तरुण आजकाल कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्यातला उत्साह, काहीतरी नवीन करण्याची इच्छा कधीही स्वस्त बसू देत नाही. ते नवनवीन प्रयोग करतात. हीच पद्धत आता शेती क्षेत्रामध्ये दिसून येत आहे. तरुण आज शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तसेच वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून ते यशस्वी देखील करत आहेत. एवढेच नाहीतर लाखो रुपयांसह कोटींची उलाढाल करत आहेत. आज आपण अशाच एका साताऱ्याच्या तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणाने शेतामध्ये कोरफड लागवड केली व यातून त्याला खूप मोठा फायदा झाला. कोरफडीतून वर्षाला कोटींची उलाढाल करत आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव ऋषिकेश ढाणे असे आहे.
सध्याच्या घडीला अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत असून मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळवत आहेत. ऋषिकेश यांनी नोकरीला रामराम ठोकत कोरफड लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. ऋषिकेश ढाणे सातारा जिल्ह्यातील पाडळी येथील रहिवासी आहे. 20 वर्षीच त्यांना नोकरी मिळाली. एका मार्केटिंग कंपनीत ते नोकरी करत असताना त्यांच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा विचार येत होता. नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. मग त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीत पारंपरिक पिकांऐवजी नवीन पिकातून अधिक अर्थार्जन करण्यासाठी ऋषिकेश नाविन्यपूर्ण पिकाची माहिती घेत होते.
आणि कोरफड लागवडीचा घेतला निर्णय
सध्या जगभरात कोरफडीसह आयुर्वेदिक वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचे दिसून येत आहे. त्वचेसह शरीराच्या आजारांवर रामबाण उपाय करणारी कोरफड भारतासह परदेशात देखील वापरताना दिसून येतात. कोरफडीचे महत्व लक्षात घेत कोरफडची लागवड करण्याची कल्पना खरंतर धाडसाचीच म्हणावी लागेल. ऋषिकेश यांनी कोरफड लावण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांचे नशीब बदलणारा ठरला.
फसवणुकीतून शोधली संधी
‘कोरफड वाढवा, लाखो कमवा’ या घोषणेच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना फसवले. या शेतकऱ्यांनी शेतात कोरफड लागवड केली जेव्हा कोरफडचे उत्पादन निघाले तेव्हा हा व्यापारी कोरफड खरेदी करण्यासाठी आलाच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोरफड शेतात तशीच सोडून दिली. मात्र, ऋषिकेश यांनी टाकून दिलेल्या कोरफडीच्या रोपांना आणून स्वतःच्या शेतात लागवड केली. याच कोरफड उत्पादनातून ऋषिकेश यांनी व्यवसायात रूपांतर केले. त्यांनी आपल्या शेतात 2007 मध्ये कोरफडीची 4 हजार रोपे लावली. पुढे ती लागवड वाढवून तीन एकर पर्यंत नेली. ऋषिकेश यांनी सगळ्या कोरफडीचे सेंद्रिय पद्धतीने नियोजन करतात तसेच यासाठी ते कोंबडी व शेणखताचा करतात. हळूहळू ऋषिकेश यांनी कोरफडीपासून साबण, शॅम्पू, ज्यूस यासारखी विविध उत्पादने घेण्यास सुरुवात केली.
वर्षाला 3.5 कोटींची उलाढाल
ऋषिकेश यांनी कोरफड उत्पादनातून व्यवसायात रूपांतर केल्यानंतर या व्यवसायातून होणारी कमाई बघून गावातील शेतकरी थक्क झालेत. ज्या शेतकऱ्यांनी व्यापारी न आल्याने कोरफड टाकून दिली होती तेच शेतकरी आता कोरफड लागवडीची प्रेरणा घेत आहेत. ऋषिकेश ढाणे यांनी कोरफड उत्पादनांच्या विक्रीतून 30 टक्के नफा मिळवत असून यातून ते वर्षाला 3.5 कोटी रुपयांचा नफा कमवत आहे. आंतरराष्ट्रीय मागणीसह देशांतर्गत कोरफडीला मागणी असल्यामुळे त्यांना याचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. तसेच ते तयार कोरफडीची पुणे आणि मुंबईतील कॉस्मेटिक आणि फार्मासूटिकल कंपन्यांना 25 रुपये प्रति किलो दराने या कोरफडीची विक्री करत आहेत.
संपर्क :-
ऋषिकेश ढाणे
पाडळी, जि. सातारा
मो. नं. :- 9850036895
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