डॉ. मधुकर बेडीस
जळगाव : सन २०२३ मध्ये खरीप हंगामात जून महिन्यात अजिबात पाऊस न पडल्याने महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्वच शेतकरी बांधव फारच चिंतेत पडलेले आहेत. सर्वसाधारणपणे जून महिन्यात ७ जून पर्यंत दरवर्षी प्रमाणे पावसाचे आगमन होत असते. जेणेकरून तेथून पुढे शेतीची मशागत करून गळीतधान्ये (भुईमुग, तीळ सुर्यफुल ई.), कडधान्ये (मुग, उडीद, चवळी ई.), तृणधान्ये (मका, ज्वारी, बाजरी, चारा पिके ई.) नगदी पिके (कापूस) पेरणी करणे शक्य होते. तथापि, यावर्षी जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे मुग, उडीद, ज्वारी व कापूस ई. पिके पेरणी करणे अशक्य आहे. तरीपण खरीप हंगामात बळीराजास काहीना काही पेरणी करणे गरजेचे आहे. उशिरा पेरणी म्हणजे आपत्कालीन पीक परिस्थितीत कोणती पिके जुलै महिन्यापासून पुढे लागवड करावीत हे खालीलप्रमाणे नमुद केलेले आहेत.
कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून यामध्ये चार कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी आहेत.
पश्चिम महाराष्ट्र व खान्देश विभाग
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खान्देशातील नाशिक, धुळे जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो.
जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –
बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
मटकी – MBS-27, फुले सरिता
तूर – फुले राजेश्वरी, गोदावरी, BDN- 711, BSMR- 736, भीमा, पीकेव्ही तारा, BDN- 716
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
राजगिरा – फुले सुवर्णा
सुर्यफुल – फुले भास्कर, भानू, मॉर्डन, LFSH -1
चवळी – फुले विठाई
तूर + गवार (पुसा सदाबहार, पुसा नवबहार)
मका – राजर्षी, फुले महर्षी, आफ्रिकन टॉल
मधुमका – फुले मधु, माधुरी
गुणात्मक प्रथिनयुक्त मका- HQPM- 1 ते 5, बेबीकॉर्न (MH-4,5)
तूर + शेपू (स्थानिक वाण)
तूर + कोथींबीर (इंदोर -१,२, जबलपूर)
राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका
“ग्लोबल वॉर्मिग”ची भीती गडद होतेय, जगातील सर्वात उष्ण दिवसाची झाली नोंद
https://eagroworld.in/global-warming-el-nino-affecting-monsoon-progress-maharashtra-rain-indian-metrological-department/
मराठवाडा विभाग
मराठवाडा विभागात औरंगाबाद (संभाजीनगर), जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद (धाराशिव) या जिल्ह्यांचा समावेश होतो.
जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –
बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
तूर – BSMR- 736, BSMR- 853, BDN-711,BDN-716, गोदावरी, फुले राजेश्वरी, भीमा
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
राजगिरा – फुले सुवर्णा
सुर्यफुल – फुले भास्कर, भानू
चवळी – फुले विठाई
तूर + गवार (पुसा सदाबहार, पुसा नवबहार)
मका – राजर्षी, फुले महर्षी, आफ्रिकन टॉल
मधुमका – फुले मधु, माधुरी, प्रिया, HSC-1
गुणात्मक प्रथिनयुक्त मका – HQPM- 1 ते 5, बेबीकॉर्न (MH-4,5)
पॉपकॉर्न – अंबर पॉपकॉर्न, जवाहर पॉपकॉर्न
विदर्भ विभाग
विदर्भ विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, नागपुर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होतो.
जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –
तूर – पीकेव्ही तारा,गोदावरी, फुले राजेश्वरी, भीमा
बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
सुर्यफुल – फुले भास्कर, भानू
चवळी – फुले विठाई
अति पर्जन्यमान विभाग
अति पर्जन्यमान विभागात इगतपुरी, महाबळेश्वर, कोकण, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सिंदेवाही व साकोली यांचा समावेश होतो.
जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा
भात – गरवा वाण – रत्नागिरी-२, कर्जत-२,८,१०, PDKV – तिलक
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
वाल – पावटा
तूर – पीकेव्ही तारा,गोदावरी, फुले राजेश्वरी
नागली (नाचणी) – फुले नाचणी, फुले कासारी
वरई – फुले एकादशी (गरवा वाण)
बर्टी – फुले बर्टी -१
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
आपत्कालीन पीक पद्धतीवर मात करण्यासाठी काही ठळक बाबी
पिक उत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
राज्यशासन राबवीत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येणार आहे त्याचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.
मजूर कमतरता लक्षात घेता मुलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा, त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जात आहे.
पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे.
आपापल्या विभागात प्रत्यक्षात पावसास होणारी सुरुवात विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार शेतकरी बांधवांनी पिक नियोजन करावे.
डॉ. मधुकर बेडीस
प्राचार्य, कृषी तांत्रिक विद्यालय