• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मधुमक्षिकापालनाने शेतकर्‍याच्या जीवनात माधुर्य!

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
मधुमक्षिकापालनाने शेतकर्‍याच्या जीवनात माधुर्य!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

स्टोरी आऊटलाईन…

  • कोरडवाहू शेतीला मधुपक्षिकापालनाचा जोड व्यवसाय.
  • प्रशिक्षण आणि अनुभवाने शास्त्रशुद्धरित्या मधाचे उत्पादन.
  • पुणे, मंबईसह विविध शहरातील ग्राहकांना मधाची थेट विक्री.
  • कृषी विभागासह सरकारी यंत्रणांचे मिळाले पाठबळ.

नोकरीच्या पाठीमागे न धावता कृषी आधारित उद्योगांतून आर्थिक स्थैर्य मिळवलेल्या मराठी तरुणांची आता वाणवा नाही. मात्र, तरीही प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन व शेळीपालन या तुलनेने पारंपरिक असलेल्या व्यवसायांऐवजी काही तरुणांनी सेंद्रिय शेतीला पुन्हा एकदा अच्छे दिन आणण्यासाठीचा चंग बांधून काम सुरू केले आहे. त्यातीलच एक प्रयोगशील शेतकरी म्हणजे नानासाहेब इंगळे. देऊळगाव सिद्धीसारख्या (ता.जि. अ.नगर) कोरडवाहू भागातील या तरुणाने मधुमक्षिकापालन व मधाच्या विक्रीतून राज्यभरातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नगर तालुका सिंचनाच्या बाबतीत कोरडवाहू असणारा तालुका. परिणामी येथील शेतकर्‍यांचा पारंपारिक शेतीसह आता नव्याने आलेल्या आधुनिक शेडनेट व पॉलीहाऊस शेतीकडे वळाले आहेत. काही तरुणांनी सर्व संकटांवर मात करून विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने कृषी आधारित उद्योगांची कास धरली आहे. अशांपैकीच एक दुग्धोत्पादकांचे महत्त्वपूर्ण गाव म्हणजे देऊळगाव सिद्धी आहे. नगर शहरातून दक्षिणेकडील दौंड राज्यमार्गावर देऊळगाव सिद्धी हे गाव आहे. खासगी कंपनीच्या ताब्यात गेलेल्या वाळकी येथील नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचेच हे गाव. मात्र, कारखाना दोन किलोमीटरवर असूनही गावात ऊसाचे नामोनिषाण नसल्याने नव्याने गावात आलेल्यांनाही आश्चर्याचाच धक्का बसतो. मात्र, पिण्याच्याच पाण्याची समस्या असणार्‍या या गावाने उसाऐवजी दुग्धोत्पादन करून आर्थिक सुबत्ता आणली आहे. गावात दोन महत्त्वाच्या दूध प्रक्रिया कंपन्यांमुळे शेतकर्‍यांना दूध विक्रीसाठी सुविधा झाली. याच गावातील नानासाहेब इंगळे या तरुणाने मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. इंगळे यांच्या हेमंतगिरी मधाला राज्यभरातून मोठी मागणी आहे. विविध खासगी कंपन्यांसह पुणे, मुंबईतील ग्राहकांना थेट घरपोच मध करून दिला जातो. यावर्षी सुमारे 40 क्विंटलपर्यंत मधाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनी आता प्रमुख शहरांत ग्राहकांचा शोध सुरू केला आहे.

मधुमक्षिकापालन उद्योगाला प्रोत्साहन
नानासाहेब इंगळे यांनी इंग्रजी विषयातून पदव्यूत्तर पदवी संपादन केली. घरची सुमारे 40 एकर शेती होती. मात्र, तीन भावंडे व संपूर्ण शेती कोरडवाहू असल्याने इतर क्षेत्रात काम करण्यावर विचार सुरू होता. यानंतर काही खासगी संस्थांमध्ये काम केले. साधारणपणे आठ वर्षे खासगी क्षेत्रात काम केल्यानंतर 2014 मध्ये मधुमक्षिकापालन व्यवसायाची माहिती मिळाली. दरम्यान, नगरचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांची भेट घेतली. त्यांनी या व्यवसायाचे गणित समजावून सांगितले. ‘आत्मा’चे विषय विशेषज्ञ श्रीकांत जावळे यांचीही ओळख झाली. दरेकर व जावळे या दोघांनी मनोधैर्य वाढविले. मधुमक्षिकापालन या विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची गरज वाटली. राष्ट्रीय मधमाशी बोर्डाच्या बारखोडी (उत्तरप्रदेश) येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाची संधी मिळाली.

