मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच सुरु आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील खान्देशसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा 26 ऑगस्ट अखेर 87.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. छ. संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणात 53.41 % पाणीसाठा आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात 29.41% उपयुक्त पाणीसाठा आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र किती टक्के पाणीसाठा झाला, हे जाणून घेऊया.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या प्रकल्पात 26 ऑगस्ट अखेर सरासरी 82.87 % उपयुक्त पाणीसाठा असून गतवर्षी 70.27 % इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. तसेच मध्यम प्रकल्पात सरासरी 67.28 % उपयुक्त पाणीसाठा असून लघु प्रकल्पात सरासरी 44.16 % इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर एकूण महाराष्ट्र राज्य (सर्व धरण) प्रकल्पात सरासरी 75.09 % उपयुक्त पाणीसाठा आहे.
नाशिक विभाग – तापी हतनूर (29.41 %), वाघूर (82.19 %), गिरणा (87.53 %), गंगापूर (87.53 %),
छ. संभाजीनगर – जायकवाडी (53.41 %),
पुणे – कोयना (93.91 %), खडकवासला (66.20 %)
नाशिक विभागात काय स्थिती?
नाशिक विभागातील धरणांमध्ये 26 ऑगस्ट अखेर सरासरी 86.71% पाणीसाठा आहे. नाशिकच्या दारणा 94.48 %, गंगापूर 89.55 % आणि गिरणा 87.53 % एवढा पाणीसाठा आहे.
या विभागात इतका टक्के साठा
राज्यातील नाशिक विभागात 26 ऑगस्ट अखेर 86.71% पाणीसाठा, तर 13 ऑगस्ट अखेर 67.75% पाणीसाठा होता. एकंदरीत 13 ऑगस्ट नंतर 18.96% पाणीसाठा वाढला आहे.
छ. संभाजीनगर विभागात 46.01 % पाणीसाठा,
पुणे विभागात 95.46% पाणीसाठा,
कोकण विभागात 95.79% पाणीसाठा,
नागपूर विभागात 80.71% पाणीसाठा,
अमरावती विभागात 69.78% पाणीसाठा,
राज्यातील धरणातील पाणीसाठ्याच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
Today’s-Storage-ReportMarathi-27-08-2024