३ एकर ऊसापासून एकूण ३ लाख ६७हजार निव्वळ नफा
शेतक-यांना एक ठोक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ऊस पिकाकडे पाहील्या जातं. मराठवाडा विभागात अधिकाधिक साखर कारखाना प्रकल्प उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बहूतांश करुन ऊसाची लागवड करतात .योग्य व्यवस्थापन आणि आधूनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत ऊसाचे एकरी ५० ते ९० टनापर्यंत उत्पादन घेत आहेत. ऊस लागवड क्षेत्रात परभणी, हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सदा अग्रेसर राहीले आहेत. या भागात भाऊराव चव्हाण स साखर कारखाना, व्हि पी के अॅग्रो फूड प्रोडक्ट्स साखर कारखाना, पूर्णा स सा कारखाना, बळीराजा कारखाना, गंगाखेड शुगर ही साखर कारखाने कार्यरत असून अनेक गुळ कारखाने देखील आहेत. त्यामुळे येथे ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. गोदावरी नदीच्या खो-यात तर त्याचे प्रमाण जास्तच आहे. ह्या भागातील शेतकरी पारंपरिक ऊस लागवड पध्दतीला फाटा देवून आता नवतंत्रज्ञान पध्दतीचे अवलंबन करुन ऊस लागवड करीत अधिक उत्पादन घेत आहेत.अशाच पध्दतीने परभणी जिल्हा पूर्णा तालूक्यातील कावलगाव येथील शेतकरी शिवाजी रंगनाथ पिसाळ यांनी ऊस शेतीत सातत्य ठेवत ऊस शेती यशस्वी केली आहे. शिवाय ऊसात अंतर पिक म्हणून त्यांनी शुगरबीटची देखील लागवड केली आहे.
शिवाजी पिसाळ (वय ५२) यांना कावलगावपासून दक्षिणेस अडीच किमी अंतर लांबीवर वाडी शिवारात ५ एकर काळी कसदार बागायती जमीन आहे. पिकांच्या सिंचनासाठी विहीर, विंधन विहीर, गोदावरी नदीवरुन पाईपलाइन आहे. त्यांच्या शेतीत खरीपात सोयाबीन तर रब्बीत गहू, हरबरा, कांदा ही पारंपारिक पिके घेतात.
ऊस लागवड
पारंपरिक पिकाबरोबरच काही क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. वर्ष २०१८ ला त्यांनी सप्टेंबर महिन्यात एक एकर क्षेत्रात २६५ वाणाच्या ऊसाची दोन डोळा ऊस कांडी बेण्याची ४ फूट रुंद सरीत ६ ईंच लांबीवर लागवड केली होती. तर एक एकर खोडवा, एक एकर निडवा ऊसाचे देखील क्षेत्र असून एकूण ३ एकर ऊस क्षेत्र आहे. तसेच सुरु ऊसात यंदा शुगर बीटची अंतरपीक म्हणून लागवड केली आहे.
खताची मात्रा
लागवडपूर्व नागंरटी व कुळवाच्या पाळी मशागतीच्या वेळी एकरी ५० कि ग्रा १५-१५-१५ हे रासायनिक खत मिसळवून बेसल डोस दिला तर लागवड नंतर ठिंबक अंथरवून घेतले. त्यानंतर दिड महिन्याला १०० कि ग्रा सुपर फास्फेट, ५० कि ग्रा पोटॅश, ५० कि ग्रा युरीया खताची मात्रा दिली. तेथून पुढे ४५ दिवसाला ५० कि ग्रा १९-१९-१९ हे विद्राव्य खत दोन दिवसा आड थोडे थोडे करुन ठिबक मधून सोडण्यात आले. नंतर जून महिन्यात १०० कि ग्रा १५-१५-१५,१०० कि ग्रा सुपर फास्फेट, १०० कि ग्रा युरीया ही खत मात्रा देण्यात आली. याच सुरु ऊसाच्या व्यवस्थापणाप्रमाणे खोडवा, निडवा एकूण ३ एकर ऊस पिकाला सारख्या प्रमाणात खतांची मात्रा दिली व वाफसानूसार ठीबकने पाणी देण्यात आले. ऊसावर कोणताही रोग उद्भवला नसल्याने कोणतीच फवारणी करावी लागली नाही.