प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला
मधमाशीपालनाच्या प्रशिक्षणानंतर व्यवसायाबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण झाला. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर ‘आत्मा’चेे तत्कालीन प्रकल्प संचालक शिवाजी आमले, उपसंचालक संभाजीराव गायकवाड व तंत्र व्यवस्थापक प्रविण गोरे यांनीही व्यवसायासाठी सहकार्य करण्याबद्दल सकारात्मकता दर्शविली. चर्चेनुसार बाबुर्डी बेंद येथील डॉ. स्वामीनाथन शेतकरी स्वयंसहायता गटाचे सुधीर चोभे, शरद चोभे व नीलेश चोभे यांच्यासह कृषी विभागाच्या आर्थिक सहकार्याने मधाच्या पेट्या आणल्या. यारितीने मधुमक्षिकापालन व्यवसायास सुरवात झाली. माशा चावत असल्याने बाबुर्डी बेंद येथील गटाच्या सर्वच शेतकर्‍यांनी हा व्यवसाय दोनेक वर्षातच बंदही केला. मात्र, नानासाहेब यांनी मोठ्या जिद्द व चिकाटीसह याच व्यवसायात काम करण्याचे ठरविले. वर्ष 2014 मध्ये 50 पेट्यांसह सुरू केलेला हा व्यवसाय आता 250 पेट्यापर्यंत पोहचला आहे. राज्यभरातून कृषी विभाग, आत्मा, खादी व ग्रामोद्योग विभाग आदींच्या कार्यक्रमांतून शेतकरी तरुणांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम इंगळे यांनी आता हाती घेतले आहे.

पहिल्यावर्षी व्यवसाय तोट्यात
इंगळे म्हणाले की, मधुमक्षिकापालन व्यवसायातून पहिल्या वर्षी नफा मिळण्याऐवजी काही अंशी तोटाच आला. मात्र, तरीही खचून न जाता झालेल्या चुका सूधारून या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. मधमाशांना समजून घेऊन त्यांच्याशी समरस होऊन व्यवसाय करण्याचा कानमंत्र काही अधिकारी व व्यावसायिकांनी दिला. दरम्यानच्या काळात अनुभव व अभ्यासातून आलेल्या माहितीवरच काम सुरू ठेवले. त्याचीच अंमलबजावणी करून काम सुरू केल्याने 2015-16 मध्ये नगरमधील सावेडी येथे आयोजित धान्य व फळे महोत्सवात सुमारे 80 हजार रुपयांचा मध विकण्यात यश आले. यातूनच पुढे सेंद्रिय शेती अभियानात काम करण्याचीही उर्मी भेटली. आता हेमंतगिरी याच नावाने गावातील तरुणांसमवेत सेंद्रिय शेतमाल उत्पादन व विक्रीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मधामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठीही मोठी मदत होत आहे. आता आम्ही गावातच प्रशिक्षण केंद्र उभे करून राज्यभरातील तरुणांना मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहोत. गावोगावी गटांची बांधणी करून मधाचे उत्पादन करण्यासाठी आम्ही कृषी विभाग व राष्ट्रीय मधमाशी बोर्डासमवेत काम करण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. गावातच मधावर प्रक्रिया करण्याचाही व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यावरही आम्ही काम सुरू केले आहे.

मध उत्पादनाची पद्धत
मध उत्पादनाबाबत इंगळे सांगतात की, मधाच्या पोळ्याची स्थापना पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत करावी लागते. फळ बागांजवळ मकरंद आणि परागकण तसेच पाणी भरपूर असलेल्या ठिकाणी पोळ्यांची उभारणी केली पाहिजे. पोळ्यांमधील तापमान आवश्यक तेवढे राहण्याकरिता पोळ्यांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे आवश्यक असते. पोळ्याच्या स्टॅण्डभोवती मुंग्या शिरू नयेत याकरिता पाणी असलेले खंदक असले पाहिजेत. मधमाश्यांच्या वसाहतीचे तोंड पूर्वेकडे असावे. पाऊस आणि सूर्यापासून पेटीचे संरक्षण होण्याकरिता दिशेत आवश्यक ते थोडेफार बदल केले पाहिजेत. या वसाहतींना पाळीव जनावरे, अन्य प्राणी तसेच रस्त्याकडील दिव्याच्या खांबांपासून दूर ठेवले पाहिजे. तयार केलेल्या पोळ्यामध्ये वसाहत वसवण्यापूर्वी जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळून त्याचा वास मधमाशांसाठी ओळखीचा केला पाहिजे. जमल्यास राणी मधमाशीला नैसर्गिक जथ्यातून पकडावे आणि एखाद्या पोळ्याखाली ठेवावे. असे केल्यास अन्य मधमाशा त्या पोळ्याकडे आकृष्ट होतात. पोळ्यामध्ये वसवलेल्या जथ्याला अर्धाकप गरम पाण्यात, अर्धाकप साखर टाकून अन्न द्यावे. असे केल्याने पट्ट्यांच्याजवळ जलदगतीने पोळे तयार होण्यास मदत होते. मधाच्या पोळ्यांची तपासणी सकाळच्या वेळेत केली जाते. मधमाशा बारमाही समुहाने मेणाचे पोळे बनवतात आणि त्यात मध साठवत असतात. फुलोरा येणार्‍या अनेक पिकाच्या परागीकरणामध्ये मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सूर्यफूल आणि फळबागांच्या उत्पादनात वाढ होते.

