महाराष्ट्रात खाण्यासाठी व कारखान्याच्या दृष्टीने मक्याचा वापर होत असतो. मक्यामध्ये स्टार्च, प्रथिने आणि खाण्यायोग्य तेल असते. कारखानदारीमध्ये प्रामुख्याने मका ही स्टार्च, ग्लुकोज, पशुखाद्य, कोंबडीखाद्य तयार करण्यासाठी वापरतात.
जमीन व हवामान
मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्य कता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामु ६.५ ते ७ इतका असावा. या पिकासाठी बियाण्यांच्या उगवणीसाठी साधारणत: २१० सें.ग्रे. व पिकाच्या वाढीसाठी ३२० सें.ग्रे. तापमान उत्तम असते.
लागवडीचा हंगाम
साधारणतः मक्याची लागवड हि जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी.
हेक्टरी बियाणे
मक्यासाठी १५ ते २o किलो बियाणे प्रतिष्हेक्टर आवश्यकता असते. कमी आणि मध्यम कालावधीच्या वाणांनुसार लागवडीचे अंतर ठरविले जाते. जर कमी कालावधीचे वाण असल्यास लागवडीचे अंतर ६o × २o सें.मी. असते आणि मध्यम कालावधीच्या वाणांतील अंतर ७५ × २0/२५ से.मी. असते.
बीजप्रक्रिया
लागवडीपूर्वी प्रति एक किलो बियाण्यास २ ते २.५ १५ ते २0 ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनामध्ये ५ ते १० टक्के वाढ होते.
खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टरी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४o केिली पालाश द्यावे. लागवडीनंतर ३o दिवसांनी ४o किलो नत्र तर लागवडीनंतर ४o ते ४५ दिवसांनी ४o किलो नत्र द्यावे.
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन
VERY GOOS INFORMATION MOSTLY FARMERS DON’T MAKE EXPENSES & WANTS ONLT RETUNS THANKS .