असे मिळाले ऊसाचे उत्पादन
पिसाळ यांना एक एकर सुरु ऊसाचे ६० टन उत्पादन मिळाले तर एक एकर खोडवा ऊसाचे ५५ टन तर एक एकर निडवा (तिसरे वर्ष) ऊसाचे ३५ टन उत्पादन झाले. याच २६५ वाण ऊसाचे पहिल्या वर्षी एकरी ७४ टन उत्पादन निघाले होते.
उत्पादन खर्च व मिळालेले निव्वळ उत्पन्न
सुरु ऊसापासून ७४ टन उत्पादन मिळालेल्या ऊसाला साखर कारखान्याकडून एकूण प्रती टन २४०० रुपये भाव मिळाला ७४ टनाचे एकूण १७७६०० रुपये मिळाले त्यातून उत्पादन खर्च १० हजार रुपये वजा जाता १६७६०० रु निव्वळ उत्पन्न राहीले आणि ५५ टन खोडवा ऊसाच्या ५५ टनाचे १३२००० रुपये मिळाले यातून उत्पादन खर्च ८ हजार रुपये वगळता १२४००० रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न भेटले तसेच निडवा ३५ टनाचे ८४००० हजार रुपये मिळाले त्यातून उत्पादन खर्च ८ हजार रुपये निघता ७६००० हजार रुपये नफा मिळाला म्हणजे ३ एकर ऊसाच्या उत्पादनातून उत्पादीत खर्च वजा करता एकूण ३६७६०० रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळाले.
शुगर बिट लागवड प्रयोग
हिंगोली जिल्हा वसमतनगर येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री तथा साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुढाकारातून दूष्काळातही कमी कालावधीत व कमी पाण्यात यणारे आणि ऊसा पेक्षा साखर उतारा अधिक देणा-या शुगर बिट लागवड प्रयोग हा प्रायोगीक तत्वावर शेतक-यांच्या शेतात गत वर्षी पासून राबवण्यात येत आहे. जेणे करुन कमी पाणी उपलब्धतेच्या दुष्काळी काळात ऊस क्षेत्र कमी असते अशा वेळी पर्याय म्हणून शुगर बिट पासून साखर निर्मीती केली जावी या करीता शुगर बिट लागवड प्रयोग चाचण्या घेण्यात येत आहेत. यंदा साखर कारखान्यामार्फत पिसाळ यांनी २० आर ऊस पिकात अंतरपीक म्हणून शुगर बिट ची लागवड केली आहे. हे पीक चांगल्या अवस्थेत वाढत असून कारखाना यास ऊस टनेजच्या दराने खरेदी करणार आहे.
शेतकरी
शिवाजी रंगनाथ पिसाळ
मु पो कावलगाव ता पूर्णा जि परभणी.
मो ९४२००३९१४३
शुगर बिट हे पीक थंड हवामानात येणरे पिक असून ते ६ महिने कालावधीत परिपक्व होवून काढणीस येते. युरोपीयन देशात शुगरबीट पासून साखर व इथेनॉल ची निर्मीती केली जाते. भारत देशात शुगरबीटची आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शुगरबीटच्या बियांची लागवड केली जाते. ऊसाच्या तूलनेत शुगर बिट मध्य साखर उतारा प्रमाण अधिक असून १५ ते १६ टक्के साखर उतारा येतो. मराठवाड्यात यंदाचे वर्ष सोडले तर मागील चार वर्ष कोरडा दुष्काळच होता. त्यामुळे ऊसाचे पिक अतिशय कमी होते. त्यावर पर्याय म्हणून कमी पाण्यात, कमी कालावधीत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे शुगर बिट हे पीक फायदेशीर आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास एकरी २८ टन उत्पादन होवू शकते.
सुभाष सोलव
सहाय्यक ऊस विकास अधिकारी
पूर्णा सहकारी साखर कारखाना लि वसमतनगर जि हिंगोली
मो ७०३८१९७६४४.