• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भाजीपाला लागवडीतून शोधला प्रगतीचा मार्ग

परभणी जिल्ह्यातील संदलापूर येथील शेतकरी विठ्ठल काकडे यांची यशोगाथा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2023
in यशोगाथा
0
भाजीपाला लागवडीतून शोधला प्रगतीचा मार्ग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

परभणी  : काळानुरूप बदलले पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे. हा नियम सर्व क्षेत्रांना लागू होतो, अगदी कृषी क्षेत्राला देखील. ज्यांनी बदल स्वीकारला त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. त्याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास परभणी जिल्ह्यातील संदलापूर येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल काकडे यांचे देता येईल. काकडे यांनी जे विकते ते पिकविण्याशिवाय पर्याय नसल्याचे समजून घेत व पारंपरिक शेतीला फाटा देत पीक पद्धतीत बदल केला. या बदलाने त्यांच्या आयुष्यात देखील बदल घडवून आणला आहे. आज ते भाजीपाला व मिश्र शेती पद्धतीतून पाच लाखांहून अधिक नफा कमावत आहेत.

 

विठ्ठल गणेशराव काकडे हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील रहिवासी आहेत. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून त्यावर ते पारंपरिक शेती करीत होते. मात्र, यातून त्यांना नफा कमी आणि तोटाच अधिक सहन करावा लागत होता. काकडे यांनी कृषी प्रदर्शन, कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन तसेच कृषी विभागाशी संपर्क साधून नवनवीन माहिती जाणून घेतली. या सर्वांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.

 

फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

सिंचनाची केली सोय

शेतीत बदल करायचा म्हटल्यावर सर्वात आधी सिंचनाची सोय होणे गरजेचे असल्याने काकडे यांनी सर्वात आधी सिंचनाची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला. या योजनेतून त्यांना सौर कृषी पंप मिळाला. यामुळे लोडशेडींगपासून सुटका होवून शाश्वत सिंचनाची सोय झाली.

 

पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |

 

पारंपरिक पीक पद्धतीला फाटा

सिंचनाची सोय झाल्यानंतर काकडे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी जे विकते, तेच पिकविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, कोबी, कांदा, लसूण अशा प्रकारचा भाजीपाला पिकाची लागवड केली. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याबरोबरच रासायनिक खतांचा कमीत-कमी वापर व्हावा, याकडे ते विशेष लक्ष देत असतात.

 

मिश्र दुहेरी पीक

काकडे यांनी भाजीपाला लागवडीतून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक नफा कमावला आहे. यात कारले पिकातून एक लाख 12 हजार रुपये, दोडके पिकातून दीड लाख तर टोमॅटो पिकातून दीड लाख खर्च वगळता अडीच लाख रुपयांचे निव्वळ नफा मिळाला. सध्या त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारले लागवड केली असून, वांग्यामध्ये कोबी तर कांद्यामध्ये मिरची लागवड करुन मिश्र दुहेरी पीक घेतले आहे.

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

स्वत: विक्री करतात शेतमाल

काकडे यांना यावर्षी एकरी 200 कट्टा कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून ते कांद्याची व्यापार्‍याकडे विक्री न करता स्वत: खेडोपाडी जाऊन कांदे विक्री करतात. या कांदा विक्रीतून चांगला नफा मिळत असल्याचेही काकडे सांगतात. शेतकर्‍यांनी उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग, भाजीपाला यासह नफा मिळवून देणारी आधुनिक शेती करावी. शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब करावा, असेही ते सांगतात.

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation

मार्गदर्शनाला प्रयोगाची जोड

काकडे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे पूर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यासोबतच कृषी विभागाच्या विविध योजनांचा देखील ते लाभ असतात. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देणे, कृषी विषयक विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होत असतात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे ते नेहमी मार्गदर्शन घेत असतात. कृषी विभागाकडूनही वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे काकडे सांगतात.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • सिंधिया राजघराण्यातील राजकुमार महाआर्यमन यांनी सुरू केले शेती-उद्योग स्टार्ट अप
  • आंध्रातील काकानी शिवनारायणन यांची नैसर्गिक व अधिक काळ ताजी राहणारी केळी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: परभणीभाजीपाला लागवडविठ्ठल काकडे
Previous Post

शेळीपालन व्यवसायातून लाखोंची कमाई

Next Post

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर

Next Post
सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.