मधमाशी पोळ्याचे व्यवस्थापन

मधमाशांच्या पेटीतील पोळ, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळ्या तसेच रेशिमयुक्त जाळ्या काढून टाकल्या जातात. प्रौढ किडे गोळाकरून नष्ट केले जातात. पोळ्याची चौकट आणि पेटीचा तळाचा भाग स्वच्छ केला जातो. तळाच्या भागात तुटतुडे जमा झालेले असतात. मधमाश्यांना प्रति आठवडा प्रति वसाहत 200 गॅ्रम साखर या प्रमाणात साखर सिरप 1ः1 या प्रमाणात दिले जाते. सर्व वसाहतींना एकाचवेळी अन्न देण्यात येते. त्यामुळे मधमाशांकडून अन्नाची पळवापळवी होत नाही. मध उपलब्ध होणार्‍या हंगामापूर्वी वसाहतीमध्ये पुरेशा संख्येने माशा ठेवल्या पाहिजेत. राणी माशीला ब्रुड चेंबरमध्ये ठेवण्याकरिता वेगळ्या शीट ठेवणे आवश्यक असते. वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा केली जाते. मधाने भरलेल्या फ्रेम वेळच्यावेळी काढून घ्याव्या लागतात. तीन चतुर्थांश भाग मधाने भरलेला असेल तर त्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घेतल्या जातात. त्या ठिकाणी रिकामी पोळी ठेवली जाते. पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा असतो. त्या भागातील मधमाशांना धूर करून बाजूला केले जाते. मग मधमाशांची पोळी काळजीपूर्वक कापून घेतली जाते. मधाची काढणी दोन फुलोर्‍याच्या मध्यल्या काळात होते. पिकलेले पोळे मधाने भरलेले असते. पेटीला मेणपत्रे लावले तर त्याकडे मधमाशा आकर्षित होतात.

प्रतिक्रिया
बाजारात मधाला मोठी मागणी
शेतकर्‍याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन व्यवसाय चांगला पर्याय आहे. सध्या आयुर्वेदाचा प्रसार वाढत असल्याने मधाची मागणी यापुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा फायदा उठवण्याकरिता शेतकर्‍यांनी हा व्यवसाय करून पाहावा. योग्य नियोजन केले तर वर्षाकाढी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. यापेक्षाही अधिक उत्पन्न या व्यवसायातून मिळवणारे शेतकरी आहेत. राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाने मधुमक्षिकापालन व्यवसायाला गती देण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेकडूनही शेतकर्‍यांना सहकार्य केले जाते. खादी ग्रामउद्योग मंडळाने महाबळेश्वर येथे या संदर्भात संशोधन संस्था स्थापन केली आहे. या संस्थेत शेतकर्‍यांना मधमाशा आणि मध उत्पादन याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. – रामदास दरेकर, तालुका कृषी अधिकारी, पारनेर

योग्य व्यवस्थापन करा
मधमाशी पालनासाठी पायाभूत गुंतवणुकीची गरज असते. मधमाशांचे पालन करण्यासाठी लांब पेटी वापरली जाते. अशी पेटी आपल्याला शेतावर ठेवता येते. या पेटीच्या वरच्या भागावर अनेक पट्ट्या बसवलेल्या असतात. या पेटीचा आकार साधारणपणे शंभर से.मी. लांब, 24 से.मी. उंच आणि 45 सें.मी. रुंद असला पाहिजे. मधमाशांचे पोळे एक सेंटीमीटर रुंदीच्या प्रवेश छिद्रासह एकत्र चिटकवलेले आणि स्कू्र ने घट्ट केलेले असते. वरील भागातील पट्ट्या पोळ्याच्या रुंदी इतक्याच असाव्यात. म्हणजे वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा ठरतात. पेटीबरोबरच धुराड्याचा वापर मधमाशी पालनासाठी आवश्यक असतो. लहान पत्र्याच्या डब्यापासून असे धुराडे तयार केले जाते. मधमाशा चावू नयेत आणि त्यांना नियंत्रणात ठेवता यावे यासाठी या धुराड्याचा वापर केला जातो. सुयोग्य व्यवस्थापनातून या व्यवसायातून यश मिळते.- बाळासाहेब नितनवरे, तालुका कृषी अधिकारी, अ.नगर

संपर्क

  • नानासाहेब इंगळे अध्यक्ष,
    हेमंतगिरी सेंद्रिय कृषी बचत गट,
    देऊळगाव सिद्धी, ता.जि. अ.नगर,
    मो. 7588021860, 9552691429

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कोरडवाहू शेतीमध उत्पादनमधमाशी पोळ्याचे व्यवस्थापनमधुमक्षिकापालन
Previous Post

आधुनिक शेतीचे अनोखे मॉडेल

Next Post

रेशीम शेतीतून जपली व्यवसायिकता

Next Post
रेशीम शेतीतून जपली व्यवसायिकता

रेशीम शेतीतून जपली व्यवसायिकता

ताज्या बातम्या

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.