पुणे : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट सर्वांसमोर उभे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आले आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
संपूर्ण राज्यात, देशात कोरोनाचा शेती व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसलेला असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर टोळ धाडीच हे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुरक्षेचे उपाय राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशकडून महाराष्ट्र – मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांना टोळ धाडीची भीती वर्तवण्यात आली आहे. टोळधाड. सद्याला महाराष्ट्रात विदर्भमध्ये अमरावती, नागपूर, वर्धा पर्यंत आलेय.
टोळधाड बद्दल थोडक्यात काही महत्त्वाची माहिती.
जवळपास 16-19 km/hr वेगाने वाऱ्याच्या सोबत हे उडतात. एक झुंड/टोळी दिवसाला 5-130 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त चा प्रवास सहज एका दिवसात करतात. 5000 किलोमीटर चा प्रवास 10 दिवसात पार केल्याची नोंद यांच्या नावावर आहे. एक टोळधाड 2 ग्रॅम प्रत्येक दिवशी अन्न खातो आणि एका टोळी/झुंड मध्ये किमान 40 दशलक्ष जरी पकडले तरी 35000 लोकांना लागणारे अन्न हे एका दिवसात खातात.(एका माणसाला दिवसाला 2.5kg या हिशोबाने हे काढलं आहे USDA) यांच्या एका टोळीची संख्या 40 ते 80 दशलक्ष असते. हे जवळजवळ सर्व पिकाचे पान,शेंडे,फुलं, फळं, बिया,फांदी आणि खोड असं सर्वच खातात. गहू,बाजरी,मक्का,ज्वारी,भात, ऊस, कापूस, सर्व फळबाग, भाजीपाला, कडधान्ये आणि गवत सुद्धा खातात.
आतापर्यंत वेगवेगळ्या देशात 1915 पासून याचा कहर बघायला मिळत आणि आणि आता संकट आपल्या दिशेने वाटचाल करतंय. मादी एका वेळेला 80-158 अंडी देते आणि अश्याप्रकारे एक मादी तिच्या जीवनक्रम मध्ये किमान तीन वेळेस अंडी देत असल्याने यांची संख्या झपाट्याने वाढत राहते. अटॅक दिसायला लागला की सुरुवातीलाच जर युध्द पातळीवर उपाययोजना केल्या नाही. तर हे संकट रोखणे जवळजवळ अशक्य.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी.
टोळधाडीचे नियंत्रण व उपाय करण्यासाठी त्यांच्या अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होवून नियंत्रणात ठेवता येते. नीम तेल प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी करावी, मिथील पॅराथीआन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी, बेंडीओकार्ब 80 डब्ल्युपी, क्लोरोपायरीयाफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामेथ्रीन 2.8 युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन 25 ईसी, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी व 10 डब्लूपी, मॅलाथिऑन 50 ईसी, 25 ईसी व 95 युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोदणी समितीने केलेली आहे. ढोल , थाळी किंवा काही वाद्य वाजवून देखील त्यांना हुसकावणे शक्य आहे. या टोळचा प्रतिबंध शेतकऱ्यांनी सामुहिकपणे करणे आवश्यक आहे.