• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हीच ती वेळ…! मे महिना माती परिक्षणाची योग्य वेळ

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक, हॅपनिंग
0
हीच ती वेळ…!  मे महिना माती परिक्षणाची योग्य वेळ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राज्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागला आहे. त्यामुळे विविध आधुनिक तंत्रज्ञान वापरून तो आपल्या उत्पन्नात वाढ करीत आहे. त्यापैकीच एक आहे माती परीक्षण. यात साधारपणे जमिनीचा सामू (पीएच). विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार वरील अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण या बाबत माहिती मिळते व त्यानुसार पिकांच्या आवश्यकते नुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.


माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच पण अन्नद्रव्यांवर होणार्याख खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठी मदत होते म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकर्यांणच्या दृष्टीने महत्वाची बाब होय.


पिकांना विविधप्रकारच्या १७ अन्नद्रव्यांची कमी प्रमाणात गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये, हवा, पाणी व जमिनीतून शोषूण घेतात. जमिनीत सतत पिके घेतली जात असल्यामुळे तसेच अधिक उत्पादन देणार्याा जातींची लागवड व सधन शेती पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिके जास्त प्रमाणात शोषून घेतात. म्हणून त्याचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खताद्वारे करण्यात येतो. पिकाला ज्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज आहे त्यानुसार पुरवठा करणे ही अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी माती परीक्षण करून जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार, तसेच सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पिकांना या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय व रासायनिक खताद्वारे केल्यास उत्पादनात वाढ होतेच व आर्थिक फायदा सुद्धा होतो. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा दिल्यास सर्वसाधारणपणे १५ ते ४० टक्के फायदा शेतकर्यांतना मिळण्यास मदत होते.


मातीचा नमुना घेण्याबाबतची दक्षता:
मातीचा नमुना घेताना खालील बाबी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
• जमिनीला खते दिल्यानंतर अडीच ते तीन महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
• शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून मातीचा नमुना घ्यावा.
• निरनिराळ्या प्रकारचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
• शेतातील झाडाखालील, विहीरी जवळील, जनावरे बसण्याच्या जागा, पाणी साचत असलेले भाग एत्यादी ठिकाणाहून नमुना घेऊ नये.
• मातीचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
• मातीचा नमुना साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर परंतु जमिनीच्या पूर्व मशागतीपूर्वी घ्यावा.
मातीचे परीक्षण जागा कशी निवडावी

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. गुरे बसण्याची व झाडाखालची,खते व कचरा टाकण्याची,दलदल व घराजवळची,पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.


नमुने कशे घ्याावेत
सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4 समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी.

ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा –

  1. नमुना क्रमांक
  2. नमुना घेतल्याची तारीख
  3. शेतक-याचे संपूर्ण नाव
  4. गाव आणि पोस्ट
  5. तालुका
  6. जिल्हा
  7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
  8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
  9. बागायत किंवा जिरायत
  10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
  11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
  12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
  13. जमिनीचा उतार किंवा सपाट
  14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
  15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
  16. माती नमुना गोळा करणा-याची सही.
    माती परीक्षणाचे महत्त्व, त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास माती परीक्षणाच्या इतर पैलूंचे महत्व कमी ठरते व त्यानुसार अपेक्षित फायदा मिळू शकत नाही म्हणून मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे हितावह ठरते. साधारणपणे मातीचे नमुने खालील उद्देशांसाठी घेतले जातात.
    • जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करणे.
    • फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण करणे.
    • खारवट किंवा चोपण जमिनी सुधारण्यासाठी मातीची तपासणी करणे.
    १) जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करणे :
    मातीचा नमुना घेण्यासाठी सर्वसाधारणपणे पिके जमिनीच्या कोणत्या भागातून अन्नद्रव्य शोषण करतात यावरून मातीचा नमुना घेतला जातो.
    • ज्वारी, भुईमूग, गहू, भात इ.- १५ ते २० से.मी खोल.
    • कापूस, केळ, ऊस- ३० से.मी खोल.
    • फळझाडाच्या बुंध्यापासून ३० ते ४५ से.मी लांब सोडून बाहेरच्या परिघामधून- ३० से.मी. खोल.
    २) फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण करणे
    फलबाग हे बहुवर्षीय पीक असल्याने जमिनीचे परीक्षण करूनच फळझाडाची लागवड करावी. जमिनीची योग्य निवड केळी नाही तर कालांतराने फळ झाडांना बहरन येणे, झाडांची वाढ खुंटने, झाडे अकाली वाळणे अशा अनेक समस्या निरम्न होतात. म्हणून फलबागसाठी माती परीक्षण करणे जरूरी आहे. फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीत दीड मीटर किंवा अगोदरच मुरूम लागल्यास, मुरूमापर्यंत खोल खड्डा करून मातीचा नमुने घ्यावे. याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग करून प्रत्येक विभागात एक या प्रमाणे दीड मीटर किंवा मुरूम लागेपर्यंत खोल खड्डा करावा.
    खड्ड्याच्या उभ्या छेदाचे १५, ३०, ६० ९०, १२० आणि १५० से.मी. असे भाग पाडावेत. त्यानंतर बादली किंवा घमेला १४ से.मी. खुनेजवळ धरून जमिनीच्या पृष्ट भागापासून १५ से.मी. खोलपर्यंत सारख्या जाडीची अर्धा किलो माती निघेल एवढी माती कुदळीने खोदून घमेल्यात जमा करावी. हा ०-१५ से.मी. खोलीचा नमुना कापडी पिशवीत भरावा. या प्रमाणे राहिलेल्या प्रत्येक थरातून सारख्या जाडीची माती अर्धा किलो काढून वेगवेगळ्या पिशव्यात भरावी. जर चुंखाडीचा किंवा कठीण मातीचा थर आढळल्यास त्याच्या खोलीची व जाडीची नोंद करून या थराचा नमुना वेगळा घ्यावा. पिशवीत शेतकर्यां चे नाव, पत्ता, शेत सर्व्हे नंबर, नमुण्याची खोली वगैरे माहितीची चिठ्ठी टाकावी.
    ३) खारवट किंवा चोपण जमिनी सुधारण्यासाठी मातीची तपासणी करणे
    जमिनीच्या प्रकारानुसार शेतीचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून एका विभागातील एक या प्रमाणे एक मीटर लांब, एक मीटर रुंद व एक मीटर खोल या आकाराचे खड्डे करावेत खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ०-१५, १५-३०, ३०-६० आणि ६०-९० से.मी. असे भाग पाडावेत. या भागातून सारख्या जाडीचा थर कुदळीने खोदून घमेल्यात जमा करावा. प्रत्येक थरातून दीड किलो माती काढून वेगवेगळ्या पिशव्यात भरावी, पिशवीत चिठ्ठी टाकावी. मातीचा किंवा चुनखडीचा थर आढळून आल्यास त्याच्या ख्लोलीचा व जाडीची नोंद करून त्याचा नमुना वेगळा घ्यावा.

