पैसे काढताना एटीएम अडकले तर काय करावे?
आधुनिक तंत्रज्ञान हे कालानुरूप सर्वांनीच स्वीकारले आहे. त्यात सामान्य नागरिकासह शेतकरी बांधव देखील आहेत. ATM CARD हा त्या पैकीच एक प्रकार. आजपर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी चेक हा एक पर्याय होता परंतु आता प्लास्टिक पैसा हा पर्याय सर्वत्र उपलब्ध आहे.
बऱ्याच वेळा शेतकरी बांधवाना एटीएम वापरणे हे अडचणीचे ठरते आणि नेमके अश्या वेळी जर त्या मशीनमध्ये पैसे अडकले तर मग खूप मनस्ताप सहन करावा लागती प्रसंगी फसवणूक देखील होते. एटीएमने भलेही आपले जीवन अधिक सोपे केले आहे, ह्यामुळे आपल्याला जेव्हा हवे तेव्हा पैसे काढता येतात. त्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज भासत नाही. एटीएम ही एक मशीन आहे जी कधीही खराब होऊ शकते.
अनेकदा असं होत की आपण एटीएम मधून पैसे काढायला जातो, आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यावर जेव्हा पैसे निघायची वेळ येते नेमकं तेव्हाच याच वेळी एटीएम मशीन खराब होते अश्या स्थितीत आपण घाबरून जातो, कारण ते पैसे त्यात अडकलेले असतात आणि प्रोसेस झाल्यामुळे ते आपल्या बँकेच्या खात्यातून देखील कापण्यात आलेले असतात.
अशा वेळी काय करावे हे पैसे परत कसे मिळवावे?
१. लगेच आपल्या बँकेशी संपर्क साधा :
जर कधी एटीएम मधून पैसे काढताना जर तुमचे पैसे अडकले असेल पण तूमच्या खात्यातून ते कापण्यात आले असतील. तर अश्या स्थितीत सर्वात आधी तुमच्या बँकेच्या कुठल्याही जवळच्या शाखेशी संपर्क साधा. जर बँक बंद असेल तर बँकेच्या कस्टमर केयर क्रमांकावर याबाबत माहिती द्या.
२. ट्रॅन्झॅक्शन स्लीप सांभाळून ठेवा :
जेव्हाही एटीएममध्ये तुमचे पैसे अडकतील तेव्हा त्याची ट्रॅन्झॅक्शन स्लीप नेहेमी सांभाळून ठेवा. बँकेत तक्रार करताना तुम्हाला त्या स्लीपची फोटोकॉपी एक पुरावा म्हणून सादर करता येईल. कारण त्या ट्रॅन्झॅक्शन स्लीपमध्ये एटीएमची आयडी तसेच लोकेशन हे सर्व दिलेलं असते.
३. तुमच्या तक्रार निवारणासाठी बँकेला ठरविक वेळ असतो.
एका आठवड्याच्या आत पैसे वापस नाही तर प्रत्येक दिवशी बँकेला १०० रुपये द्यावे लागेल. जे एका आठवड्याच्या आत बँकेने तुमचे पैसे परत केले नाही तर बँकेला प्रतिदिन १०० रुपयाचा दंड भरावा लागतो.
तसेच जर का आठवड्यात तुमच्या ह्या समस्येवर बँक तोडगा काढण्यात अयशस्वी ठरली तर तुम्ही बँकिंग लोकपालमध्ये देखील ह्याची तक्रार करू शकता.
४. २४ तास वाट बघावी
जर कधी एटीएममध्ये ट्रॅन्झॅक्शन फेल झाले असेल तर अश्या स्थितीत २४ तास वाट बघावी. कारण बँक आपली चूक मानत २४ तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात त्याचे पैसे ट्रान्स्फर करते.
५. सीसीटीव्ही फुटेज :
अश्या परिस्थितीत बँक एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासू शकते, जेणेकरून तुमचे पैसे खरंच अडकले की नाही हे तपासता येईल.
यासारखे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत याची माहिती सर्वांनी ठेवावी व होणाऱ्या संभाव्य नुकसानी पासून आपली खाती व पैसा सुरक्षित ठेवावी.
तक्रार करण्या साठी बँकिंग लोकपाल चा पत्ता द्याव ही नम्र विनंती