खरीप तीळ लागवड तंत्रज्ञान
तीळ पिकाचे महत्व
१. प्राचीन काळातील सर्वात प्रथम तीळ तेलबिया पिकाचा शोध लागला
२.खाद्यतेल म्हणून सर्वात उपयोगी
3. सर्वात कमी असंपृक्त मेदाम्ले( लिनोलेईक) असल्याने मानवी शरीरात कोलेस्टेरोल पातळी करणेस मदत करते म्हणजे हृदयरोगावर अतिशय गुणकारी आहे.
४. सांधेदुखीवर नियंत्रण करणेकरिता उत्तम
5.तीळ तेलात सिसामीन आणि सिसामोल हे दोन महत्वाचे घटक असलेने आयुर्वेदात तीळ पिकास अनन्यसाधारण महत्व आहे.
नव्याने तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या काही गोष्टी :
- जमीन : जमीन खोल नांगरून तयार करावी.
- शेणखत : ५ टन/हेक्टरी जमिनीत टाकावे.
- जमीन भुसभुशीत करून फळी मारून सपाट करावी.
- पेरणी : पेरणी बैल पाभरीने करावी.
- बियाणे पेरणीची खोली : जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली इतक्या खोलीवर बियाणे पेरावे.
- जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली पेक्षा जास्त खोलीवर टाकल्यास बियाणे उगवत नाही.म्हणून पेरणी करतांना योग्य ती काळजी घावी.
- tractor ने पेरणी करू नये.कारण tractor ला लावलेल्या पाभरीने बियाणे २.५ सेंटीमीटर खोलीवर न पडता त्याहून अधिक खोलीवर पडून पुढे उगवनक्षमता अतिशय कमी होते.म्हणून tractor ने पेरणी करणे टाळावे.
- वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या कुटून बारीक पावडर तयार करून चाळणीने गाळून घ्यावी. ह्या पावडर मध्ये तीळ बियाणे एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
- साधारणपणे १ किलो बियाणात ५ किलो गोवऱ्या कुटलेली पावडर एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
- पेरणी अंतर : ४५ x १० सेंटीमीटर अंतरावर करावी.
- बियाणे : २.५ किलो/हेक्टर तीळ बियाणे वापरावे
- सुधारित जाती : जे.एल.टी. ४०८, फुले तीळ न.१,एकेटी-१०१,NT-11, G-1
- पेरणीची वेळ : १५ जून ते १५ जुलै
- खत व्यस्थापन : ५० किलो नत्र/हेक्टरी विभागून द्यावा.
- पहिला नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पेरणीचे वेळी द्यावा.
- दुसरा नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पिक ३० दिवसाचे पिक झाल्यानंतर द्यावा.
- जमिनीत पुरेसा ओलावा असतांना पेरणी करावी.
- तीळ हे पिक जास्त पाण्याला अतिशय संवेदनशील असलेने दलदल असलेल्या भागात पेरणी करू नये.
- विरळणी : पिक उगवण झाल्यानंतर पहिली विरळणी १५ दिवसांनी करावी. दुसरी विरळणी ३० दिवसांनी करावी.
- पीक संरक्षण : तीळ पिकावर पाने कुरतडणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास क्विनोल्फोस १मिली.प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.
- कोळपणी : पेरणीचे अंतर ४५ x १० सेंटीमीटर असलेने बैल कोळप्याने पहिली कोळपणी पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
- प्रथम निंदनी : पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
- दुसरी कोळपणी : ४५ दिवसांनी करावी.
- दुसरी निंदनी : तण तीव्रता बघून पिक ६० दिवसाचे असतांना दुसरी निंदनी करावी.
- पीक काढणी : साधारणपणे तिळाच्या बोन्ड्या पिवळसर झाल्याने कापणी करावी.
- कापणी केल्यावर पेंढ्या बांधून त्यांच्या खोपड्या करून वाळवाव्यात.
- साधारणपणे काढणीनंतर १० ते १५ दिवस पेंढ्या वाळवाव्यात.त्यानंतर जागेवरच तीळ बियाणे पेंढ्या उलट्या करून झटकून घ्यावे.
उत्पन्न : ७ ते ८ क्विंटल/हेक्टरी.
डॉ.मधुकर बेडीस, डॉ.सुदाम पाटील, प्रा.हरिश्चंद्र महाजन
अखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प,
तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव-४२५००१.