पूर्वजा कुमावत –
शेती म्हणजे केवळ अन्नधान्याची पुरवठा साखळी नाही, तर ती नवनवीन प्रयोगांची, कल्पकतेची आणि धाडसाची एक समृद्ध प्रयोगशाळाच म्हणता येईल. पारंपरिक पिकांपासून पुढे जात काही शेतकरी आज विदेशी भाज्यांचेही उत्पादन घेत आहेत. अशीच एक खास आणि गुणकारी भाजी म्हणजे पार्सली भाजी…
या पार्सली भाजीचा उपयोग विविध खाद्यपदार्थात होतो जसे की सलाड, सूप अशा विविध भाज्यांमध्ये होतो. सध्या या भाजीला बाजारात मोठी मागणी असून पार्सली भाजीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आज आपण या पार्सली भाजीची लागवडीसह संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
औषधीय गुणधर्म
या भाजीचा सुगंध कोथिंबीर सारखाच येतो. यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट, मिनरल्स, व्हिटॅमिन, खनिजे, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, इत्यादी गोष्टी आहेत.
जमीन
या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच माती सुपीक असणेही गरजेचे आहे. जमिनीत ओलावा असण्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर करावा. मातीचा सामू (PH) 6 ते 6.5 असावा.
लागवड
या भाजीची लागवड जून – जुलै महिन्यात केली जाते. पार्सली भाजीचे बियाणे हे फार छोटे असतात. तसेच याची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली जाते. हे पीक 45 दिवसांचे झाल्यानंतर या रोपाचे प्रत्यारोपण करावे. या पिकाची लागवड 4 x 1.25 फूट अंतरावर करावी.
रोग नियंत्रण
लागवडपूर्वी बुरशी व्यवस्थापन करावे. पार्सली पिकावर रोग किंवा किडी खूप कमी प्रमाणात येते. पीक लागवड करण्याअगोदर शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकावे. या पिकास सेंद्रिय खताचा वापर करावा जेणेकरून उत्पादनात वाढ होते.
बाजारात 200 ते 300 रुपये किलो
या पिकाचा कालावधी हा 60 दिवसांचा असतो तर याचे उत्पादन हे 7 ते 8 महिन्यापर्यंत घेता येते. या भाजीला बाजारात चांगला दर मिळतो. बाजारात 80 ते 200 किंवा 300 रुपये किलो असतो.
काढणी
कापणी करत असताना पार्सलीचे पाने पूर्णपणे वाढू द्यावे त्यानंतर त्याची कापणी करावी. काढणी करताना निवडक कटिंग्जचा वापर करावा. एका हंगामात अनेक वेळा या पिकाची कापणी करू शकतो. कापणी झाल्यानंतर पार्सलीला थंड व दमट ठिकाणी ठेवावे जेणेकरून ती ताजी राहते.
