींब, कांदा, मिरची, पोल्ट्रीचे व्यवसाय चालू कल्याने ईतर शेतक-यांना प्रेरणा मिळत आहे.
मिरचीचे घेतले उत्पादन
आबासाहेब व पुतन्या नितीन हे शेती कसत असतात तर त्यांना शास्त्रोक्त पध्दतीने पिके घेण्यासाठी त्यांचे कृषी खात्यात सेवेत असलेले बंधू विष्णू व आत्माराम मोरे हे त्यांना मार्गदर्शन करते असतात. ते मागील वर्षीपासून मिरची पिक घेत आहेत आणि त्यांनी यंदा ३० गुंठे क्षेत्रात मिरचीची लागवड करुन त्यापासून चांगले उत्पादन घेतले आहे. यासाठी त्यांनी जमीनीची चांगली मशागत करुन ४ फूट रुंदीचे बेड तयार करुन घेतले. बेडवर एक ट्राॅली कोंबडीखत,१०० किग्र डि ए पी,२०० कि ग्रा सुपर फास्फेट, ६० कि ग्रा सुक्ष्म अन्नद्रव्य, ८ कि ग्रा रिजेंट दाणेदार या खताचे मिश्रण करुन बेसल डोस दिला आणि ठिबक संच बसवला. बेडवर मल्चिंग पेपर अंथरवून सव्वा फूट अंतरावर नामांकित वाणाचे स्वता: तयार केलेले मिरचीच्या रोपांची १५ मे २०२० रोजी लागवड केली.
मिळालेले उत्पादन
जी ४ हे मिरचीचे वाण तिखट असल्याने ते हिरवी व पिकवून वाळवूनही विक्री होत असल्याने या मिरचीला अधिक मागणी आहे. सध्या पहिल्या तोड्यास ४५० किलो मिरचीचे उत्पादन होवून तीस जाफ्राबाद येथील मार्केटमध्य ४० रु प्रती किलो दर मिळाला. त्यातून १८ हजार रु उत्पन्न मिळाले आहे. एकूण तीन तोड्याच्या हिरव्या मिरच्या विक्री केल्यानंतर पुढचा तोडा न करता त्या झाडावरच पिकवू देवून वाळवून विकल्या जातात. सध्या एकच तोडा करण्यात आला असून पुढील दोन तोडे हिरव्या आणि पुढील तोडे झाडावरच पिकवून तोडतात. लाल मिरची पासून गत वर्षी २० गुंठ्यात वाळलेली लाल मिरची ५ क्विंट्ल प्रती किलो १५० रु दराने विकल्या तर काही हिरवी विक्री झाली. त्यातून काही रुपये खर्च जाता १ लाख २५ हजार रु उत्पन्न मिळाले आहे. तर यंदाच्या सर्व तोड्यातून मिरचीचे उत्पादन खर्च वगळता १ लाख ५० हजार रु निव्वळ उत्पन्न अपेक्षीत आहे.
दोन्ही हंगामात घेतात कांदा पीक
गत वर्षीपासून ते एक एकरात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात कांदा पीक घेत आहेत. यात खरीपात डार्क रेड तर रब्बीत लाईट रेड वाणाची लागवड असते.
खरीप हंगामात डार्क (गडद लाल)वाणाच्या बियाण्याची रोपे तयार करुन लागवडी केली जाते.तर रब्बी हंगामात लाईट रेड (फिक्कट लाल)वाणाच्या बियाण्याची बि बि एफ यंत्राणे पेरणी केली जाते.यासाठी एकरी ३ किलो बियाणे लागते.
उत्पादन व विक्री
दोन्ही हंगामात लागवड केलेल्या कांद्याचे प्रत्येकी १०० क्विंट्ल उत्पादन होते. यापैकी एका हंगामाचे १०० क्विंट्ल कांदे हे चालू मार्केट दरानूसार बिजोत्पादनासाठी नाफेड कंपनीला विक्री केले जावून एका हंगामाचे कांदे कांदाचाळ मध्ये साठवणूक करुन स्थानीक व ईतर बाजाराच्या ठिकाणी विकतात. दोन्ही हंगामाच्या कांदा उत्पादनातून ४० हजार रु खर्च वजा जाता १ लाख रु उत्पन्न मिळते. उत्पादीत कांद्याच्या साठवणूकी करीता त्यांनी ४० बाय २२ फुट अकाराची कांदा चाळ उभारणी केली आहे.या चाळीत दोन्ही जाळी खाण्यात २४ टन कांदा साठवण क्षमता आहे.चाळीमुळे कांद्याचे बाजारातील चढे दर गाठता येतात.
मुरमाड जमीनीत डाळींब बाग
मोरे यांचे शेतशिवार काही मुरमाड हलक्या प्रतीचे आहे. त्या जमीनीत कोणतेही पीक पेरले तर त्यापासून खर्च निघेल एवढे देखील उत्पादन होत नसे.तरीही ते शेत पेरायचेच. अशातच आबासाहेब यांचे बंधू विष्णू मोरे हे कृषी खात्यात असल्याने त्यांनी औरंगाबाद जवळील दूधड येथील विनायक जाधव यांची व ईतर शेतक-यांच्या डाळींब बागा दाखवल्या. त्यातून डाळींब फळबाग विषयी प्रेरणा मिळाली.
डाळींब लागवड
डाळींब लागवडीसाठी जैन इरिगेशन ली जळगाव येथून उत्तीसंवर्धीत भगवा वाणाचे डाळींब रोपे खरेदी करुन त्या रोपांची फेब्रूवारी २०१३ ला १५ बाय १० फूट अंतरावर बेड तयार करुन १ हेक्टर जमीनीत लागवड केली. एकूण ७२५ डाळींब झाडांची बाग आहे. ते अंबीया बहार घेतात. त्यासाठी १०-२६-२६, व कोंबडी खत आणि ईतर आवश्यक खतांची मात्रा देतात. सर्व बागेला ठीबक बसवण्यात आला आहे. भगव्या वाणाच्या डाळींब झाडांना लागवडीपासून दुस-या वर्षीच फळे लगडतात.