मातीचा नमुना घेण्याची पद्धती:
मातीचा नमुना प्रातिंनिधक असणे महत्वाचे आहे. म्हणून जमिनीच्या गुणधर्मानुसार केलेल्या विभागानुसार निरनिराळ्या १०-१२ ठिकाणी खड्डे करून नमुने घ्यावेत. नमुना घ्यावयाच्या जागेवरील कडीकचरा बाजूला करून त्याठिकाणी टिकास, फावड्याच्या साहाय्याने १५-२० से.मी. खोलीपर्यंत व्ही आकाराचे खड्डे करून खड्ड्यातून बाजूची वरपासून तळापर्यंत २-३ से.मी. जाडीची माती खुरपीने घ्यावी. नमुण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रातील प्रत्येक खड्ड्यातून वरील प्रमाणे माती काढावी व ती स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीत जमा करावी. त्यानंतर एकत्र केलेली मातीचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत व उरलेले दोन भाग एकत्र करून अर्धा ते एक किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत या पद्धतीचा अवलंब करावा. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून अर्धा ते एक किलो मातीचा प्रातिनिधिक नमुना अलग-अलग घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावीव नंतर स्वच्छ कापडी पिशवीत भरून खलील महितीसह प्रयोगशाळेला नमुना पाठवावा.

महाराष्ट्रातील शासनाच्या माती परीक्षण प्रयोगशाळा
माती परीक्षण प्रयोगशाळा, सावेडी, तालुका बिजगुणन प्रक्षेत्र , अहमदनगर – ४१४००३
soilahmednagar@gmail.com Tel Ph :- 0241 – 2430010

माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषि भवन, कृषि महाविद्यालय आवार , पुणे – ४११ ००५
soilpune@gmail.com Tel Ph :- 020 – 25537110

माती परीक्षण प्रयोगशाळा, आर. टी. ओ. ऑफिसच्या मागे, विजापूर रोड, सोलापूर – ४१३ ००५
soilsolapur@gmail.com Tel Ph :- 0217 – 2726019

माती परीक्षण प्रयोगशाळा, मु . हामजाबाद पो. कोंडवे, ता. जि. सातारा – ४१५ ००२
soilsatara@gmail.com Tel Ph :- 02162-234891

माती परीक्षण प्रयोगशाळा, ४३४,तांबोळे बिल्डिंग, डॉ. आंबेडकर मार्ग, सांगली – ४१६ ४१६
soilsangali@gmail.com Tel Ph :- 0233-2376503

माती परीक्षण प्रयोगशाळा, ३३०/२ ब, जवाहरनगर वाय पी पवार नगर जवळ, कोल्हापूर – ४१६०१२
soilkolhapur@gmail.com Tel Ph :- 0231-2693983

माती परीक्षण प्रयोगशाळा, रेश्मा मंजील, गंजमाळजवळ, नाशिक – ४२२ ००१
soilnasik@gmail.com Tel Ph :- 0253-2592958

माती परीक्षण प्रयोगशाळा, तालुका सीड फॉर्म पिंप्री धुळे – २३१ ४०१
soildhule@gmail.com Tel Ph :- 02562-231401

माती परीक्षण प्रयोगशाळा, मुमराबाद, जळगाव – ४२५ १३२
soiljalgaon@gmail.com Tel Ph :- 0257-2200792

मृदूविज्ञान व कृषि रसायन शासन विभाग,कृषि महाविद्यालय, पुणे – ४११ ००५
स्रोत :- समाज माध्यम

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: मे महिना माती परिक्षणाची योग्य वेळहीच ती वेळ...!
Previous Post

वाटाणाचे नवीन वाण वीआरपीएम ९०१-५ विकसित

Next Post

तयारी खरीपाची …!

Next Post
तयारी खरीपाची …!

तयारी खरीपाची ...!

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish