माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा एकात्मिक वापर करून जी शेती केली जाते त्याला प्रिसिजन फार्मिंग म्हणतात. शेती आता आधुनिकतेच्या महामार्गावर सुसाट वेगाने धावत आहे. शेतामध्ये विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर होताना दिसत आहे. निसर्गावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करता आपल्या जवळ साधनसामग्रीचा वापर करून गरजा कशा पूर्ण करता येतील, या मूळ तत्वावर ही संकल्पना आहे. कृत्रिम पद्धतीने वापर करून उत्पादन खर्च कमी व शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणणे, हे प्रमुख उद्देश प्रिसिजन फार्मिंगचे आहेत.
प्रिसिजन फार्मिंग म्हणजे शेती व्यवस्थापनाची आधुनिक पद्धत.. माहिती तंत्रज्ञानात वापर करून शेतातील वेगवेगळ्या भागांमध्ये गरजेनुसार खत, पाणी आणि कीटकनाशक वापरावे, शेतातील माती, पाणी आणि पिकांची माहिती डिजिटल साधनांद्वारे गोळा करणे, माहितीच्या आधारावर योग्य वेळी योग्य उपाय करणे ज्यामुळे उत्पादनात वाढते. या पद्धतीमध्ये मातीपासून ते बियाणे, खत आणि कीटकनाशक यांचा अचूक वापर केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्याला शेतीबाबत योग्य ते निर्णय घेण्याची सवलत मिळते.
फायदे
प्रिसिजन फार्मिंगमुळे उत्पादकता वाढण्यास मदत होते.
मातीचे आरोग्य बिघडत नाही.
पिकांमध्ये जास्त रसायनांची गरज भासत नाही.
पाण्यासारख्या संसाधनांचा योग्य आणि पुरेसा वापर केला जातो.
पिकाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.
शेतीसाठी लागणारा खर्च कमी होतो.
प्रिसिजन फार्मची साधने
इलेक्ट्रोमॅग्नेटिक, सेन्सर तंत्रज्ञान, अल्ट्रासाउंड, फोटो इलेक्ट्रिसिटी, इत्यादी. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेचा वेग, हवेतील बाष्पीचे प्रमाण, आद्रता, हवेतील तापमान तसेच वनस्पतीची शाखीय वाढ, इ. गोष्टी समजल्यास मदत होते.
प्रिसिजन फार्मिंग पद्धती
जीपीएस आणि जीआयएस : शेतीचे डिजिटल मॅपिंग करून, जमिनीच्या वेगवेगळ्या भागांमधील बदल ओळखणे.
ड्रोन आणि उपग्रह : शेतीची हवाई छायाचित्र घेऊन, पिकांची स्थिती आणि आरोग्याची माहिती मिळवणे.
सेंसर : जमिनीतील माती, पाणी, पिकांची माहिती गोळा करणे.
मशीन लर्निंग : मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण करून, शेती व्यवस्थापनात सुधारणा करणे.
प्रिसिजन फार्मिंगमुळे खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो, यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम कमी होतो.