पीक संरक्षणासाठी ड्रोन वापरणे हे उत्पादक कंपनी आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी एक नवीन तंत्रज्ञान आहे. अर्थात, प्रत्येक शेतासाठी किंवा शेतकर्यांसाठी काही हे उपयुक्त अथवा वापरण्यायोग्य सोल्यूशन नाही. तुमच्या शेतात ड्रोन वापरले जाऊ शकते का, ते जाणून घ्या.
आपल्या शेतात ड्रोन वापरले जाऊ शकते का, याचा विचार करताना लक्षात घेण्यासारख्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या अशा –
भौगोलिक स्थिती (टोपोग्राफी)
शेतात पारंपरिक फवारणीपेक्षा ड्रोन ॲप्लिकेशनचा वापर हा नक्कीच अधिक चांगला पर्याय बनवू शकतो. कारण, ड्रोन अधिक कार्यक्षम, अचूक आणि परिणामकारक आहेत. ते डोंगराळ, विचित्र आकाराच्या शेतात विमानातून किंवा जमिनीवरील पारंपरिक फवारण्यापेक्षा अधिक चांगले कव्हरेज देऊ शकतात.
सलग क्षेत्र नसल्याने भारतात फारशी विमानातून हवाई फवारणी केली जात नाही. मात्र, अशा फवारणीत सारखे वर-खाली करावे लागत असेल आणि सुरू करून काम मध्येच थांबवावे लागत असेल, तर ड्रोन तिथे अधिक चांगले काम करेल.
जलमार्ग, ऑरगॅनिक्स, पॉवरलाईन आणि झाडांच्या रांगांमध्येही, असमतोल शेतांसाठी देखील ड्रोन एक चांगला पर्याय आहे. डोंगराळ आणि पाणथळ भागातील शेतीसाठी, ड्रोन अनुप्रयोग योग्य असू शकतो.
फळ झाडांच्या वाढीसाठी आता कृषिसम्राटचे ग्रोफास्ट। Growfast।
शेताचा आकार
फवारणीसाठी आवश्यक असलेल्या शेताचा आकार देखील एक मोठा घटक आहे. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार, ड्रोन पायलट जिथवर पाहू शकतात, त्याच क्षेत्रात फक्त फवारू शकतात. खूप मोठ्या फील्डमध्ये संपूर्ण फील्ड कव्हर करण्यासाठी ड्रोन पायलटला अनेक वेळा थांबावे आणि सतत जागा बदलून फवारणी काम करावे लागेल. तरीही, पारंपारिक फवारणी करणे कठीण असलेले शेती क्षेत्र तुमच्याकडे असल्यास, ड्रोन वापरणे तुमच्यासाठी अर्थपूर्ण असू शकते.
काही ड्रोन कंपन्या आणि सेवा पुरवठादार एकरानुसार शुल्क आकारतात; परंतु काही कंपन्या प्रति तास किमान शुल्क देखील आकारतात. मात्र, फक्त काही एकरांच्या लहान शेतात फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याने उत्पादक कंपनी किंवा सेवा पुरवठादाराला गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला परतावा मिळत नाही.
ड्रोन ॲप्लिकेशनसाठी विशिष्ट एकराहून मोठ्या शेतातच फवारणी करण्यावर भर दिला जातो. तो ड्रोन सेवा पुरविणाऱ्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय ठरतो. तुम्हाला सल्लागाराशी चर्चा करून हा निकष तुमच्या शेतासाठी तपासून पाहावा लागेल.
बॅटरी आयुष्य
ॲप्लिकेशन पूर्ण करणाऱ्या ड्रोनवरील बॅटरीचे आयुष्य सध्या मर्यादित असते. खरं तर, ड्रोनवरील टाकीच्या क्षमतेपेक्षा ते अधिक मर्यादित असू शकते.
ड्रोनवरील बॅटरी ही शेत आणि पायलट हा फवारणी किती वेळा सुरू राहते आणि मध्ये किती थांबते, यावर अवलंबून असते. ड्रोन बॅटरी सहा ते नऊ मिनिटांपर्यंत टिकू शकते. या मर्यादेचा सामना करण्यासाठी, पायलट काही स्पेअर बॅटरी हाताशी ठेवू शकेल.
ड्रोनच्या मर्यादित बॅटरी आयुष्यामुळे आणि टाकीच्या क्षमतेमुळे, विमान किंवा ग्राउंड स्प्रेअरसह पारंपारिक फवारणी जलद आणि मोठ्या शेती क्षेत्र, जास्त एकरसाठी अधिक किफायतशीर असू शकते.
जर तुमच्याकडे मोठे शेत असूनही तुम्हाला ड्रोन फवारणी करायची असेल, तर शक्यतो सकाळी फवारणी करावी. कारण, सकाळच्या वेळी तापमान थंड असताना बॅटरी थोड्या जास्त काळ टिकतील.
फक्त काही रसायनांच्या फवारणीलाच परवानगी
ड्रोनमध्ये वापरण्यासाठी फक्त काही रसायनांच्या फवारणीलाच परवानगी आहे, तीच रसायने वापरली जाऊ शकतात. पारंपारिक हवाई वापरासाठी अनेक रसायन वापरली जातात. रसायन आधीच मंजुरी लेबल केलेले असल्यास ईपीए फवारणीसाठी ड्रोनमध्ये वापरण्याची परवानगी दिली जाते.
जर तुम्ही तुमच्या शेतात फवारणी करण्यासाठी विमानाचा वापर करत असाल तर, तेच रसायन ड्रोनसह वापरण्यासही योग्य ठरेल. जर तुम्ही सामान्यत: जमिनीवर पारंपरिक फवारणी करत असाल, तर ते रसायन ड्रोनमध्ये वापरण्यायोग्य आहे का, ते हवेत वापरता येईल का, याची खात्री करा. तुमच्या रसायनावरील लेबल दोनदा तपासा. क्रॉप डेटा मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये हा सर्व डेटाबेस पाहून खात्री करता येऊ शकेल.
FAA/DGCA नियम
ड्रोन ॲप्लिकेशन तुमच्या शेतीसाठी एक चांगला उपाय आहे, तसेच तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. मात्र, त्याच्या वापरासाठी, प्रमाणन आणि उड्डाणाच्या मंजुरीसाठी FAA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक ठरते. अमेरिकेत FAA आणि भारतात DGCA मंजुरीची आवश्यकता असते. प्रारंभिक पायलट प्रमाणपत्र पूर्तता पूर्ण करण्याव्यतिरिक्त, अर्जदारांनी उड्डाण करण्यापूर्वी FAA/DGCAला सूचित करणे बंधनकारक आहे.
ड्रोनने फवारणी करण्यापूर्वी अमेरिकेत नोटीस टू एअर मिशन्स (NOTAM) दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी, सामान्यत: 24-72 तास लागतात. भारतातही साधारणतः त्याच पद्धतीचे ड्रोन नियमन कायदे आहेत. एखाद्या नियंत्रित एअर स्पेसमधील एखाद्या भागात-जसे की स्थानिक विमानतळाजवळ-फवारण्याची गरज असल्यास, पायलटने प्रमाणपत्र (COA) दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक आठवडा किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो, परंतु ती मंजुरी वर्षभर वैध असते. COA शिवाय, निषिद्ध क्षेत्रात ड्रोन वापरले जाऊ शकत नाही. संरक्षण विभागाच्या परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास पूर्णतः बंदी आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