असे झाले डाळींबाचे उत्पादन
लागवडी नंतर तिस-या वर्षी म्हणजे वर्ष २०१५ ला अंबीया बहराचे डाळींब फळे १०० कॅरेट उत्पादीत झाले.आणि उत्पन्नाला सुरुवात झाली काही वेळा नैसर्गिक कारणाने कमीच उत्पादीत झाले
उत्पादन खर्च व उत्पन्न
वर्ष उत्पादन उत्पादन खर्च दर प्रती किलो उत्पादन खर्च वजा जाता
२०१५ २००० किलो ५० हजार ५० रु २३ हजार
२०१६ २६००० किलो १ लाख २५ हजार ५७ रु १३ लाख ५७ हजार
२०१७ १६००० किलो १ लाख ३७ हजार ४० रु ५ लाख ३ हजार
२०१८ ७५०० किलो ९० हजार २९ रु १ लाख २७ हजार ५००
२०१९ २२००० किलो १ लाख ४० हजार ५१ रु ९ लाख ८२ हजार
२०२० २४००० किलो १ लाख ४० हजार ३५ रु ५ लाख ७० हजार
३५.६६ २३
३५८९५००
म्हणजेच ६ वर्षात डाळींब विक्रीतून एकूण ३५८९५०० पस्तीस लाख ८९ हजार ५०० रु निव्वळ उत्पन्न मिळाले.
शेतीला पुरक व्यवसाय कुक्कूट पालन
शेतीला पुरक व्यवसाय व्हावा म्हणून कुक्कूट पालन चालू करण्याचा निर्णय घेवून त्यांनी वर्ष २०१७ ला आपल्या शेतीत ४००० पक्षी संगोपन होईल या क्षमतेचे १५० बाय ३० फूट आकाराचे ९ लाख ५ ० हजार रु स्व:खर्चाने २ पोल्ट्री शेडचे बांधकाम केले.व बि ए तृतीय वर्षात शिकत असलेल्या नितीन मोरे या पुतण्यास शेतीची गोडी निर्माण व्हावी यासाठी व्यवसायात उतरवीले. २४ मे २०१७ ला पूणे येथील व्यंकीज हॅचरीज येथून ४००० ब्राॅयलर पक्षी पिल्यांची खरेदी करुन प्रत्यक्षात कुक्कूट पालनास सुरुवात केली.
पोल्ट्रीचे संगोपन
पक्षी पिल्ले आणल्यानंतर गंभीरो,लासोटा लस भरवणे,स्टाटर,फिनीशर खाद्य व फिडर मध्य पाणी ठेवणे,खेप काढल्यानंतर शेड निर्जंतूकीकरण,हिवाळ्यात प्रकाश दिवे लावून उब देणे ही पक्षी संगोपनाची कामे नितीन करत असतो.त्यास काका विष्णू, आत्माराम,आबासाहेब व धुळे येथील प्रगतशील शेतकरी मोतीलाल पवार मार्गदर्शन करतात.
पक्षी विक्रीतून मिळतो चांगला नफा तर कोंबडी खतामुळे पिकांना फायदा
मोरे यांनी एक वर्ष कोंबड्यांचे संगोपन करुन उत्पादन खर्च जाता प्रत्येक पक्षी विक्री खेपेतून १ लाख ६० रु मिळवत वर्षाकाठी ५ लाख ५० हजार रु पहिल्या वर्षी नफा मिळवला परंतू खर्चाच्या मानाने कमी असल्याने त्यांनी सन २०१८ ला छत्तीसग़़ढ येथील इंडियन ब्राॅयलर कंपनीसी करार करुन कंपनीचे फायनांस आणि पोल्ट्री संगोपन मेहनत स्वता या पध्दतीने कुक्कूट पालन करने चालू केले आहे.या मध्य कंपनी पक्षाच्या विक्रीत प्रती किलोस ८ रु दरा प्रमाणे सर्व वजनावर पैसा देते तर किलोला मिळालेल्या उर्वरीत दराची रक्कम कंपनीचे मालक घेत असतात. यातून दरवर्षी ५ लाख रु नफा मिळत आहे.
शेतकरी संपर्क
आबासाहेब बापूराव मोरे
९७६५९४६८२२
नितीन दत्तराव मोरे
९२८४१७०९६६
मु धानोरा बु ता जिंतूर जि परभणी.
रासायनिक शेतीला टप्या टप्याने फाटा देवून सेंद्रीय शेती अंगीकारणे काळाची गरज आहे.प्रत्येक शेतक-यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी डाळींब सह ईतर फळबाग लागवड केली तर कमी खर्चात अल्प मणूष्य बळात भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवता येते. तेही शाश्वत. शिवाय त्याच बरोबर गावरान किंवा संकरीत पध्दतीचे कुक्कुट पालन चालू केले तर त्याच्या उत्पन्ना बरोबरच शेती पिकांना उत्तम असणारे कोंबडी खत मिळते. शेतीत सेंद्रिय कर्ब वाढून सर्व पिकाचे उत्पादन वाढून जमीनीचा पोत सुधारतो.पोल्ट्रीतून आम्हाला वर्षाकाठी १६ ट्राली कोंबडी खत मिळतो.त्याच्या वापराने डाळींब व सर्वच पिके जोमदार उत्पादन देतात.
आत्माराम बापूराव मोरे
धानोरा बु ता जिंतूर जि परभणी.