अनेक जण उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी शोधतात. मात्र, सध्या अनेक तरुण नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळत आहेत. कृषी विषयाचा अभ्यास करून शेतीतून देखील चांगली कमाई होऊ शकते, हे लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. सुधांशू कुमार यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली आहे. आज त्यांची एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळख आहे. आज सुधांशू कुमार लिची, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, कस्टर्ड ऍपल आणि इतर अनेक फळ पिकांतून वर्षाला 20 ते 22 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
शेती हे उत्पन्नाचे एक चांगले साधन असून सुशिक्षित लोक याकडे आकर्षित झालेले आपण गेल्या वर्षांमध्ये पाहत असू. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील लाखो रुपयांचे पॅकेज असलेल्या नोकऱ्या सोडून तरुण शेती करत आहेत. आज आपण सुधांशू कुमार या शेतकऱ्याबद्दल जाणून घेऊया. सुधांशू कुमार हे मुळचे बिहारमधील समस्तीपूर येथे राहणारे आहेत. आपण लिचीची लागवड करावी अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली. यासाठी त्यांनी खूप संशोधन करून मेहनत घेतली. आज त्यांना मेहनतीचे फळ मिळू लागले आहे. ते चांगली कमाई करत आहेत. गेल्या 34 वर्षांपासून सुधांशू कुमार यांनी स्वत:ला शेतीसाठी झोकून दिले आहे. त्यांची 15 एकर शेतजमीन असून त्यात लिचीसोबतच स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, कस्टर्ड ऍपल आणि इतर अनेक पिकांची लागवड त्यांनी केली आहे.
नोकरी सोडली आणि शेती करायला सुरुवात
सुधांशू कुमार यांनी इतिहास या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर केरळमधील मुन्नार येथील टाटा टी गार्डनमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी केली. या नोकरीत चांगला पगारासह घरच्यांना द्यायला वेळही मिळत होता. तसे बघायला गेले तर सर्व काही ठीक चालले होते. तरीही त्यांच्या मनात एक अस्वस्थता होती. की आपल्याला आयुष्यभर नोकरी करत राहायचे नाही, आपल्याला शेती करायची आहे, स्वत:चा उद्योग करायचा आहे, असे त्यांना नेहमी वाटायचे. आपली आवड पूर्ण करण्यासाठी सुधांशू कुमार यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आपल्या गावात परतले. आता शेती करायची यावर ते ठाम होते. या निर्णयानंतर पुढील प्रवास इतका सोपा नव्हता. उजाड जमिनीतून त्यांना शेतमळा फुलवायचा होता. त्यांनी आरपीसीएयू, पुसाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली.
वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा केला अवलंब
सुधांशू कुमार यांनी कापणी आणि वर्गीकरण यांसारखे वैज्ञानिक तंत्र त्यांनी शेतात अवलंबले. आणि फळ पिकांची लागवड केली. आणि लवकरच त्यांच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांना शेतीतून 25 हजार रुपये इतका नफा झाला. पण आता त्यात कैक पटीने वाढ झाली. यामुळे सुधांशू यांचा आत्मविश्वास वाढला. यामुळे सुधांशू यांना कृषी क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. कापणी आणि वर्गीकरण यांसारखे वैज्ञानिक तंत्र अवलंबले. लवकरच त्यांच्या मेहनतीला फळ आले. सुरुवातीला त्यांना शेतीतून 25 हजार रुपये इतके उत्पन्न मिळायचे. पण आता त्यात कैक पटीने वाढ झाली. आता त्यांना यातून 1 लाख 35 हजार रुपये मिळू लागले.
फळबागातून वर्षाला 20 ते 22 लाखांपर्यंत कमाई
सुधांशू कुमार यांनी त्यांचे लक्ष लिचीच्या बागेकडे वळवले. त्यांनी लिची लावण्यास सुरुवात केली. मात्र यातही अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. त्यांना सिंचनाशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागला. यावर काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. मग त्यांनी स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा त्यांच्या शेतीत अवलंब केला. आता तर संघर्षांना सुरुवात झाली होती. पुढे उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठीही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चांगली बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांनी मुझफ्फरपूरमधील प्रोसेसर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुधांशू यांच्याकडून लिची खरेदी करण्यास सहमती दर्शवली. प्रोसेसर वाल्यांना सकाळी 9 वाजताच लिची हवी होती. मात्र, सुधांशू राहत होते तिथपासून ही जागा 100 किमी दूर होती तरी देखील सुधांशू यांनी हार मानली नाही. त्यांनी दिवसरात्र एक केला. मेहनत घेतली. रात्रभर लिचीची काढणी केली. त्यांच्या मेहनतीला फळ आले. लिचीच्या उत्पादनात सुधांशू यांना 3 लाख 65 हजार रुपयांचा फायदा झाला. सुधांशू यांनी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून त्यांचे उत्पन्न 20 वर्षांत 3 लाख रुपयांवरून 20 ते 22 लाखांपर्यंत वाढले. पुढे जाऊन त्यांना शेतीतूनच अजून कमाई करायची आहे.
बोअरला पाणी लागल्यावर शेतकऱ्याचा आनंद
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