• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाखांची मदत

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 7, 2024
in शासकीय योजना
0
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाखांची मदत
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. शेती उत्पादन वाढवण्यापासून ते अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत होईल अशा एक ना अनेक योजना राबवल्या जात आहे. यापैकीच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही एक आहे.

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना डिसेंबर 2019 पासून सुरु होती, पण, या योजनेत अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणे आणि विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे अशा काही बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे या योजनेमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे. त्यानुसार, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर अपंगत्व आल्यास टाळा कायमस्वरूपी आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याचा अपघात 2 अवयव निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत तर अपघातात 1 अवयव निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये अशी आर्थिक मदत शेतकऱ्याला दिली जाणार आहे.

 

Planto Krushitantra

या योजनेसाठीची पात्रता काय ?
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे. तर अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा 10 ते 75 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

 

कोणते अपघात लाभासाठी पात्र असणार ?
शेतकऱ्याचा अपघात पुढील कारणांमुळे झाला असल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल असे अपघात या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

 

‘हे’ अपघात अपात्र
पुढील अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास ते या योजनेसाठी अपात्र असणार आहे. नैसर्गिक मृत्यू, योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचे प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी हे अपघात योजनेसाठी अपात्र असतील.

 

या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा?
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कुटुंबाने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. यात स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मयताचे नाव, त्यांच्यासोबतचे नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण, तारीख लिहायची आहे. अपघातात मृत्यू झाला की अपंगत्व आले, हे देखील त्यात लिहायचे आहे. तसेच या कागदावर ही सर्व माहिती लिहून झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळावा असे देखील लिहायचे आहे. ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर महसूल, पोलिस आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देवून चौकशी करेल आणि 8 दिवसांच्या आत आपला अहवाल तहसीलदार यांना देईल. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती 30 दिवसांच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय घेईल.

 

Jain Irrigation

या अर्जासाठी ही कागदपत्रे लागणार ?
या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठीच्या अर्जासोबत मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा सरकारी कागद जसे की FIR, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल, वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबुक हे कागदपत्रे लागतील.

 

(ही ढोबळ मानाने जुन्या परिपत्रकावर आधारित माहिती आहे. अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहिती साठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • फसवणुकीतून शोधली संधी; तरुणाची कोरफड शेतीतून 3.5 कोटींची उलाढाल
  • फळपिकांच्या लागवडीतून 20 ते 22 लाखांचा नफा 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनाराज्य सरकार
Previous Post

फसवणुकीतून शोधली संधी; तरुणाची कोरफड शेतीतून 3.5 कोटींची उलाढाल

Next Post

आंबिया बहार फळ पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ ; ही आहे शेवटची तारीख

Next Post
आंबिया बहार फळ पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ

आंबिया बहार फळ पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ ; ही आहे शेवटची तारीख

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.