राष्ट्रीय फलोत्पादनाच्या अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना कार्यान्वित आहे. या योजनेत फळझाडे आणि पालेभाज्या पिकांसाठी मल्चिंग म्हणून वापरली जाणारी प्लास्टिक फिल्मवर अनुदान दिले जाते. हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यास मदत करते. पिकात मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीकरण टाळले जाऊ शकते. पिकामध्ये तणांची वाढही कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग फिल्मचा उपयोग फळझाडे आणि पालेभाज्या पिकांच्या लागवडीत केला जातो. चला तर मग, या योजनेविषयी अधिक माहिती घेऊया.
योजनेचे मुख्य फायदे
प्लास्टिक मल्चिंग मातीतील आर्द्रता टिकवण्यास मदत करते, ज्यामुळे पिकांना अधिक पाणी मिळते. मल्चिंगमुळे तणांची वाढ कमी होते, ज्यामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो. मल्चिंगमुळे मातीतील तापमान नियंत्रित राहते, जे पिकांच्या विकासासाठी उपयुक्त असते. या तंत्रामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान किती ?
अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 32,000 रुपये आहे, ज्यामध्ये खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच अनुदान मिळेल. जर क्षेत्र डोंगराळ असेल, तर प्रति हेक्टर 36,800 रुपये असेल. यामध्ये खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18,400 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान उपलब्ध असेल.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक पात्रता ?
शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था हे सर्व घटक या योजनेत सहभागी होऊन अर्थसहाय्य प्राप्त करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्डाची प्रत
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स
7/12 उतारा
8-अ प्रमाणपत्र
प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, तसेच कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रो